ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: December 7, 2017

अयोध्या ः २५

अयोध्येतील वादग्रस्त बाबरी ढॉंचा पाडला गेल्याला काल बरोबर २५ वर्षे पूर्ण झाली. एकेकाळी प्रभू श्रीरामांची राजधानीची नगरी असलेल्या, परंतु आजच्या काळात एक छोटेसे गाव बनून राहिलेल्या अयोध्येतील त्या जुन्यापुराण्या वास्तूच्या विद्ध्वंसाने या देशामध्ये जो धार्मिक, सामाजिक आणि राजकीय उत्पात घडवला, त्यामुळे आज पंचवीस वर्षांनंतरही त्या विषयाची धग ओसरलेली नाही. अजूनही मूळ विषय न्यायप्रवीष्ट आहे आणि येत्या फेब्रुवारीपासून त्याची पुन्हा एकवार ... Read More »

पश्‍चिम आशियामध्ये नवी ठिणगी!

शैलेंद्र देवळाणकर डोनाल्ड ट्रम्प यांंनी एक वादळी निर्णय घेऊन इस्रायल – पॅलेस्टाईन संघर्षामध्ये मोठी ठिणगी टाकली आहे. जेरुसेलम या शहराला इस्राईलची राजधानी घोषित करून अमेरिकेने आपला दूतावास तेल अविववरुन जेरुसेलमला हलवला आहे. हा निर्णय दूरगामी परिणाम करणारा ठरेल… अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्तापदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत क्रांतिकारक स्वरुपाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयांमुळे ... Read More »

सौर ऊर्जा धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

>> हे धोरण म्हणजे एक हरीत पर्याय ः मुख्यमंत्री पर्रीकर मंत्रिमंडळ बैठकीत गोवा राज्य सौर ऊर्जा धोरण २०१७ ला मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी काल पत्रकार परिषदेत सांगितले. अत्यंत चांगले व अमलात आणता येईल असे हे धोरण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे धोरण म्हणजे एक हरित पर्याय असून एकदा सौर ऊर्जेला राज्यात चालना मिळाली की औष्णिक विजेचे प्रमाण ... Read More »

सैन्याला राजकारणापासून अलिप्त ठेवावे ः लष्करप्रमुख

सैन्यातही आता काही प्रमाणात राजकारण सुरू झाले असून सैन्याला नेहमी राजकारणापासून अलिप्त ठेवायला हवे. सशक्त लोकशाहीसाठी ही बाब महत्वाची असल्याचे मत देशाचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी येथील एका समारंभात बोलताना व्यक्त केले. या विषयावर अधिक मतप्रदर्शन करताना रावत यांनी सांगितले की, आतापर्यंत आम्ही सैन्य दलांमध्ये बर्‍याच प्रमाणात धर्मनिरपेक्ष वातावरण ठेवले आहे. मात्र अलीकडे सैन्यात काही प्रमाणात राजकारणाचा समावेश होऊ ... Read More »

मच्छिमारी खाते मुख्यमंत्र्यांनी घ्यावे

>> सबसिडीप्रश्‍नी गोवा फिशरमेन फोरमची मागणी गोवा फॉरवर्ड पार्टी राज्यातील मच्छिमारांना संपवू पाहत आहे. राज्यातील मच्छिमार आर्थिक संकटात असताना मच्छिमारी खात्याचे मंत्री विनोद पालयेकर हे मच्छिमारांना मिळणारी सबसिडी बंद करण्याच्या गोष्टी करत असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विनोद पालयेकर यांचे मच्छिमारी खाते काढून घेऊन ते स्वतःकडे ठेवावे, अशी मागणी काल ‘गोवा फिशरमेन फोरम’ने पत्रकार परिषदेत केली. मडगांव घाऊक मासळी बाजार ... Read More »

१९ लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर काल सकाळी उतरलेल्या एअर इंडियाच्या विमानात एका आसनावर सापडलेल्या बेवारस पाकिटातील १९ लाख रुपये किमतीची ६ सोन्याची बिस्किटे कस्टम अधिकार्‍यांनी जप्त केली. याविषयी वृत्त असे की, कस्टम विभागाचे हवाई गुप्तहेर विभागाचे अधिकारी काल सकाळी एअर इंडिया फ्लाईट (एआय – ९९४) मध्ये तपास करीत असताना एका आसनावर त्यांना एक पाकिट नजरेस पडले. या अधिकार्‍यांनी हे पाकिट उघडून पाहिले असता ... Read More »

गांजा लागवडीप्रकरणी कांदोळीत दोघांना अटक

आराडी – कांदोळी येथे गांजाची शेती (कॅनाबीस प्लांट) करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. घर मालक लॅनी फिल्हो यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, गांजीच्या शेतीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. कांदोळी येथे गांजाच्या रोपट्यांची लागवड करण्यात आल्याची माहिती कळंगुट पोलिसांना मिळाली. पोलिसांनी छापा घालून १० किलो कॅनाबिस जप्त केली आहे. पोलिसांनी सुसांत साहू ... Read More »

व्यावसायिक आस्थापनांतील ७ गॅस सिलिंडर जप्त

येथील मामलेदार कार्यालय, नागरी पुरवठा कार्यालय, पोलीस आणि गॅस कंपनीचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने ताळगाव, मिरामार आणि बांबोळी येथील व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करून घरगुती वापराचे सात गॅस सिलिंडर काल जप्त केले. हॉटेल व इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. ताळगाव येथील एका हॉटेलमधून दोन सिलिंडर ताब्यात घेण्यात आले. बांबोळी येथील एका रेस्टॉरंटमधून ३ सिलिंडर ... Read More »

आयपीएल फ्रेंचायझींना राखता येणार पाच खेळाडू

लिलावापूर्वी प्रत्येक सहभागी फ्रेंचायझीला केवळ पाच खेळाडूंना राखता येणार आहे. आपल्या संघातील खेळाडूला राखण्यासाठी लिलावादरम्यान ‘राईट टू मॅच’चा पर्यायही फ्रेंचायझींसमोर ठेवण्यात आला आहे. आयपीएलची संचालन परिषद व सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समिती सदस्यांच्या संयुक्त बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. लिलावासाठीची प्रत्येक फ्रेंचायझीसाठीची रक्कम ६६ कोटींवरून (२०१६ व २०१७ लिलाव) वाढवून ८० कोटींपर्यंत करण्यात आली आहे. चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल्स ... Read More »

दिल्ली कसोटी अनिर्णित

>> भारताने मालिका जिंकली नवोदित धनंजय डीसिल्वा (११९, जखमी निवृत्त), पदार्पणवीर रोशन सिल्वा (नाबाद ७४) यांना कर्णधार दिनेश चंदीमल (३६) व निरोशन डिकवेला (नाबाद ४४) यांनी तोलामोलाची साथ देत भारताविरुद्धची तिसरी कसोटी अनिर्णित राखली. भारताला अखेरच्या दिवशी ७ गड्यांची आवश्यकता होती. परंतु, यजमानांना श्रीलंकेचे केवळ दोनच गडी बाद करता आले. कोलकाता कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर नागपूर कसोटीत डावाने विजय मिळविल्यामुळे भारताने ... Read More »