ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: January 2018

प्रश्न रोजगाराचा

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील एलडीसी आणि डेटा एंट्री ऑपरेटरच्या तात्पुरत्या पदांसाठी तब्बल दोन हजार बेरोजगारांची झालेली अतोनात गर्दी राज्यातील युवक युवतींची आरामदायी सरकारी नोकरीप्रतीची ओढ आणि खासगी क्षेत्रातील अल्प वेतनावरील शोषण या गोष्टींकडे अंगुलीनिर्देश करते आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ही नोकरभरती केवळ ६४ पदांसाठी, पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची आणि तीही नियमित कर्मचार्‍यांच्या रजेच्या काळापुरती होती. तरीही दोन हजारांहून अधिक इच्छुक तरूण तरूणींनी ... Read More »

‘पद्मावत’च्या निमित्ताने झुंडशाहीला चपराक

ऍड. असीम सरोदे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे; पण त्यातून कुणाची बदनामी करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारची बदनामी होत असेल तर अब्रुनुकसानीचा कायदा आहे. पण केवळ भावना दुखावल्या म्हणून रस्त्यावर येऊन तोडङ्गोड करणे, सार्वजनिक साधनसंपत्तीची नासधूस करणे ही झुंडशाही लोकशाहीला मान्य नाही. ‘पद्मावत’ला मिळालेले यश पाहता लोकांनीच या झुंडशाहीला सणसणीत चपराक दिली आहे. गेल्या जवळपास महिन्याभरापासून ‘पद्मावत’ (मूळ नाव ... Read More »

सरकारी कार्यालयांत फक्त डिजिटल पेमेंटच स्वीकारणार

सरकारी कार्यालयात १ ऑक्टोबर २०१८ नंतर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. सरकारने डिजिटल पध्दतीची १०० टक्के कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी कार्यालयांत पेमेंटसाठी डिजिटल मशीन उपलब्ध केली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिली. नार्बाडच्या स्टेट फोकस पेपरच्या प्रकाशन समारंभात मुख्यमंत्री पर्रीकर बोलत होते. डिजिटल पेमेंट पध्दत भ्रष्टाचार रोखण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सरकारकडून करण्यात आलेले पेमेंट ... Read More »

म्हादईप्रश्‍नी अपयशामुळे मुख्यमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा ः कॉंग्रेस

म्हादईप्रश्‍नी भाजप सरकारला पूर्ण अपयश आलेले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काल कॉंग्रेसचे नेते ऍड. रमाकांत खलप व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पत्रकार परिषदेत केली. गेल्या २०१२ सालापासून भाजप सरकार राज्यात सत्तेवर आहे. मात्र, कर्नाटक सरकार कणकुंबी येथे कालव्याचे काम करीत असताना भाजप सरकारने केवळ बघ्याची भूमिका घेतली आणि त्याचाच फायदा उठवत कर्नाटक सरकारने कालव्याचे ... Read More »

मडगावात हायस्कूलच्या प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांला जबर मारहाण

>> विद्यार्थी इस्पितळात दाखल ः तक्रार नोंद येथील लॉयोला हायस्कूलमध्ये आठवीत शिकणार्‍या फ्रेनेल फर्नांडिस या १३ वर्षीय विद्यार्थ्याला हायस्कूलच्या प्राचार्यांनीच बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याने त्याच्यावर हॉस्पिसियु हॉस्पिटलात उपचार करण्याची पाळी आली आहे. त्या मुलाचे वडील फेलिक्स फर्नांडिस यांनी हायस्कूलचे प्राचार्य बाझील वेगो यांच्या विरोधात मडगाव पोलीस स्टेशनवर तक्रार केली आहे. मारहाणीची घटना दि. २७ जानेवारी रोजी घडली. त्यादिवशी फ्रेनल ... Read More »

नाबार्डच्या गोवा फोकस पेपरचे प्रकाशन

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या गोवा स्टेट फोकस पेपरचे प्रकाशन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल करण्यात आले आहे. गोवा सरकारसाठी २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी एकूण क्रेडिट क्षमता ७४१३.३४ कोटी निश्‍चित करण्यात आली आहे. यात शेतीला १४ टक्के, एमएसएमईसाठी ५२ टक्के आणि सहा प्रायोरिटी विभागासाठी ३४ टक्के निधी निश्‍चित केला आहे. ‘पाणी सर्ंवधन – ... Read More »

‘त्या’ उमेदवारांना मुलाखतींसाठी संधी

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने कंत्राटी तत्त्वावरील कनिष्ठ कारकून आणि डेटा एन्ट्री ऑपरेटरच्या जागांसाठी २९ रोजी आयोजित मुलाखतीची संधी हुकलेल्या इच्छुक उमेदवारांना मुलाखतीची नोंदणी करण्यासाठी २ व ३ फेब्रुवारीपर्यत मुदत वाढविली आहे. तसेच बुधवार ३१ रोजी सकाळी डेटा एन्ट्री पदासाठी अर्ज स्वीकारून मुलाखतीसाठी टोकन दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी काल दिली. उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कंत्राटी पध्दतीवरील ... Read More »

प्रायोगिक तत्त्वावरील पहिल्या इलेक्ट्रीक बसचा शुभारंभ

राज्यातील पहिल्या इलेक्ट्रीक बसगाडीचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते पणजी कदंब बसस्थानकावर काल करण्यात आले आहे. यावेळी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार कार्लुस आल्मेदा व इतर मान्यवर उपस्थित होते. कदंब महामंडळातर्फे दीड महिना ही बसगाडी प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणार आहे. हैदराबाद येथील गोल्डस्टोन इन्फ्रोटेक कंपनीने ही बसगाडी कदंब महामंडळाला प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी उपलब्ध केली ... Read More »

यशवंत सिन्हांच्या ‘राष्ट्र मंच’मध्ये शत्रुघ्न सिन्हांसह अनेकांचा सहभाग

भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ‘राष्ट्र मंच’ या राजकीय कृती गटाची स्थापना केली असून त्यात भाजपचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील काही राजकीय नेत्यांनी प्रवेश केला आहे. राष्ट्र मंच हा बिगर पक्ष राजकीय गट असल्याचे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. यशवंत सिन्हा यांच्या या नव्या राजकीय मंच स्थापना सोहळ्यावेळी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी, कॉंग्रेसच्या ... Read More »

कापशेत शेकडो खनिजवाहू ट्रक अडविल्याने तणाव

कापशे येथील खनिज मालाच्या जेटीवर माल उतरविण्यास जाणारे किर्लपाल पंचायतक्षेत्रातील सुमारे ५०० ट्रक काल सावर्डेतील संतप्त ट्रक मालकांनी अडविल्याने तणाव निर्माण झाला. सावर्डेतील ट्रकमालकांना खनिज वाहतुकीचे योग्य प्रमाणात काम मिळत नसल्याने हे ट्रकमालक संतप्त झाले आहेत. किर्लपालमधील ३०० ट्रकांना हे काम देण्यात आल्याने सावर्डेतील ट्रकमालक नाराज बनले आहेत. यावेळी सुमारे पाचशे ट्रक जेटीवर होते. त्यानंतर कुडचडे पोलीस निरीक्षक रविंद्र देसाई ... Read More »