ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 16, 2018

अखेर खाण धोरण

गेले वर्षभर ज्याची प्रतीक्षा केली जात होती, त्या राष्ट्रीय खनिज धोरणाचा पहिला मसुदा केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाने अखेर जारी केला आहे. गेल्या वर्षी २ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन लोकूर आणि दीपक गुप्ता यांनी ‘कॉमन कॉज’ नामक स्वयंसेवी संस्थेच्या जनहित याचिकेवर उडिशातील बेबंद खनिज उत्खननासंदर्भात दिलेल्या कठोर निवाड्यात केंद्र सरकारला लगोलग नवे राष्ट्रीय खनिज धोरण तयार करण्याचेे निर्देश दिले होते. ... Read More »

जनमत कौलाचा अन्वयार्थ जनमत कौलाचा अन्वयार्थ 

वामन राधाकृष्ण गोव्यातील ऐतिहासिक जनमत कौलास ५१ वर्षे पूर्ण होत असल्याने ‘अस्मिताय दिवस’ आज राज्यातील भाजप सरकार साजरा करीत आहे. जनमत कौलात विलीनीकरणवादी का हरले आणि कौल हरले तरी नंतरच्या गोव्याच्या दुसर्‍या विधानसभा निवडणुकीत म. गो. पक्षच सत्तेवर का येऊ शकला? आपण निवडणुकीचे बादशहा आहोत असे के. के. शहांनी गोव्याला सांगितले होते. लोकशाहीत बादशहांना किंमत नसते हे निकालावरून सिद्ध झाले. ... Read More »

कणकुंबीत पालयेकरांच्या भेटीमुळे कर्नाटकाचा संताप

>> जलसंसाधन मंत्र्यांकडून गोव्याचा निषेध : न्यायालयाचा अवमान न केल्याचा दावा आम्ही न्यायालयाचा कसलाच अवमान केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पूर्ण पालन केले असून गोवा सरकार कर्नाटकाबरोबर महानाटक खेळत असून आमच्या राज्यात काम चालू आहे ते पाहण्यासाठी शिष्टाचाराची पद्धत न पाळता गोव्याचे मंत्री कसे काय येतात? असा सवाल काल कर्नाटकाचे जलसंपदामंत्री एम. बी. पाटील यांनी केला. यावेळी त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री ... Read More »

पणजीत यंदा कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक मिरामार ते दोनापावल

कार्निव्हलच्या चित्ररथ मिवरणुकीमुळे पणजी शहरात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत असल्याने सरकारने यंदा कार्निव्हल मिरवणूक पणजी शहराबाहेर नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंदा पणजीची कार्निव्हल चित्ररथ मिवरणूक मिरामार सर्कल ते दोनापावला अशी होणार असल्याची माहिती जीटीडीसीचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत ही चित्ररथ मिरवणूक मांडवी पुलाखालील सांता मोनिका जेटी ते कला अकादमी अशी होत होती. पण त्यासाठी पणजी ... Read More »

केंद्राच्या खाण धोरणात उद्योग दर्जाचा प्रस्ताव

केंद्र सरकारचे खाण मंत्रालयाचा नवीन राष्ट्रीय खाण धोरण प्रस्ताव जाहीर झाला आहे. खाण मंत्रालयाने राष्ट्रीय खाण धोरण २०१८ चा कच्चा मसुदा जाहीर केला आहे. या मसुद्यात खाण व्यवसायाला उद्योग दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच पर्यावरणपूरक आणि सुरक्षित खाण व्यवसायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रस्ताव आहे. या मसुद्याबाबत खाण क्षेत्रातील उद्योगपती, व्यावसायिक, कामगार संघटना, नागरिक आदींची मते ९ फेब्रुवारी २०१८ ... Read More »

बेपत्ता तोगडिया बेशुद्धावस्थेत सापडले अहमदाबादमध्येच

विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रविण तोगडिया पोलिसांच्या अटकेत असताना बेपत्ता झाल्याचा आरोप विहिंपच्या कार्यकर्त्यांनी केल्यावरून त्यांनी सोला पोलीस स्थानकावर गोंधळही घातला. मात्र नंतर रात्री उशिरा तोगडिया अहमदाबादमध्येच एका ठिकाणी बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांच्यावर तेथील चंद्रमणी इस्पितळात उपचार सुरू आहेत. याबाबत वृत्त असे, एका जुन्या प्रकरणी राजस्थान पोलिसांचे एक पथक तोगडिया यांना अटक करण्यासाठी काल अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. तथापि अहमदाबाद ... Read More »

दोन वर्षांच्या आत किनार्‍यांवर सर्व साधनसुविधा

दोन वर्षांच्या आत राज्यातील सर्व किनार्‍यांवर शौचालये, लॉकर सेवा, कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या आदींची सोय करण्यात येणार असल्याची माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन, आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. काही किनार्‍यांवर यापूर्वीच शौचालयांची सोय करण्यात आलेली आहे. मात्र, बर्‍याच किनार्‍यांवर ही बांधकामे करण्यास सीआरझेडकडून परवाने मिळाले नसल्याने असुविधा निर्माण झाली असल्याचे काब्राल यांनी सांगितले. गोव्यात लाखोंच्या संख्येने सध्या ... Read More »

‘गेरा’च्या माध्यमातून गोव्यातील मुलांना फुटबॉलच्या मार्गदर्शनाची संधी ः भुतिया

गेरा डेवलपमेंटचा गेरा रिव्हर ऑफ जॉय हा गोव्यातील पहिला चाईल्ड सेंट्रींक होम प्रकल्प कदंब पठार – पणजी येथे साकारत आहे. या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला गेराचे व्यवस्थापकीय संचालक रोहीत गेरा, गेरा होमचे दूत प्रसिध्द फुटबॉलपटू बायचुंग भुतिया, प्रसिध्द टेनिसपटू महेश भूपती, डान्स गुरू शामक दावर यांची उपस्थिती होती. देशात फुटबॉल खेळाबाबत जागृती करणे आणि प्राथमिक पातळीवर प्रशिक्षणाचे महत्व ... Read More »

पेट्रोल – डिझेलच्या दरात होतेय दिवसागणिक वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसागणिक वाढ होत आहे. सोमवारी पणजी शहरात पेट्रोलचा दर ६५.४९ पैसे आणि डिझेल दर ६२. ७० पैसे एवढा होता. केंद्रीय पातळीवर दिल्लीत डिझेलचा दर प्रतिलीटर ६१.७४ रूपयांवर पोहोचला. तर पेट्रोलचा दर ७१ रूपये एवढा होता. पेट्रोल व डिझेलच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात ऑगस्ट २०१४ नंतर प्रथमच मोठी वाढ ... Read More »

झंझावाती विजयासह नदाल दुसर्‍या फेरीत

>> व्हीनस, स्टीफन्स, अँडरसन, इस्नरचे आव्हान आटोपले अव्वल मानांकित स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. काल सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत त्याने जागतिक क्रमवारीत ८१व्या स्थानावर असलेल्या व्हिक्टर एस्ट्रेला बुर्गोस या डॉमनिकन खेळाडूचा ९४ मिनिटांत ६-१, ६-१, ६-१ असा फडशा पाडला. पुढील फेरीत त्याचा सामना अर्जेंटिनाच्या लिओनार्डो मायेर याच्याशी होणार आहे. तृतीय मानांकन लाभलेल्या ... Read More »