ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 4, 2018

लांच्छन

स्वतःला पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रात पुन्हा एकवार जातीयवादाने डोके वर काढले आहे. यावेळी या संघर्षाला निमित्त झाले ते भीमा – कोरेगावच्या लढाईस दोनशे वर्षे पूर्ण झाल्याचे. दोनशे वर्षांपूर्वीच्या लढाईवरून आज दोन समुदायांमध्ये रणकंदन माजते हे अनाकलनीय तर आहेच, शिवाय वर्तमानापेक्षा इतिहासात रमण्याच्या आणि अस्मितेच्या उथळ कल्पना उराशी कवटाळण्यात पराक्रम मानण्याच्या आपल्या वृत्तीचेही निदर्शक आहे. वर्तमानातील अनेक ज्वलंत प्रश्न डोळ्यांआड करण्यासाठी समाजाने ... Read More »

‘रिलक्टंट सुपर पॉवर’कडून ‘ऍसर्टिव्ह सुपरपॉवर’कडे

शैलेंद्र देवळाणकर स्पष्ट बहुमत घेऊन साडे तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेत आले. या स्पष्ट बहुमताचा परिणाम निश्‍चितपणे परराष्ट्र धोरणावर झालेला आहे. परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय हितसंबंधांच्या संवर्धनाबरोबरच आर्थिक विकास साधतानाच परराष्ट्र धोरणाला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली गेली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये सध्या १९३ देश आहेत. हे देश म्हणजे सार्वभौम केंद्रे (सॉव्हरीन ऍक्टर) आहेत. प्रत्येक जण आपापले राष्ट्रीय ... Read More »

नौदलाचे लढाऊ विमान ‘दाबोळी’वर दुर्घटनाग्रस्त

दाबोळी येथील भारतीय नौदलाच्या विमानतळावरील धावपट्टीवर भारतीय नौदलाचे मिग-२९ के हे लढाऊ विमान काल दुर्घटनाग्रस्त झाले. काही तांत्रिक बिघाडामुळे सदर लढाऊ विमान धावपट्टीबाहेर घसरल्याने त्याने पेट घेतला. सुदैवाने वैमानिकाने प्रसंगावधान राखून आपत्कालीन यंत्रणेद्वारे विमानातून बाहेर उडी मारण्यात यश मिळविल्याने तो किरकोळ जखमांवर बचावला. त्याच्यावर नौदलाच्या येथील हॉस्पिटलात उपचार चालू असून तो सुखरूप असल्याची नौदल अधिकार्‍यांनी माहिती दिली. या विमानाला अशा ... Read More »

डयुरप्पांना लिहिलेल्या पत्रात गोव्याचे हित जपले ः पर्रीकर

म्हादईप्रश्‍नी मी कर्नाटकमधील भाजप नेते बी. येडियुरप्पा यांना जे पत्र लिहिले आहे त्या पत्रातून मी गोव्याचे हितच जपले असून गोव्याचे नुकसान होईल असे काहीही त्या पत्रात नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. या पत्रावरून जे लोक सध्या गदारोळ करीत आहेत त्यांनी प्रथम हे पत्र काळजीपूर्वक वाचण्याची गरज आहे, असे पर्रीकर म्हणाले. म्हादई लवादाच्या कक्षेबाहेर जाऊन गोव्यातून ... Read More »

शांताराम शिरोडकर यांच्या पुतण्याने दिली खुनाची कबुली

कुयणामळ-सांगे येथील शांताराम शाणू शिरोडकर (७३ वर्षे) याचा खून आपणच केल्याची कबुली संशयित म्हणून पोलीस कोठडीत असलेला शांताराम यांचा पुतण्या जय शिरोडकर याने काल दिली. जय याच्या कबुली जबाबानुसार २३ डिसेंबर रोजी शांताराम शिरोडकर हे आपल्या काजू बागायतीत गेले होते. त्यावेळी जय शिरोडकर याने घराशेजारी कचर्‍याला भरदुपारी आग लावली होती. ती आग दुपारच्या वेळी असल्याने आटोक्यात न येता ती शांताराम ... Read More »

स्टेडियमसाठी जीसीएला जमीन देण्याचा गोवा सरकारचा निर्णय

धारगळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी क्रीडा नगरीसाठी संपादित केलेल्या जागेतील १,८९००० चौ. मी. एवढी जमीन गोवा क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे स्टेडियम उभारण्यासाठी बीसीसीआय गोवा क्रिकेट असोसिएशनला निधी देणार असल्याची माहितीही पर्रीकर यांनी यावेळी दिली. या संबंधी अधिक माहिती देताना उभयतांनी ... Read More »

गोव्यात पक्ष्यांच्या ५०० प्रजाती

इवल्याशा गोव्यात पक्ष्यांच्या तब्बल ५०० प्रजाती असून गोव्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे, असे वन खात्यातील सूत्रांनी खोतीगाव-काणकोण येथे १२ ते १४ या दरम्यान होणार असलेल्या राज्य पक्षी महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या भारतात पक्ष्यांच्या १२५० प्रजाती आहेत. त्यापैकी जवळ जवळ निम्म्या म्हणजेच ५०० प्रजाती छोट्याशा गोव्यात असणे हे गोवा जैव विविधतेच्या दृष्टीने किती समृद्ध आहे हे ... Read More »

हिंसक घटनांनंतर महाराष्ट्र बंद मागे

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ भारिपा बहुजन महासंघाने विविध संघटनांच्या सहकार्याने पुकारलेला एका दिवसाचा महाराष्ट्र बंद काल मागे घेण्यात आल्याचे महासंघाचे प्रमुख डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये रास्ता-रेल रोको तसेच जाळपोळीसारख्या घटनांसह राज्यात जनजीवन विस्कळीत बनले असल्याचे वृत्त असले तरी हा बंद शांततापूर्ण झाल्याचा दावा डॉ. आंबेडकर यांनी केला. दरम्यान बंद मागे घेतल्यानंतरही सावधगिरी म्हणून प्रशासनाने आज ... Read More »

न्यूझीलंडने जिंकली टी-२० मालिका

कॉलिन मन्रोच्या विक्रमी तिसर्‍या टी-२० शतकाच्या बळावर न्यूझीलंडने तिसर्‍या व शेवटच्या टी-२० सामन्यात काल वेस्ट इंडीजचा ११९ धावांनी पराभव करत मालिका २-० अशी जिंकली. पावसामुळे दुसरा सामना रद्द करण्यात आला होता. मन्रो याने केवळ ५३ चेंडूंत १०४ धावांची खेळी करत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासात तीन शतके लगावणारा जगातील पहिला खेळाडू होण्याचा मान मिळविला. त्याच्या या झंझावाती खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ५ ... Read More »

हॉकी : गोलरक्षक श्रीजेश पुनरागमन

दुखापतीमुळे दीर्घकाळ स्पर्धात्मक हॉकीपासून दूर रहावे लागल्यानंतर भारताचा पहिल्या पसंतीचा गोलरक्षक पीआर श्रीजेश याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. गुरुवारपासून बंगळुरू येथे होणार्‍या राष्ट्रीय शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या ३३ सदस्यीय संघात त्याची निवड करण्यात आली आहे. मागील वर्षी अझलान शाह स्पर्धेदरम्यान त्याला गुडघ्याची दुखापत झाली होती. यामुळे तब्बल ८ महिने त्याला ‘ब्रेक’ घ्यावा लागला होता. यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट ... Read More »