ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 6, 2018

राज्याच्या महसुलात ८ टक्के वाढ ः मुख्यमंत्री

राज्याच्या महसूलात ८ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. विरोधकांकडून राजाच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले की, सरकारच्या महसूलात हळू हळू वाढ होत आहे. जीएसटीमुळे फायदा होत आहे. सध्या जीएसटी प्राथमिक स्तरावर असल्याने योग्य प्रमाणात महसूल येत नसल्याने केंद्राकडून आर्थिक साहाय्य ... Read More »

मिकी पाशेकोंविरोधातील खटला बंद करण्याचा आदेश

>> मनी लॉंडरिंग प्रकरण माजी आमदार मिकी पाशेको यांच्याविरुद्ध गाजलेल्या मनी लॉंडरिंग प्रकरणातील खटला न्यायालयाने बंद करण्याचा आदेश काल दिला. तसेच सीबीआयने जप्त केलेली कागदपत्रे परत करण्याचा आदेशही जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला. ही दोन प्रकरणे दोन न्यायालयात चालू होती. या निकालाबद्दल मिकी पाशेको यांनी समाधान व्यक्त करून न्यायालयाने योग्य निर्णय दिल्याचे सांगितले. गेल्या आठ वर्षांपासून या दोन्ही प्रकरणांमुळे आपल्याला ... Read More »

गोवा फॉरवर्ड जनमत कौलाच्या महानायकांना देणार आदराचे स्थान

जॅक सिक्वेरा यांच्यासह ज्या व्यक्तींनी गोवा १९६७ सालचा जनमत कौल जिंकावा यासाठी अथक काम केले त्या नेत्यांना गोव्याच्या इतिहासात अद्याप मानाचे स्थान मिळालेले नसून ते मिळवून देण्याचे काम आता गोवा फॉरवर्ड पक्ष हाती घेणार असल्याचे या पक्षाचे नेते तथा नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. आतापर्यंत सत्तेवर आलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांनी जनमत कौलाच्या नेत्यांकडे दुर्लक्ष करण्याचेच काम ... Read More »

शॅक, प्रमुख इमारतींमधील अग्नी सुरक्षेचा आढावा घ्या

>> उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या काल (शुक्रवारी) घेण्यात आलेल्या बैठकीत उत्तर गोव्यातील समुद्र किनार्‍यांवरील सरकारी व खासगी जागेतील शॅक यांनी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत अग्नि सुरक्षा मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या बैठकीत सरकारी, खासगी इमारती, रेस्टॉरंट, हॉटेल, हॉस्पिटल, थिएटर, डिस्को आदी ठिकाणच्या अग्नि सुरक्षेवर चर्चा करण्यात आली. अग्निशामक दलाने महत्वाच्या इमारतींमधील अग्निसुरक्षेचा ... Read More »

पक्ष्यांच्या हत्येचे प्रमाण गोव्यात कमी ः सक्सेना

>> पक्षी महोत्सवात श्रीलंकेतील पक्षीप्रेमी येणार वनखात्याने १२ ते १४ जानेवारी दरम्यान आयोजित दुसर्‍या पक्षी महोत्सवात नेत्रावळी, खोतीगाव अभियारण्याबरोबरच महासागरातील पक्षी पाहण्याची संधी पक्षीप्रेमींना दिली जाणार आहे, अशी माहिती प्रधान मुख्य वन्यसंरक्षक अजय सक्सेना यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. गोव्यात पक्ष्यांच्या हत्येचे प्रमाण कमी असल्याची माहिती सक्सेना यांनी दिली. देशभरात पक्षाच्या १२०० प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती आढळून येतात. तर, गोव्यात ४४० ... Read More »

टीम इंडियाने २८ धावांत गमावले ३ गडी

>> गोलंदाजांनी कमावले; फलंदाजांनी गमावले >> दक्षिण आफ्रिका सर्वबाद २८६ भुवनेश्‍वर कुमार व सहकार्‍यांच्या अचूक गोलंदाजीवर पाणी फेरण्याचे काम टीम इंडियाच्या आघाडी फळीने काल केले. गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २८६ धावांत संपवल्यानंतर दिवसातील ११ षटके खेळून काढताना टीम इंडियाला तीन गडी गमवावे लागले. भारताचे धवन, विजय व विराट हे आघाडीचे तीन गडी माघारी परतले असून केवळ २८ धावा फलकावर ... Read More »

पाकमध्ये ‘नो एन्ट्री’

भारताच्या अंध क्रिकेट संघाला पाकिस्तान’धील विश्‍वचषक स्पर्धेत खेळण्यासाठीची परवानगी विदेश ’ंत्रालयाने नाकारली आहे. विश्‍वविजेता भारतीय संघ ८ जानेवारी रोजी फैसलाबाद येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार होता. यानंतर पाकिस्तानमध्ये अन्य दोन साखळी सामने व संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे दोन सामने होणार होते. पाकिस्तान अंध क्रिकेट परिषदेने (पीबीसीसी) स्पर्धेचे वेळापत्रक बदलले असून नवीन वेळापत्रकानुसार भारतीय संघ ८ रोजी संयुक्त अरब ... Read More »

ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

स्टीव स्मिथ व आघाडीचा फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना दाद न देता ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या दिवसअखेर २ बाद १९३ अशा भक्कम स्थितीत पोहोचविले आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३४६ धावा केल्या आहेत. ऍशेस मालिकेतील हा पाचवा सामना सिडनी येथे खेळविण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ नाबाद ४४ व ख्वाजा ९१ धावांवर नाबाद असून या द्वयीच्या जोरावर कांगारूंनी पकड मिळविली ... Read More »