ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 1, 2018

‘बॉय’ सुटला कसा?

दक्षिण गोव्यात काही वर्षे सातत्याने घडत आलेल्या धार्मिक प्रतीकांच्या मोडतोडीमागील एकमेव चेहरा म्हणून पोलिसांनी ज्याला पुढे केले होते, त्या फ्रान्सिस झेवियर परेरा ऊर्फ ‘बॉय’ या मोरायले, कुडचडे येथील मध्यमवयीन गृहस्थाला त्यासंदर्भातील एखाददुसरे वगळता बहुतेक सर्व प्रकरणांतून निर्दोष सोडण्यात आले आहे. केवळ त्याने पोलिसांना कोठडीत असताना दिलेल्या जबाबावर आधारलेल्या या आरोपांचा शेवट हा असाच होणार हे भाकीत त्याला सनसनाटी अटक झाली ... Read More »

‘अँटी इन्कम्बन्सी’ची अपरिहार्यता

ल. त्र्यं. जोशी (नागपूर) सरकारने विकासाची भरपूर कामे केली असली आणि त्याचे बदलीचे काम केले नसेल तर सरकारचे काम त्याच्या दृष्टीने शून्य असते. व्यवस्थेच्या मूल्यांकनाची ही पध्दती जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत अँटी इन्कमबन्सीला मरण नाही. अँटी इन्क्मबन्सीचे हे सूत्र लक्षात घेतले तर २२ वर्षांच्या सत्ताकाळानंतरही गुजरातमधील भाजपाच्या विजयाचे महत्त्व अधोरेखित होते… प्रस्थापित विरोधवाद हा तेवढाच कठीण शब्द आहे, जेवढा त्या ... Read More »

काश्मीरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका प्रशिक्षण केंद्रावर रविवारी पहाटे दहशतवादी घुसून त्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले. दहशतवादी व भारतीय जवान यांच्यात त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादीही ठार झाले. उरी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. जैश ए महम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वृत्त आहे. अशा हल्ल्याची ... Read More »

सरकारी इस्पितळात आजपासून परप्रांतियांना शुल्क लागू होणार

>> स्थानिकांना आरोग्य कार्डची सक्ती बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल (गोमेकॉ), म्हापसा आणि मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटल आणि फोंडा येथील उपजिल्हा हॉस्पिटल या चार सरकारी हॉस्पिटलमध्ये सोमवार १ जानेवारी २०१८ पासून स्थानिकांना आरोग्य कार्ड बंधनकारक करण्यात आले असून परप्रांतीय रूग्णांना शुल्क लागू होणार आहे. स्थानिकांना कार्ड नसल्यास उपचारांसाठी अन्य पुरावा सादर करावा लागणार आहे. सरकारने सरकारी प्रमुख हॉस्पिटलमध्ये मोफत ... Read More »

गोव्याच्या आयटी धोरणाची केंद्रीय मंत्री प्रभूंकडून प्रशंसा

केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी गोवा सरकारच्या आयटी धोरणाची प्रशंसा केली आहे. गोव्यातील स्टार्ट अप उद्योजकांच्या उत्पादनाना चांगले मार्केट मिळवून दिले जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री प्रभू यांनी दिले. तसेच गोव्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांना स्वित्झर्लंड आयोजित डाव्होस शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण प्रभू यांनी दिले आहे. सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान खात्याने केंद्रीय मंत्री प्रभू ... Read More »

रस्त्यावरच ड्रग्स विकणार्‍या विदेशीला काणकोणात अटक

सरते वर्ष आणि नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटण्यासाठी काणकोणच्या पाळोळे, होवरे, पाटणे समुद्र किनार्‍यांवर देशी आणि परदेशी पर्यटकांची अक्षरश: रीघ लागली असून त्याचा फायदा उठवित अंमली पदार्थाच्या व्यवहारात असलेल्या काही परदेशी व्यक्तींनी राजरोसपणे याठिकाणी अमली पदार्थ विकायला सुरूवात केली आहे. काणकोण पोलिसांच्या सतर्कतेमुळे शनिवार दि. ३० रोजी मध्यरात्री एका केनियन नागरीकाला एका दुचाकीचा वापर करून अंमली पदार्थ विकताना काणकोणचे पोलिस उपनिरीक्षक ... Read More »

विर्डी धरणाच्या बांधकामासाठी महाराष्ट्राकडून पुन्हा चाचपणी

गेली दोन वर्षे बंद असलेले विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्राने चाचपणी सुरू केलेली असून नवीन वर्षात कामाला गती देण्याचा निर्धार महाराष्ट्राने केल्याने गोव्याला दुहेरी संकटाचा सामना करावा लागणार असल्याची भीती आहे. महाराष्ट्राचे मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यानी निधी अभावी बंद झालेल्या विर्डी धरणाच्या कामाला चालना देण्यासाठी शासनाकडून आर्थिक तरतूद व्हावी यासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरलेले असून सरकारने ... Read More »

अभिनेते रजनीकांत यांची राजकीय पक्षाची घोषणा

अखेर दक्षिण भारतीय सिने जगतातील एक दिग्गज अभिनेते सुपरस्टार रजनीकांत यांनी काल स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा करीत दक्षिणेतील चित्रपट कलाकारांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. राजकीय क्षेत्रातील आपला प्रवेश ही काळाची गरज होती आणि तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणूक आपण लढविणार असल्याचेही रजनीकांत यांनी जाहीर केले. रजनीकांत यांच्या या भूमिकेमुळे तामिळनाडूतील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे ... Read More »

कूकची आठव्या स्थानी झेप

>> आयसीसी कसोटी क्रमवारी >> विराट द्वितीय स्थानी जैसे थे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल रविवारी जाहीर केलेल्या कॅलेंडर वर्षातील शेवटच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (८९३ गुण) याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेत नाबाद द्विशतक ठोकलेल्या इंग्लंडच्या ऍलिस्टर कूक (७५९) याने नऊ क्रमांकांची मोठी उडी घेत आठव्या स्थानावर हक्क सांगितला आहे. संपूर्ण ... Read More »

रणजी ः विदर्भ जेतेपदाच्या दिशेने

रणजी करंडक स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने विदर्भने काल रविवारी भक्कम पाऊल टाकले. तिसर्‍या दिवसअखेर पहिल्या डावात ७ बाद ५२७ धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावात दिल्लीवर २३३ धावांची मोठी आघाडी घेतली. दुसर्‍या दिवसअखेर विदर्भने ४ बाद २०६ धावांपर्यंत मजल मारली होती. जाफर ६१ व अक्षय वाखारे शून्य धावांवर खेळत होते. तिसर्‍या दिवशी जाफरने संथ फलंदाजी केली. मोठ्या खेळीची जाफरकडून अपेक्षा होती. मात्र, ... Read More »