ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 2, 2018

रजनीचे राजकारण

दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत आता सक्रिय राजकारणात उतरणार आहे. तशी घोषणा त्याने नुकतीच केली. ‘बदलाची वेळ आलेली आहे आणि मी आज निर्णय घेतला नाही तर अपराधी ठरेन’ असे सांगत त्याने तामीळनाडूत राजकीय व्यवस्था परिवर्तनाची ग्वाही दिली आहे. अशा प्रकारचा स्वप्नाळू आदर्शवाद सहजासहजी प्रत्यक्षात उतरवायला राजकारणाचे क्षेत्र म्हणजे काही चित्रपट नव्हे हे जरी खरे असले तरी चित्रपटांच्या दुनियेत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्यावर भोवतीचे ... Read More »

मुंबईत गेले ते बेङ्गिकिरीचेच बळी

ऍड. असीम सरोदे मुंबईमधील कमला मिल आवारातील रेस्टॉरंटस्‌मध्ये घडलेले अग्निकांड हे आपल्या यंत्रणेच्या बेङ्गिकीरीचे नवदर्शन घडवणारे उदाहरण आहे. यानंतर काही ठिकाणी बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्यात येत असली तरी ती तोंडदेखली असते हे आता सामान्यांनाही ज्ञात झाले आहे. प्रत्यक्षात राजकीय वरदहस्ताने आणि प्रशासनाच्या कृपेने बेकायदेशीर व्यवसाय सर्रास सुरू असतात. भारतामध्ये आग लागून दुर्घटना घडण्याच्या घटना नव्या नाहीत. ङ्गटाके निर्मिती करणार्‍या कारखान्यांमध्ये ... Read More »

गोमेकॉत पहिल्या दिवशी पावणेतीन लाख शुल्क वसूल

सरकारने गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल आणि तीन प्रमुख सरकारी हॉस्पिटलमध्ये कालपासून स्थानिकांना आरोग्य कार्ड सक्तीचे करून परप्रांतीय रूग्णांना शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. गोमेकॉतून पहिल्या दिवशी २.७ लाख रूपयांचा महसूल या शुल्कापोटी प्राप्त झाला आहे. शुल्क लागू करण्याच्या पहिल्या दिवशी २४ टक्के परप्रांतीय रूग्णांना वॉर्डमध्ये उपचारार्थ दाखल करून घेण्यात आले आहे. तसेच १९ टक्के परप्रातियांनी ओपीडीमध्ये तपासणी करून घेतली आहे. ... Read More »

पाकला आर्थिक मदत देणार नाही ः ट्रम्प

भविष्यात पाकिस्तानला कोणतीही आर्थिक मदत न देण्याचे संकेत अमेरिकेने दिले आहेत. या संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे. गेल्या १५ वर्षांपासून अमेरिकेने पाकिस्तानला सातत्याने आर्थिक मदत केली. मात्र त्या बदल्यात पाकिस्तानने आपल्याला कपट व फसवणुकीच्या व्यतिरिक्त आणखी काहीच दिले नाही असे ट्विट ट्रम्प यांनी काल केले आहे. ट्विटमध्ये ट्रम्प यांनी नमूद केले आहे की अमेरिकेने २०१२ ... Read More »

तरुणांना विज्ञानाची आवड लावण्यासाठी देशी भाषा वापर

>> पंतप्रधान मोदी यांचे शास्त्रज्ञांना आवाहन तरुणांच्या मनात विज्ञान व तंत्रज्ञान याविषयी आवड निर्माण करण्यासाठी देशातील संशोधकांनी देशी भाषांचा वापर करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. येथे आयोजित प्रा. सत्येंद्रनाथ बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते. प्रादेशिक भाषेत विज्ञान विषय शिकवण्याच्या कार्यात प्रा. बोस यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी विज्ञानाच्या प्रसारासाठी ‘ग्यान ओ बिग्यान’ ... Read More »

आदिवासी जमीन मालकी संदर्भात मंत्री गावडे केंद्रीय मंत्र्यांना भेटणार

जमीन हक्क कायद्याखाली राज्यातील आदिवासी जमीन मालकीचा हक्क (सनद) देण्याच्या प्रक्रियेत येणार्‍या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री जी. ओरम, आदिवासी राज्य मंत्री सुदर्शन भागवत यांची आपण दिल्ली येथे भेट घेणार आहे, अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी काल दिली. सरकारी पातळीवर आदिवासी समाजातील नागरिकांना जमीन मालकीचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आदिवासी समाजातील नागरिकांनी दाखल ... Read More »

तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत मांडणार

लोकसभेत अलीकडेच संमत झालेले तिहेरी तलाकला गुन्हा ठरवून पतीला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची तरतुद करणारे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. मुस्लिम समाजात तीन वेळा तलाक शब्द उच्चारून पत्नीला घटस्फोट दिल्यास तो गुन्हा ठरवून तो गुन्हा करणार्‍या पतीला तीन वर्षे तुरुंगवास ठोठावण्याची तरतूद या विधेयकात आहे. मुस्लिम महिला (विवाह विषयक हक्क संरक्षण) विधेयक असे या विधेयकाचे नाव असून कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद ... Read More »

‘सुपर मून’ बद्दल सतर्कतेचा इशारा

महसूल खात्याने सूपर मूनमुळे २ जानेवारीला समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने सर्तकतेचा इशारा दिला आहे. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या संस्थेने सुपर मूनमुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. २ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ आणि रात्री ११ ते मध्यरात्री २ (दुसरा दिवस) या काळात भरतीमुळे समुद्रातील पाण्याची पातळी वाढणार आहे. वरील इशार्‍यामुळे ... Read More »

‘आप’नेच भाजपबरोबर युती केली होती ः गोवा फॉरवर्ड

गोवा फॉरवर्ड पक्षाने नव्हे तर आम आदमी पार्टीनेच भाजपबरोबर छुपी निवडणूकपूर्व युती केली होती. ही युती करून बिगर भाजप मतांची विभागणी करण्याची त्यांची योजना होती. गोवा फॉरवर्ड पार्टी जर रिंगणात नसती तर आम आदमी पार्टीला सुमारे २० टक्के मते मिळाली असती व त्याचा फायदा होऊन भाजपला कमीत कमी २१ जागा मिळाल्या असत्या, असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख प्रवक्ते ट्रोजन डिमेलो ... Read More »

मांडवीतील क्रूज बोटींवरील प्रखर विद्युत झोतांवर बंदी घाला

>> वाहतूक खात्याचे बंदर कप्तानांना पत्र मांडवी नदीत पर्यटक व इतरांची सफारी करणार्‍या क्रुज बोटीवर वापरल्या जाणार्‍या उच्च दाबाच्या ट्रेसर, फोकस लाईट्‌समुळे मांडवी पूल आणि बांदोडकर मार्गावरील वाहन चालकांना धोका संभवतो. क्रूज बोटीवर वापरल्या जाणार्‍या या लाईट्‌सवर कारवाई करून बंदी घालावी, अशी सूचना करणारे पत्र वाहतूक खात्याने बंदर कप्तान खात्याला पाठविले आहे. मांडवी नदीत पर्यटकांची जलसफारी करणार्‍या क्रूज व इतर ... Read More »