ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 8, 2018

अर्थसंकल्पांची दिशा

केंद्राचा अर्थसंकल्प पुढील महिन्यात एक फेब्रुवारीला आणि राज्याचा अर्थसंकल्प २१ फेब्रुवारीला सादर होणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्पाचा थेट संंबंध सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनाशी पोहोचत असल्याने त्याविषयी व्यापक कुतूहल असते. हे वर्ष काही राज्यांतील निवडणुकांचे आहे आणि पुढील वर्षी तर लोकसभेची निवडणूक आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपला गुजरातमध्ये नुकताच बसलेला सौम्य हादरा नेत्यांना भानावर आणण्यास पुरेसा आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ... Read More »

२०१८ ही लोकसभा निवडणुकीची उपान्त्य फेरी

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) भाजपाची खरी कठोर परीक्षा होणार आहे ती मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांतच. राजस्थानातील वसुंधरा सरकारने जरी एकच कारकीर्द उपभोगली असली तरी मध्यप्रदेश व छत्तीसगड ही राज्ये दीर्घ काळापासून भाजपाकडेच आहेत व तेथील राजकारणावर शिवराजसिंग चौहान व डॉ. रमणसिंग यांची पक्की पकडही आहे. गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक ही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उपान्त्यपूर्व फेरी ... Read More »

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हिंदू चेतना संगम कार्यक्रम काल मळा, पणजी येथील मैदानावर संपन्न झाला. यावेळी संघाच्या गणवेशात उपस्थित मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. Read More »

लालूप्रसाद तुरुंगात करणार माळीकाम

चारा घोटाळ्याप्रकरणी साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेला बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना तुरुंगवास काळात माळीकाम करावे लागणार आहे. लालूप्रसाद तुरुंगात एक कैदी म्हणून काम करतील. या कामापोटी त्यांना दररोज ९३ रुपये मिळणार आहेत. लालूप्रसाद यांना हजारीबाग तुरुंगात पाठवण्यात येणार आहे. Read More »

गोमांस व्यापार्‍यांचा दुसर्‍या दिवशीही बंद

सरकारी यंत्रणेकडून कर्नाटकातून आणण्यात येणारे गोमांस जप्त केले जात असल्याने राज्यातील गोमांस व्यापार्‍यांनी सलग दुसर्‍या दिवशी बंद पाळला. गोवा गोमांस व्यापारी संघटनेने हा विषय मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे नेला आहे. दरम्यान, गोमांस व्यापार्‍यांकडून कायद्याचे पालन होत नसल्याने गोमांस जप्त केले जात आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. मारवासडा, उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पात गुरांची कत्तल करण्यासाठी गोमांस व्यापार्‍यांकडून आवश्यक कागदपत्रे ... Read More »

सरकारी कर्मचार्‍यांना एप्रिलपासून खास संगणक प्रशिक्षण : महसूलमंत्री

जनतेला ऑनलाइन सेवा देण्यासाठी सरकारच्या विविध खात्यातील कर्मचार्‍यांना संगणक हाताळणीसाठी एप्रिलपासून खास प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली. राज्य सरकारच्या बहुतांश खात्यांकडून नागरी सेवेसाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर केला जात आहे. सरकारच्या विविध खात्यांतील अनेक कर्मचार्‍यांना ही सेवा हाताळता येत नाही. सरकारी कार्यालयातील कर्मचार्‍यांना ऑनलाइन सेवेबाबत योग्य प्रशिक्षण देण्यात न आल्याने कामकाज हाताळताना ... Read More »

ड्रग्स प्रकरणी ४ वर्षांत ११४ स्थानिकांना अटक

राज्यात अमलीपदार्थ बेकायदा विक्री प्रकरणांमध्ये स्थानिकांचा सहभाग वाढत चालला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. पोलिसांनी गेल्या चार वर्षांत ड्रग्ज व्यवसाय प्रकरणी एकूण ३७८ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात ११४ स्थानिकांचा समावेश आहे. राज्यातील दोन कुटुंबेसुद्धा बेकायदा विक्री प्रकरणात गुंतल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. गत वर्षात अमलीपदार्थ विरोधी विभाग आणि पोलिसांनी अमलीपदार्थ बेकायदा विक्रीची १६५ प्रकरणे नोंद करून या ... Read More »

व्याघ्र गणना फेब्रुवारी-मार्चमध्ये

दर चार वर्षांनी एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना यंदा फेब्रुवारी अथवा मार्च महिन्यात होणार आहे. मात्र, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने या गणनेची तारीख अद्याप जाहीर केली नसल्याचे गोवा वन खात्यातील सूत्रांनी काल सांगितले. शेवटची व्याघ्र गणना २०१४ साली झाली होती. या गणनेत गोव्यातील वन क्षेत्रात ३ ते ७च्या आसपास वाघ असल्याचे आढळून आले होते असे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन ... Read More »

तळातील दिल्लीने चेन्नईनला रोखले

इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) चौथ्या मोसमात आघाडीच्या जथ्यात राहिलेल्या चेन्नईन एफसीला गुणतक्त्यात तळाला असलेल्या दिल्ली डायनामोजने २-२ असे बरोबरीत रोखले. नेहरू स्टेडियमवर चेन्नईचा बर्थडे बॉय जेजे लालपेखलुआ याने दोन गोल करीत विजय जवळपास नक्की केला होता, पण अखेरच्या मिनिटाला दिल्लीने बरोबरी साधली. नायजेरियाचा कालू उचे आणि नेदरलँड्‌सचा गुयॉन फर्नांडिस (९०वे मिनिट) या बदली खेळाडूंनी जेजेच्या आनंदावर विरजण ओतले. अखेरच्या मिनिटाला ... Read More »

तिसरा दिवस पाण्यात

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी एकाही चेंडूचा खेळ झाला नाही. पावसामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला असला तरी मागील काही महिन्यांपासून दुष्काळाचा सामना करत असलेल्या सामान्य नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील २८६ धावांना उत्तर देताना भारताचा पहिला डाव दुसर्‍या दिवशी २०९ धावांत संपला होता. यानंतर यजमानांनी आपल्या दुसर्‍या डावात २ बाद ६५ धावा ... Read More »