ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: December 5, 2017

राहुल पदारूढ

कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी अखेर राहुल गांधी यांच्या नावावर काल बिनविरोध शिक्कामोर्तब झाले. मागे एकदा म्हटल्याप्रमाणे अर्थातच राहुल यांच्या शिरावर हा पक्षाध्यक्षपदाचा मुकूट चढला असला तरी तो काटेरी आहे. घसरणीला लागलेल्या आपल्या पक्षाला नवी उभारणी देत दिल्लीच्या सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचे जे प्रचंड आव्हान राहुल यांच्यापुढे आज उभे आहे, त्यात त्यांच्याजवळ असलेल्या आणि भासवल्या जात असलेल्या नेतृत्वगुणांचा पुरता कस लागणार आहे. राहुल यांच्यासाठी ... Read More »

राफेल विमानसौद्याची मीमांसा

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) मोदी सरकारच्या राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी करारासंदर्भात विरोधकांनी जोरदार राजकीय आरोपांची लड लावली आहे. हा करार महागडा आहे व देशातील एका बड्या औद्योगिक समूहाला फायदा मिळवून देणारा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे… गुजरात निवडणुकींच्या रणधुमाळीच्या निमित्ताने देशाच्या संरक्षणासारख्या संवेदनशील मुद्याचे राजकीय भांडवल करून आम जनतेला भ्रमात टाकण्यासाठी मागील काही दिवसांपासून सप्टेंबर २०१६ ... Read More »

धारगळात दोन एटीएम फोडून ३० लाख चोरीस

धारगळ येथील राष्ट्रीय महामार्ग १७ वरील भर लोकवस्तीतील स्टेट बँक ऑफ इंडिया व कॉर्पोरेशन बँक या दोन बँकचे एटीएम ४ रोजी रात्री २ नंतर अज्ञातांनी फोडून एकूण ३० लाख रुपये चोरीला नेण्याचा प्रकार घडला. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धारगळ येथील दोन्ही चोर्‍या रात्रो दोन नंतर घडल्याची शक्यता वर्तवली असून, चोरट्यांनी दोन्ही एटीएम गॅस कटरने फोडले व त्यातील पैसे चोरीला नेले ... Read More »

खाणीत गाडलेल्या कामगाराला शोधण्यात अपयश

कोडली येथे वेदांता खालण कंपनीत गेल्या शनिवारी डंप कोसळल्याने गाडल्या गेलेल्या मनोज नाईक कळंगुटकर या कामगाराचा शोध सोमवारही घेण्यात आला. मात्र संध्याकाळपर्यंत शोध घेतल्यानंतर काम थांबविण्यात आले. खांडेपारवासियांनी दिवसभर खाणीच्या गेटसमोर ठाण मांडले. मात्र शोध लागला नसल्याने रात्री उशीरा माघारी परतले. मनोज नाईक कळंगुटकर याचा शोध लागेपर्यंत खनीज वाहतूक सुरू न करण्याचे आवाहन खांडेपारवासियांनी केले आहे. दरम्यान, काल दुपारी आमदार ... Read More »

शॅक व्यावसायिकांचे दुसर्‍या दिवशीही नुकसान

>> ओखी वादळ गोव्याहून सरकले गुजरातकडे : राज्यातील एकूण ८४ शॅकना लाखोंचा फटका ओखी चक्रीवादळाचा परिणाम गोव्याच्या किनारी भागांमध्ये शनिवारी रात्रीनंतर पुन्हा रविवारी रात्री तसेच सोमवारी सकाळी व संध्याकाळी बर्‍याच प्रमाणात झाल्याचे वृत्त आहे. उत्तर गोव्यात मोरजी, आश्‍वे, मांद्रे, हरमल, केरी या किनार्‍यांवर ३ रोजी रात्री १२ पासून ४ रोजी सकाळी १०पर्यंत समुद्राची पातळी वाढल्याने या किनार्‍यांवरील शॅकची आणखी नुकसान ... Read More »

…तर पणजी, दोनापावलात हाहाकार माजला असता

गेले काही दिवस केरळ व तामिळनाडू राज्यांत धुमाकूळ घातलेले ओखी चक्रीवादळ काल संध्याकाळी गोव्यातून गुजरातच्या दिशेने सरकले असून ते सौराष्ट्र व कच्छला धडकणार असल्याचे हवामान खात्याचे संचालक मोहनलाल साहू यानी काल ह्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने पुढे सरकू लागले असून त्यामुळे ह्या वादळापासून गोव्याला असलेला धोका दूर झाला असल्याचे साहू यानी स्पष्ट केले. ह्या वादळाने जर ... Read More »

किनार्‍यांवरील शॅकच्या नुकसानीचा आढावा घेणार : पर्यटनमंत्री

राज्य सरकार ओखी चक्री वादळामुळे दक्षिण आणि उत्तर गोव्यातील समुद्रकिनार्‍यावरील शॅक आणि इतर मालमत्तेचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहे, असे पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांनी काल सांगितले. ओखी चक्री वादळामुळे राज्यातील समुद्र किनार्‍यावरील शॅक व मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले आहे, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी खास अधिकार्‍याची नियुक्ती केली जाणार आहे. पर्यटन मंत्री आजगांवकर यांनी समुद्र किनार्‍यावर झालेल्या शॅक व इतर मालमत्तेच्या ... Read More »

वादळी वार्‍यामुळे वास्कोत पसरली कोळशाची भुकटी

ओखी चक्रीवादळाने गोव्याच्या किनारपट्टीला काल धडक दिली. अचानक आलेल्या वादळी वार्‍याने समुद्राला उधाण आले व वास्को शहराला या वादळी वार्‍यामुळे कोळसा प्रदूषणाचा तडाखा बसला. जोरदार वार्‍यामुळे सर्व घरांमध्ये कोळसाच कोळसा झाला. काल संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी वार्‍याने सर्व लोक भयभीत झाले. या वार्‍यामुळे केरकचरा लोकांच्या घरादारात घुसला. तसेच येथील मुरगाव बंदरातील कोळसा हवेत मिसळून सर्व वास्को शहरात विखुरला गेल्याने सर्वांच्या ... Read More »

शशी कपूर निवर्तले

हिंदी सिने सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मभूषण शशी कपूर यांचे काल प्रदीर्घ आजाराने येथील कोकिलाबेन इस्पितळात वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात कुणाल कपूर, संजना कपूर, करण कपूर असा परिवार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. सततच्या आजारपणामुळे बर्‍याच काळापासून शशीकपूर सिने सृष्टीपासून दूर होते. बाल कलाकार म्हणून १९४० पासून सिनेसृष्टीत आल्यापासून आजवर त्यांनी ११६ ... Read More »

पणजीत दोन दिवस पाणी टंचाईमुळे गैरसोय

पाटो ते मळा पणजी दरम्यान रूआ द ओरेम खाडीवरील नवीन पुलाच्या जवळील मुख्य जलवाहिनी स्थलांतरीत करण्याच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवावा लागल्याने पणजी परिसरातील नागरिकांना गेले दोन दिवस पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले. दरम्यान, जलवाहिनीच्या स्थालांतराचे काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळपासून पाणी पुरवठ्याला सुरूवात करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्ता दिलीप ढवळीकर ... Read More »