ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 3, 2018

ट्रम्पचा दणका

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला फैलावर घेतले आणि त्याची परिणती म्हणून काल अमेरिकेकडून पाकिस्तानला दिली जाणार असलेली २५५ दशलक्ष डॉलरची मदत रोखण्यात आली. अमेरिकेच्या या पवित्र्यामुळे गडबडून गेलेल्या पाकिस्तानच्या मदतीला लगोलग चीन उभा राहिला आणि पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध कशी ‘बलिदाने’ दिली आहेत, त्याची गाथा चीनच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने वाचली. या सार्‍या घडामोडीचे भारताच्या दृष्टीने ... Read More »

मुत्सद्दी खेळीमागची कारणमीमांसा

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) तेल अविव्ह येथील दूतावास जेरुसलेमला हलवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचे जागतिक पटलावर तीव्र पडसाद उमटले आहेत. अमेरिकन आदेशाचा निषेध करून तो नामंजूर करवण्यासाठी अलीकडेच संयुक्त राष्ट्रसंघांच्या आम सभेत इजिप्तने एक नकारात्मक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाच्या समर्थनार्थ भारताने मतदान केले. या विषयात भारताच्या मुत्सद्दीपणाचा कस लागणार आहे.. अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी इस्त्रायलच्या तेल अविव्हमधे असलेला त्यांचा दूतावास जेरूसलेमला हलविण्यासंबंधी ... Read More »

हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक

पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी झालेला हिंसाचार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याबद्दलच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या हिंसाचाराला हिंदू एकता आघाडी जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला असून आजच्या बंदला विविध राजकीय पक्षांसह सुमारे २५० संघटनांनी पाठिंबा दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बंदच्या काळात लोकांनी शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी ... Read More »

केंद्राच्या प्रस्तावित विधेयकाविरुद्ध पणजीत डॉक्टरांकडून निदर्शने

इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा शाखाने केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध केला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या विधेयकाच्या विरोधात काल आयोजित देशव्यापी बंदमध्ये राज्यातील असोसिएशनशी संलग्न डॉक्टारांनी सहभागी होऊन बारा तास वैद्यकीय सेवा स्थगित ठेवली. केंद्र सरकारचे नवीन विधेयक ऍलोपॅथी डॉक्टरांना मारक आहे, असा दावा आयएमएच्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. अजय पेडणेकर यांनी केला. केंद्र सरकार या विधेयकाच्या माध्यमातून ... Read More »

राज्यात ईडीसीने तयार केले सहा हजार उद्योजक ः कुंकळयेकर

मुख्यमंत्री रोजगार योजनेखाली आर्थिक विकास महामंडळाने आतापर्यंत गोव्यात सहा हजार उद्योजक तयार केले असून ६३ कोटी रु. एवढे कर्ज २ टक्के व्याजदराने वितरित केले आहे, अशी माहिती ईडीसीचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ईडीसीच्या कर्जाच्या वसुलीची टक्केवारीही चांगली असून ती ९३ टक्के एवढी असल्याची माहितीही कुंकळ्येकर यांनी यावेळी दिली. ईडीसीने जास्तीत जास्त कर्ज हे गोव्यातील पारंपरिक उद्योग ... Read More »

खनिज उत्खननात घट

राज्यातील खनिज उत्खननात चालू हंगामात तीन महिन्यांत घट नोंद झाली आहे. राज्यात डिसेंबर २०१७ पर्यत ६.८ दक्षलक्ष टन खनिजाचे उत्खनन करण्यात आले आहे, अशी माहिती खाण खात्याच्या सूत्रांनी दिली. गतवर्षी डिसेंबर २०१६ अखेर ७.५ दक्षलक्ष टन खनिजाचे उत्खनन करण्यात आले होते. राज्यातील खाण घोटाळा उघडकीस आल्यानंतर खनिज उत्खननावर बंदी घालण्यात आली होती. दोन वर्षापूर्वी खनिज उत्खननावरील बंदी मागे घेतल्यानंतर खनिज ... Read More »

खोतीगाव अभयारण्यात पक्ष्यांच्या २४० प्रजाती

>> दुसर्‍या गोवा राज्य पक्षी महोत्सवाची तयारी जोरात काणकोण तालुक्यातील खोतीगाव अभयारण्यात येत्या १२ ते १४ दरम्यान होणार्‍या दुसर्‍या पक्षी महोत्सवासाठीची तयारी सध्या जोरात सुरू असल्याची माहिती वन खात्यातील सूत्रांनी दिली. यंदाचा महोत्सव भव्य स्वरुपाचा असेल असे सांगण्यात आले. खोतीगाव अभयारण्यात पक्ष्यांच्या २४० प्रजाती असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. खोतीगावात पक्ष्यांच्या २४० प्रजाती पक्षी महोत्सवासाठी खोतीगाव अभयारण्याचीच निवड का करण्यात आली ... Read More »

कॉंग्रेस विधीमंडळ बैठकीत म्हादई प्रश्‍नावर चर्चा

कॉँग्रेस विधीमंडळ गटाच्या कालच्या बैठकीत म्हादई नदीतील पाणी पिण्यासाठी कर्नाटकाला देण्याच्या प्रश्‍नावर द्विपक्षीय चर्चा करण्यास आक्षेप घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हादई नदीतील पाणी पिण्यासाठी देण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करण्याची तयार असल्याचे पत्र कर्नाटकातील भाजपचे नेते येडियुरप्पा यांना दिल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मंगळवारी पर्वरी येथे घेण्यात आलेल्या कॉँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीत म्हादई प्रश्‍नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ... Read More »

एटीकेसमोर गोव्याचे कडवे आव्हान

इंडियन सुपर लीगच्या चौथ्या मोसमात नववर्षातील पहिल्या लढतीत बुधवारी ऍटलेटिको दी कोलकातासमोर (एटीके) एफसी गोवा संघाचे आव्हान असेल. एटीकेने दोन सामने जिंकले आहेत, पण गोव्याने कमी सामन्यांत सरस कामगिरी करीत घणाघाती फॉर्मचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे एटीकेला कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. एटीकेने सलग तिसरा विजय मिळविला तर त्यांच्या मोहिमेला आणखी बळकटी येईल, पण गोव्याचा संघ एफसी पुणे सिटीविरुद्धच्या पराभवातून ... Read More »

शारापोवाची आगेकूच

पाचवेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या मारिया शारापोवाने पिछाडीवरून मुसंडी मारत शेनझेन ओपन स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत अमेरिकेच्या ऍलिसन रिस्के हिचा ३-६, ६-४, ६-२ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. हा सामना सुमारे अडीच तास चालला. शारापोवाने ३४ विजयी फटके लगावताना ११ बिनतोड सर्व्हिसेस केल्या. जागतिक क्रमवारीत ५९व्या स्थानावरील शारापोवाने दहापैकी ७ ब्रेक पॉईंट्‌स देखील वाचवले. अंतिम आठमध्ये तिचा सामना कझाकस्तानच्या झरीना दियास ... Read More »