ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: December 6, 2017

पणजी व परिसरातील नागरीक पाणी तुटवड्यामुळे हैराण

राजधानी पणजीच्या विविध भागातील सर्व सामान्य नागरीक तिसर्‍या दिवशी पाण्याच्या तुटवडयामुळे पुरते हैराण झाले. पाटो आणि मळा पणजी येथे जलवाहिनी बदलण्याचे काम पूर्ण केल्यानंतर सोमवार ४ रोजी संध्याकाळी ओपा पाणी प्रकल्पातून पाणी पुरवठ्याला प्रारंभ करण्यात आला. सुरूवाताली पाण्याचा दाब कमी होती. त्यामुळे मंगळवारी विविध भागात कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत होता. यामुळे शहर परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला. ... Read More »

बेफिकिरी भोवली

ओखी चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आल्याने दोन दिवस गोव्याच्या किनारपट्टीवर हाहाकार माजला. सुदैवाने हे चक्रीवादळ गोव्याकडे न सरकता अरबी समुद्रातून मुंबई, कच्छच्या दिशेने गेले आणि गोव्याचा मोठा धोका टळला, अन्यथा राजधानी पणजीसह किनारपट्टीवर काय घडले असते याची कल्पनाही करवत नाही. दक्षिण भारतातील तामीळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये या वादळाने हाहाकार माजविलेला आहे. समुद्राच्या पाण्याच्या या वाढलेल्या पातळीने त्सुनामीच्या आठवणी ताज्या केल्या. गेल्या ... Read More »

बाबासाहेबांचे विचार समजून घेताना…

ऍड. असीम सरोदे आज ६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यानिमित्ताने त्यांच्या विचारांचे, संविधानातून मांडलेल्या तत्त्वांचे अवलोकन करणे आणि ते विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. संविधानाची निर्मिती करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला विचार अभ्यासताना त्यांच्या दूरदृष्टीचे, भारतीय समाजाविषयीच्या ज्ञानाचे, सामाजिक जाणिवेचे प्रत्यंतर ठायी ठायी येते. आपण लोकांना मूलभूत स्वातंत्र्य देत आहोत, या स्वातंत्र्याचे अर्थ काय आहेत हे ... Read More »

शॅकवाल्यांच्या नुकसानीचे अहवाल सादर करा

>> मुख्यमंत्री-जिल्हाधिकारी बैठकीत अधिकार्‍यांना आदेश : महसूलमंत्र्यांची माहिती ओखी चक्रीवादळामुळे राज्यात समुद्राची पातळी वाढून किनारपट्टीवरील शॅक्समध्ये पाणी घुसण्याच्या ज्या घटना विविध किनार्‍यांवर घडल्या त्यामुळे शॅक्स मालकांचे नक्की किती नुकसान झाले त्याचा प्रत्यक्ष दुर्घटना स्थळी जाऊन अहवाल तयार करण्याचे आदेश काल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांबरोबर झालेल्या बैठकीत दिला असल्याचे महसूल मंत्री रोहन खंवटे यानी काल पत्रकार ... Read More »

पोलीस उपमहानिरीक्षक गुप्ता यांची दिल्लीला पाठवणी

>> कथित लाचप्रकरणी गोवा सरकारची कृती पोलीस खात्यातील एका लाचप्रकरणामुळे अडचणीत आलेले पोलीस उपमहानिरीक्षक विमल आनंद गुप्ता (आयपीएस) यांना राज्य सरकारने तडकाफडकी सेवेतून मुक्त केले आहेत. सरकारच्या कार्मिक खात्याचे अतिरिक्त सचिव यतींद्र मराळकर यांनी यासंबंधीचा आदेश काल जारी केला आहे. गुप्ता यांना केंद्रीय गृह मंत्रालयाशी संपर्क साधण्याची सूचना करण्यात आली आहे. गुप्ता यांच्याकडील किनारी सुरक्षा विभागाचा अतिरिक्त ताबा पोलीस महानिरीक्षक ... Read More »

नव्या मांडवी पुलाचे ६६ टक्के काम पूर्ण

मांडवी नदीवरील तिसर्‍या केबल स्टेड पुलाचे ६६ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून मे २०१८ पर्यत बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या पुलाच्या बांधकामाविरोधात राष्ट्रीय हरीत लवादाकडे (एनजीटी) तक्रार करण्यात आल्यानंतर सात ते आठ महिने पुलाचे बांधकाम खोळंबल्याने जीएसआयसीडीला पन्नास ते साठ कोटी रूपयांचा फटका सोसावा लागणार आहे, अशी माहिती गोवा राज्य साधन सुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर ... Read More »

गोवा मराठी व कोकणी चित्रपट महोत्सवाचे एप्रिलमध्ये आयोजन

गोवा राज्य मराठी व कोकणी चित्रपट महोत्सव एप्रिल २०१८मध्ये होणार असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ ह्या काळात बनवलेले चित्रपट ह्या महोत्सवासाठी निवडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ज्या निर्मात्यांचे चित्रपट पूर्ण होण्याच्या वाटेवर आहेत त्यानी ते पूर्ण करावेत व सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र घ्यावे व उपशिर्षके तयार करावीत. ... Read More »

सात महिन्यात ४९ हजार वाहनांची राज्यात नोंदणी

वाहतूक खात्याकडे मागील एप्रिल ते ऑक्टोंबर या सात महिन्यात ४९,२४० वाहनांची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण वाहनाचा आकडा आता १२ लाख ८७ हजार ८८४ वर पोहोचला आहे. राज्यात वाहनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील लोकसंख्या पंधरा लाखाच्या आसपास आहे. तर या आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यत राज्यातील वाहनांची संख्या सध्याची वाहन नोंदणीची गती पाहता तेरा लाखांवर पोहणार आहे. मागील सात महिन्यात ... Read More »

‘त्या’ कर्मचार्‍यांबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कर्मचारी पुरवठा सोसायटीमधील तात्पुरता दर्जा देण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना सेवेत सामावून घेण्याच्या प्रश्‍नावर जानेवारी २०१८ पर्यंत तोडगा काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पर्वरी येथे काल दिले. साबांखा कर्मचारी पुरवठा सोसायटीमधील तात्पुरता दर्जा देण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या एका शिष्टमंडळाने पर्वरी येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. तात्पुरता दर्जा देण्यात आलेल्या कर्मचार्‍याना सेवेत सामावून घेण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. या ... Read More »

टीम इंडिया विजयपथावर

तिसर्‍या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेची दुसर्‍या डावात ३ बाद ३१ अशी दयनीय स्थिती झाली आहे. भारताने विजयासाठी ४१० धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर लंकेचा दुसरा डाव कोलमडला आहे. कसोटी अनिर्णित राखण्यासाठी त्यांना आजचा संपूर्ण दिवस खेळून काढावा लागणार आहे. तर सामना जिंकून श्रीलंकेविरुद्धची मालिका २-० अशी खिशात घालण्यासाठी टीम इंडियाला आज शेवटच्या दिवशी ७ गडी बाद करावे लागतील. भारताच्या पहिल्या डावातील ... Read More »