ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 9, 2018

सूज

– भरत म. नाईक काही वेळेस सूज शरीराच्या दोन्ही शाखांमध्ये एकाच वेळेस सारखीच जाळत असते. तसेच दुसर्‍या प्रकारात सूज शरीराच्या कोणत्याही एकाच भागात येते. त्याला ‘एकदेशोत्थित शोध’ म्हणतात. व्यवहारात आम्हाला सहा प्रकारच्या सुजेचा सामना करावा लागतो. वात, पित्त, कफ, हृद, वृक्क (किडनी) व आगंतूक कारणाने येणारी सूज. सूज शारीरिक दोष व आगंतुक कारण, पुन्हा शोध आणखी शोध दोन प्रकारे वर्ग ... Read More »

वंध्यत्व ः ज्वलंत बोचरे दुःख

– डॉ. मनाली महेश पवार (गणेशपुरी, म्हापसा- गोवा) आयुर्वेदशास्त्रामध्ये वंध्यत्व येऊ नये व होणारी संतती उत्तम व्हावी यासाठी आचरणात आणायच्या विविध बाबींचा विचार झालेला आहे. त्यामुळे संततीप्राप्तीचा विचार करणार्‍या सर्वांनी ‘वंधत्व ः कारणे व निवारण’ तसेच ‘सुप्रजाजनना’संदर्भात आयुर्वेदाचे चिंतन मुळातून समजून घेणे आवश्यक आहे. संततीप्राप्ती ही एक नैसर्गिक देणगी आहे. पण या नैसर्गिक योगदानाला अनेक कारणांनी जणू ग्रहणच लागले आहे. ... Read More »

असुरक्षित आधार

गॅसपासून मोबाईलपर्यंत आणि बँक खात्यापासून विम्यापर्यंत सर्वत्र सक्तीचा करण्यात आलेल्या आपल्या ‘आधार’ क्रमांकाशी संबंधित वैयक्तिक माहिती सुरक्षित नसल्याचा व अत्यल्प किमतीत ही माहिती विकली जात असल्याचा गौप्यस्फोट चंडिगढच्या ‘द ट्रिब्यून’ या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने गेल्या तीन जानेवारीच्या अंकात केला होता. त्यावर ‘आधार’ चा कारभार हाताळणार्‍या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजे यूआयडीएआयने या प्रकरणात सारवासारव करण्याचा जोरदार प्रयत्न गेले काही दिवस तर ... Read More »

अनुसूचित जाती-जमातींची पुनर्गणना व्हावी…

शंभू भाऊ बांदेकर राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे उपाध्यक्ष एम. मुरुगन यांनी नुकतीच गोव्याला भेट दिली. या भेटीत गोव्यातील अनुसूचित जाती – जमातींच्या नागरिकांची योग्य आकडेवारी मिळवण्यासाठी त्यांची पुनर्गणना करण्याची मागणी त्यांनी केली आहे… गोवा राज्याला नुकतीच भेट दिलेल्या राष्ट्रीय अनुसूचित जाती व जमातीच्या आयोगाचे उपाध्यक्ष एल. मुरुगन यांनी गोव्यातील अनुसूचित जाती व जमातीच्या नागरिकांची योग्य आकडेवारी प्राप्त करण्यासाठी ... Read More »

२१ खाणींना दोन महिन्यांसाठी सशर्त परवाना

>> जेएसडब्लूचा कोळसा हाताळणी परवाना निलंबित >> राज्य प्रदूषण मंडळाच्या बैठकीत निर्णय गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या काल झालेल्या खास बैठकीत २१ खाण लीज धारकांना दोन महिन्यांसाठी खाणी सुरू करण्यासाठी सशर्त परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या या निर्णयामुळे राज्यातील खाण व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुरगाव बंदरात कोळसा हाताळणार्‍या जेएसडब्यूला दिलेला परवाना तात्पुरता निलंबित ... Read More »

४४ लाखांचे परकीय चलन दाबोळी विमानतळावर जप्त

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल सीमा शुल्क हवाई गुप्तहेर विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या कारवाईत दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील ४३ लाख ७० हजार रुपये किंमतीचे परकीय चलन जप्त करण्यात आले. सीमा शुल्क संचालनालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी मुरगाव हार्बर येथील कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. एक आंतरराष्ट्रीय आणि एक देशी प्रवासी दाबोळी विमानतळावरून ओमन एअरवेज विमानाने दुबईला जाण्याच्या तयारीत होते. दरम्यान, दाबोळी ... Read More »

बाणस्तारी मार्केट प्रकल्पासाठी केंद्राकडून १२ कोटींचा निधी

केंद्र सरकारच्या आदिवासी विकास निधीतून अंदाजे १२ कोटी २७ लाख रुपये खर्चून बाणस्तारी येथे अद्ययावत मार्केट संकुल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्यात बाणस्तारीचा बाजार प्रसिद्ध आहे. दर गुरुवार-शुक्रवारी बाणस्तारीला बाजार भरतो. या ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादित केलेले सामान घेऊन विक्रीसाठी येतात. या बाजार संकुलाची इमारती जुनी झाल्याने विक्रेत्यांना ... Read More »

गोमांस प्रकरणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी : कॉंग्रेस

गोमांस प्रकरणी गोवा सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी तसेच राज्यात लवकरात लवकर गोमांस उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली. गोमांस खाणार्‍यांना तसेच गोमांस विक्रेत्यांना कॉंग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, असेही नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यासंबंधी लवकरात लवकर बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणीही ... Read More »

सुनील गर्ग यांच्याविरुध्द एफआयआर नोंदवा : कोर्ट

मुन्नालाल हलवाई यांच्याकडून लाच घेतल्याचा आरोप असलेले गोव्याचे माजी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्याविरुध्द एफ्‌आय्‌आर नोंद करण्याचा आदेश काल उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला. आपली फसवणूक करण्यात आल्याची एक तक्रारी हलवाई यांनी फोंडा पोलीस स्थानकात नोंदवली होती. त्या संदर्भात आपण सुनील गर्ग यांची भेट घेतली असता गर्ग यांनी सदर प्रकरणी एफ्‌आय्‌आर् नोंद करण्यासाठी आपणाकडून ५.५ लाख रु.ची लाच घेतल्याचा ... Read More »

कला अकादमी परिसरात १२ जानेवारीपासून लोकोत्सव

गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाचा भारतीय हस्तकला, लोकगीते, लोकसंगीत आणि विविधांगी लोककलांचा समावेश असलेला १९ वा ‘लोकोत्सव २०१८’ महोत्सव १२ ते २१ जानेवारी पर्यंत कांपाल, पणजी येथील कला अकादमीच्या संकुल परिसरात घेण्यात येणार आहे. यंदाचा लोकोत्सव प्लॅस्टिकमुक्त करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. १२ जानेवारी रोजी ... Read More »