ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 15, 2018

आता चर्चा नकोच

एखाद्याने विश्वासाने हात पुढे करावा आणि समोरच्याने पाठीत सुरा खुपसावा तसे कर्नाटकने म्हादईच्या बाबतीत केले आहे. म्हादईचे प्रमुख जलस्त्रोत असलेल्या कळसा आणि भांडुरा नाल्यांपैकी कळसा नाल्यावर बांध घालून त्याचा प्रवाह पूर्ण रोखण्याची दांडगाई कर्नाटकने केल्याचे उघड झाले आहे. खरे तर सर्वोच्च न्यायालयात म्हादई बचाव आंदोलनाची याचिका गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुनावणीस आली असताना कळसा भांडुरावरील सर्व काम पूर्ण बंद ठेवण्याची हमी ... Read More »

भीमा कोरेगाव : डाव्यांच्या वैङ्गल्यग्रस्ततेचा आविष्कार

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) भारत तोडण्याची भाषा उघडपणे वापरणारा उमर खलीद किंवा समाजासमाजात तेढ उत्पन्न करण्यातच ज्याला रुची आहे अशा जिग्नेश मेवाणीसारख्या व्यक्तीला एल्गार परिषदेत निमंत्रित केले जाते व त्यासाठी कम्युनिस्टांचे सहप्रवासी असलेल्या प्रकाश आंबेडकरांचा त्यात पुढाकार असतो तेव्हा तणाव निर्माण होणे अपरिहार्यच होते… भीमा कोरेगाव प्रकरणातील हिंसाचाराचा प्रत्येक जण आपापल्या परीने अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत आहे. कुणाला तो दलित ... Read More »

गोव्याच्या कृतीनंतर कणकुंबीतील कळसाचे काम बंद

कर्नाटकाने कणकुंबी येथे गोव्याकडे येणारा कळसाचा प्रवाह रोखण्यासाठी युध्दपातळीवर चालू केलेल्या बांधकामाच्या विरोधात गोव्यातर्फे पर्यावरण कार्यकर्त्यांबरोबरच व राज्य शासनाने तातडीने दखल घेऊन याठिकाणचे पुरावे गोळा केल्यानंतर गडबडलेल्या कर्नाटकाने रविवारी या भागातील काम थांबवले आहे. काल पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर, रामदास शेटकर यांनी या ठिकाणी भेट दिली असता तेथे युध्दपातळीवर चालू असलेले काम बंद ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तसेच तेथील कार्यालयाला ... Read More »

इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंचे भारत दौर्‍यावर आगमन

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे सहा दिवसांच्या भारत दौर्‍यासाठी काल येथे आगमन झाले. शिष्टाचाराला फाटा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विमानतळावर गळाभेट घेऊन नेतान्याहू यांचे स्वागत केले. त्यांच्याबरोबर सुमारे दिडशे उद्योजकांचे शिष्टमंडळही भारतात दाखल झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात इस्रायली पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. मोदी-नेतान्याहू यांच्यात आज पहिली द्विपक्षीय चर्चा होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही ... Read More »

डीआयजी गुप्ता यांच्याविरुध्द एसीबीकडे तक्रार दाखल

लोकायुक्तांनी दणका दिल्यानंतर पोलीस खात्याने माजी पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. भ्रष्टाचार विरोधी विभागाने (एसीबी) मुख्य सचिवांना पत्र पाठवून माजी पोलीस उपमहानिरीक्षक गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी परवानगी मागितली आहे. पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या सूचनेनंतर एसीबीचे माजी अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांनी माजी पोलीस उपमहानिरीक्षक गुप्ता यांच्याविरोधात कथित लाच प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल ... Read More »

दिल्ली बार असोसिएशनचा सरन्यायाधीश मिश्रांना इशारा

सर्वोच्च न्यायालयाच्या चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनातील त्रुटींबाबत जाहीर केलेल्या अनेक प्रश्‍नांबाबत येत्या दहा दिवसात सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी तोडगा काढावा. अन्यथा देशातील सर्व न्यायालयांच्या बार असोसिएशनशी चर्चा करून रस्त्यावर येऊ व जनतेस सर्व विषयांबाबत जागृती करू असा इशारा दिल्ली बार असोसिएशनने काल पत्रकार परिषदेत दिला. देशातील अत्यंत महत्वपूर्ण तसेच संवेदनशील प्रकरणे हाताळण्याची जबाबदारी योग्य रित्या हाताळली ... Read More »

दिल्लीसह प्रमुख शहरांत हाय अलर्ट जाहीर

प्रजासत्ताक दिन सोहळा नजीक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुप्तचर खात्याने राजधानी दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जाहीर केला आहे. दिल्लीतील जामा मशीद परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाल्यामुळे हा हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. दिल्ली पोलिसांनी २६ जानेवारीच्या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली बिलाल अहमद कावा याला शुक्रवारी अटक केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर या हाय अलर्टला ... Read More »

कदंब पठारावर डोंगर कापणीप्रश्‍नी हेमंत गोलतकरांविरुध्द तक्रार

कदंब पठारावरील साईबाबा मंदिराजवळील बेकायदा डोंगरकापणी रोखण्यासाठी गेलेल्या उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भरारी पथकातील फिल्ड सर्व्हेयरला धक्काबुकी आणि शिवीगाळ प्रकरणी भाजपचे सांताक्रुज मतदारसंघातील नेते हेमंत गोलतकर यांच्याविरोधात ओल्ड गोवा पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून बेकायदा डोंगर कापणासाठी वापरण्यात आलेले पोकलीन आणि सहा ट्रक ताब्यात घेतले आहेत. ही घटना रविवारी दुपारी घडली आहे. पणजी ते ओल्ड गोवा महामार्गावरील कदंब ... Read More »

कोलवाळ गृहनिर्माण प्रकल्पासाठी इच्छा प्रस्ताव निविदा लवकरच

गृह निर्माण मंडळाच्या कोलवाळ येथील महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पासाठी अंतिम इच्छा प्रस्ताव निविदा लवकरच जारी केली जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी काल दिली. या प्रकल्पासाठी जारी पूर्व पात्रता निविदांमध्ये देशातील आठ ते दहा बड्या कंपन्यानी सहभाग घेतला आहे. गोव्यातील एकाही कंपनीने सहभाग घेतला नाही, अशी माहिती मंत्री साळगावकर यांनी एका प्रश्‍नावर बोलताना दिली. गोमंतकीय जनतेला उत्कृष्ट दर्जाचे ... Read More »

‘त्या’ १३५० कर्मचार्‍यांत ठोस निर्णयाअभावी नाराजी

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचारी पुरवठा सोसायटीमधील तात्पुरता दर्जा देण्यात आलेल्या १३५० कर्मचार्‍यांना सेवेत नियमित करण्याबाबत ठोस निर्णय न घेता केवळ आश्‍वासने दिली जात असल्याने कर्मचार्‍यांत नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने पहिल्यांदा गेल्या नोव्हेंबर महिन्यात तात्पुरता दर्जा असलेल्या कर्मचार्‍यांचा प्रश्‍न मांडला. त्यानंतर ५ डिसेंबर २०१७ रोजी कर्मचार्‍यांच्या एका शिष्टमंडलाने मुख्यमंत्री पर्रीकर यांची पर्वरी येथे भेट घेऊन कर्मचार्‍याच्या ... Read More »