ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 5, 2018

पुन्हा उडती शवपेटी?

नौदलाचे मिग २९ के विमान काल दाबोळीत दुर्घटनाग्रस्त झाले. सुदैवाने वैमानिकाचा जीव बचावला असला, तरी नागरी विमानतळावरील विमानसेवा विस्कळीत झाली आणि त्याचा फटका कोलकात्याला निघालेल्या एफसी गोवा संघालाही बसला. नौदलाच्या ताफ्यातील मिग २९ कोसळण्याची ही जरी पहिलीच घटना असली, तरी त्यातून आजवर मिग मालिकांतील विमान दुर्घटनांच्या कटू आठवणी त्या दुर्घटनेने ताज्या केल्या आहेत. भारतीय हवाई दलापाशी असलेली मिग विमाने ही ... Read More »

मगो पक्ष आजही बहुजनांच्या ह्रदयात…

देवेश कडकडे (डिचोली) मगो पक्ष ही बहुजन समाजासाठी एक छोटीशी खिडकी होती. त्यातून डोकावून अनेकांना आपल्या स्वाभिमानाचा, उत्कर्षाचा मार्ग गवसला. कॉंग्रेस पक्षासारख्या राष्ट्रीय पक्षानेही ज्या पक्षाचा एकेकाळी धसका घेतला होता तो पक्ष अनेकदा आपल्या अस्तित्वासाठी झगडला. ज्यांना या पक्षाने मान-सन्मान दिला, ज्यांनी राष्ट्रीय राजकारणातही प्रसिद्धी मिळवली त्यांनीही या पक्षाकडे पडत्या काळात पाठ फिरवली… दि. २६/१२ च्या ‘आधी विश्वासार्हता जपा’ या ... Read More »

सार्वजनिक ठिकाणी मद्यपानास लवकरच चाप

>> गुन्हा दंडनीय ठरणार : फेब्रुवारीपासून होणार अंमलबजावणी राज्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे दंडनिय गुन्हा ठरणार आहे. यासंबंधीचा मसुदा तयार करण्याचे काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण होणार असून फेब्रुवारी महिन्यापासून अंमलबजावणीला सुरूवात केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल केली. राज्यात पीव्हीसीचा वापर करून तयार प्लॅस्टिकच्या वापर करण्यास बंदी घातली जाणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून तयार ... Read More »

राज्य सहकारी बँकेच्या २००७पासूनच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी

गोवा राज्य सहकारी बँकेच्या २००७ ते २०१७ या दहा वर्षातील कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी माजी आमदार सुभाष फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत काल केली. कॉँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी गोवा राज्य बँक प्रकरणी श्वेत पत्रिका जारी करण्याची मागणी केली आहे. त्यावर बोलताना माजी आमदार फळदेसाई म्हणाले की, कॉँग्रेसशी संलग्न असलेल्या व्यक्तीने गोवा राज्य सहकारी बँक डबघाईत आणली आहे. भाजप ... Read More »

दहा पाक सैनिकांचा बीएसएफकडून खात्मा

सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय सैनिकांना लक्ष्य करणार्‍या पाकिस्तानी लष्कराला गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जबरदस्त दणका दिला. भारतीय जवानांनी पाकिस्तानी रेंजर्सच्या बंकर्सचा अचूक वेध घेत त्यांच्या दिशेने तुफान गोळीबार करीत दहा पाक सैनिकांचा खात्मा केला. जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये बुधवारी रात्री पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉंस्टेबल आर. पी. हाजरा शहीद झाले होते. ... Read More »

पाककडून कुलभूषणांचा नवा व्हिडिओ जारी

>> भारताविरुध्द कांगाव्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या कैदेतील भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांचा एक नवीन व्हिडिओ पाकने जारी केला असून त्याद्वारे जाधव यांच्या तोंडून पाककडून आपल्याला चांगली वागणूक दिली जात असल्याचा प्रचार करण्यात आला आहे. या व्हिडिओत जाधव यांनी आपण अजूनही भारतीय नौदलाचा अधिकारी असल्याचे म्हटले आहे. भारताचे म्हणणे खोटे पाडण्याचा प्रयत्न पाकने या व्हिडिओद्वारे केल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतासाठी ... Read More »

आधार कार्ड असुरक्षित वृत्ताने खळबळ

कोणत्याही व्यक्तीचे आधार कार्ड पूर्णत: सुरक्षित असून त्यातील तपशील मिळवणे कोणालाही शक्य नसल्याचा दावा केंद्र सरकारतर्फे केला जात असला तरी हा दावा खोटा ठरवणारी आणखी एक माहिती उजेडात आली आहे. ‘ट्रिब्यून इंडिया’ या वर्तमानपत्राने याविषयी पर्दाफाश करणारे वृत्त प्रसिध्द केले आहे. या वृत्तानुसार ५०० रुपयांत कोट्यवधी लोकांच्या आधार कार्डांवरील माहिती सहजपणे मिळू शकते. या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून व्हॉटस्‌ऍपवर एक ... Read More »

व्याख्यातेपदांसाठी राखीव श्रेणीतील उमेदवारांच्या यादीचा प्रस्ताव

राज्य सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाचा ओबीसी, एससी, एसटी, दिव्यांग या राखीव श्रेणीतील महाविद्यालयातील व्याख्याते पदासाठी पात्र उमेदवारांची माहिती एकत्रित करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात व्याख्याते म्हणून कार्य करू इच्छिणार्‍या वरील समाजातील विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याच्या विचारात संचालनालय आहे. उच्च शिक्षण संचालनालयाने वरील माहिती गोळा करण्यासाठी एक प्रश्‍नोत्तरी तयार केली आहे. ही प्रश्‍नोत्तरी महाविद्यालये, विद्यापीठ, शिक्षण संस्था या ठिकाणी ... Read More »

‘सीएसके’ संघात परतला धोनी

इंडियन प्रीमियर लीगच्या मोसमासाठी चेन्नई सुपर किंग्स संघात महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना व रवींद्र जडेजा यांचे पुनरागमन झाले आहे. दोन मोसमातील बंदीनंतर पुनरागमन करणार्‍या ‘सीएसके’ने या त्रिकुटाला राखत आपल्या पाठिराख्यांना सुखद धक्का दिला. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्सने आपला सर्वांत यशस्वी कर्णधार गौतम गंभीर याला सोडण्याचा निर्णय घेतला. दिल्लीनेदेखील क्विंटन डी कॉकसारख्या खेळाडूला मुक्त करून अचंबित केले. २७ व २८ जानेवारी ... Read More »

भारताची आजपासून ‘कसोटी’

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. मागील तीन वर्षांत केवळ दोन कसोटी सामने गमावलेल्या टीम इंडियाची खर्‍या अर्थाने कसोटी या मालिकेत लागणार आहे. उपखंडातील पाटा खेळट्‌ट्यांवरून दक्षिण आफ्रिकेतील वेगवान व उसळत्या खेळपट्‌ट्यांवर भारतीय संघाचे स्थित्यंतर योग्यरितीने घडले तरच मालिका चुरशीची होणे अपेक्षित आहे. शिखर धवन तंदुरुस्त ठरल्याने मुरली विजयसह तो डावाची सुरुवात करणे ... Read More »