ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 12, 2018

देशभक्तीची स्वयंप्रेरणा

चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या खेळापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने श्यामनारायण चोकसी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यातील ताज्या निवाड्याद्वारे मागे घेतली आहे. मात्र, अशा प्रकारे राष्ट्रगीत वाजवणे चित्रपटगृहांना जरी ऐच्छिक करण्यात आलेले असले, तरी जेव्हा राष्ट्रगीत वाजवले जाईल तेव्हा उठून उभे राहणे न्यायालयाने ऐच्छिक केलेले नाही हे लक्षात घेतले गेले पाहिजे. राष्ट्रगीताप्रतीचा आदर व्यक्त झालाच पाहिजे ही न्यायालयाचीही भूमिका आहे. दिव्यांग वा ... Read More »

कोण म्हणते आरक्षणामुळे विकासाला खीळ?

देवेश कु. कडकडे डिचोली वास्तविक आरक्षणाची मूळ संकल्पना ही आर्थिक सुधारण्यांची निगडित नसून एका मोठ्या बहिष्कृत समाजाला जातीयता, सामाजिक व्यवस्था, परंपरा आणि त्यांच्या वांशिक व्यवसायापासून मुक्त करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, ज्यांना हजारो वर्षांपासून साध्या शिक्षणाची संधीही मिळालेली नाही, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रांत भागीदारी देऊन हजारो वर्षांचे त्यांचे मागासलेपण दूर करणे ही आहे. आरक्षणामुळे देशाच्या विकासाला खीळ बसून ... Read More »

सार्वजनिक सेवा हमी कायदा १ एप्रिलपासून

>> कचराविषयक तक्रारींसाठी खास ऍप : मुख्यमंत्री राज्यात सार्वजनिक सेवा हमी कायदा येत्या १ एप्रिल पासून लागू केला जाणार असून विविध ४० खात्यांतील ४९७ सरकारी सेवा या कायद्याखाली आणण्यात येणार आहेत. सध्या हा सेवा हमी कायदा अंशतः लागू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल आल्तिनो, पणजी येथे बोलताना दिली. नगरविकास संचालनालयाच्या समान सेवा वितरण (कॉमन सर्व्हिस डिलिव्हरी) पोर्टलचे ... Read More »

माहिती हक्क कायद्यात दुरुस्तीची गरज

>> राज्य मुख्य माहिती आयुक्त प्रशांत तेंडुलकर यांचे मत माहिती हक्क कायद्यात काळानुसार दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. हा कायदा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे केंद्र सरकारने माहिती हक्क कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे असे मत राज्याचे मुख्य माहिती आयुक्त ऍड. प्रशांत प्रभू तेंडुलकर यांनी केली. आयोगाला देण्यात आलेली जागा आणि कर्मचारीवर्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे सेवेवर काही प्रमाणात परिणाम होतो. ... Read More »

नगरसेवकांची मालमत्ता सार्वजनिक होणार

राज्यातील नगरपालिकांच्या नगरसेवकांना वार्षिक मालमत्तेची माहिती लोकायुक्तांकडे सादर करण्यास बंधनकारक केले जाणार आहे. त्यासाठी नगरपालिका कायद्यात आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे. मालमत्तेची माहिती सादर न करणारा नगरसेवक अपात्र ठरण्याची तरतूद कायद्यात केली जाणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. आमदारांप्रमाणे नगरसेवकांना मालमत्तेची माहिती सादर करण्याचे बंधन केले जाणार आहे. नगरसेवकांना सध्या मालमत्ता सादर करण्याचे ... Read More »

गोवा विद्यापीठ पदवीदान सोहळ्याला राष्ट्रपती येणार

गोवा विद्यापीठाच्या फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या पदवीदान सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यपाल तथा गोवा विद्यापीठाच्या कुलपती डॉ. मुदुला सिन्हा यांनी राष्ट्रपती कोविंद यांना वार्षिक पदवीदान सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. राष्ट्रपतींनी ते स्वीकारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यपाल डॉ. सिन्हा यांनी दिल्ली भेटीत राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेऊन गोवा सरकारच्या कार्याची सविस्तर माहिती ... Read More »

४.५ लाखांचे अमली पदार्थ आसगावातील छाप्यात जप्त

अमलीपदार्थ विरोधी विभागाने १० रोजी मध्यरात्री बादे आसगाव येथे छापा घालून ४.५ लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करून दोघांना अटक केली. सॅमसन चेरियन बेंसिलियस (३२, मंगळूर) आणि थॉमस बेझिल ऍबट (४४, मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ४.० मिलिग्रॅम एलएसडी आणि १८० ग्रॅम चरस हस्तगत करण्यात आला आहे. तसेच महिंद्रा स्कूटर जप्त करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी ... Read More »

राष्ट्रीयीकरणाच्या नावाखाली नद्यांच्या व्यावसायीकरणाचा घाट

>> मेधा पाटकर यांचा मडगाव येथे आरोप विकासाच्या नावाखाली नद्यांचे राष्ट्रीकरण करण्यात येत असले तरी ते राष्ट्रीकरण नसून व्यावसायीकरण आहे असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी केला. यामुळे नद्यांवर अवलंबून असलेल्या कष्टकरी लोकांचे नुकसान होईल. नदीला मानवाएवढे महत्त्व आहे. आज स्त्रियांवर जसे अत्त्याचार होतात तसे नद्यांवर व्हायला लागले आहेत. गोव्यातील नद्या वाचविण्यासाठी गोवेकरांनी माजाळीपासून मांडवीपर्यंत पदयात्रा काढाण्याची ... Read More »

लँझारोटेच्या गोलांमुळे गोव्याची जमशेदपूरवर मात

स्पेनिश मध्यपटू मॅन्युएल लँझारोटेने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर रंगतदार झालेल्या लढतीत एफसी गोवा संघाने जमशेदपूरचा बलाढ्य बचाव भेदत २ -१ असा विजयासह हिरो इंडियन सुपर लीगमध्ये पूर्ण गुणांसह चौथ्या स्थानावर झेप घेतली. गोव्याला मागील तीन सामन्यांत अनुक्रमे पराभव-बरोबरी-पराभव असे अपयश आले होते. त्याआधी गोव्याने सलग तीन विजय मिळविले होते. घरच्या मैदानावरील कामगिरीसह गोव्याने फॉर्म पुन्हा मिळविला. गोव्याने नऊ सामन्यांत पाचवा ... Read More »

भाटिकर मॉडेल स्कूलला अजिंक्यपद

>> सासष्टी तालुका अंडर-१४ क्रिकेट भाटिकर मॉडेल हायस्कूलने महिला नूतन हायस्कूलचा ७ गड्यांनी पराभव करीत गोवा क्रिकेट संघटना आयोजित अंडर-१४ सासष्टी विभाग प्रेसिडेंट कप आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. भाटिकर मॉडेल स्कूलचे हे सलग सहावे जेतेपद होय. मडगावच्या डॉ. राजेंद्र प्रसाद स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना महिला नूतन हायस्कूलला केवळ ८६ अशी धावसंख्या उभारता आली. प्रत्युत्तरात ... Read More »