ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: December 4, 2017

दणका

दीनदयाळ स्वास्थ्य योजनेंतर्गत दाखल होणार्‍या रुग्णांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करीत असल्याच्या आरोपावरून दोनापावलाच्या एका नावाजलेल्या इस्पितळाला या योजनेतून तूर्त वगळण्याचे खमके पाऊल या योजनेची कार्यवाही करणार्‍या युनायटेड इंडिया इन्शुअरन्स कंपनी या विमा कंपनीने उचलले आहे. या इस्पितळासंबंधी अशा प्रकारच्या तक्रारी यापूर्वी वर्तमानपत्रांमधूनही करण्यात आल्या होत्या. आपल्या नियमित पडताळणीमध्ये रुग्णांच्या अशा तक्रारींत तथ्य आढळून आल्याने सदर विमा कंपनीने ही कारवाई केली ... Read More »

कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळाला?

ल. त्र्यं. जोशी फाशीसारखी शिक्षा कायद्याच्या पुस्तकात असणे गैर वाटत असले तरी समाजधारणेसाठी तिची अपरिहार्यताही मान्य करावी लागते. सुसंस्कृतपणाबद्दल आस्था असणार्‍यांनीही हे समजून घेण्याची आवश्यकता आहे… अखेर नगरच्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी बहुचर्चित कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्या अशा तिन्ही आरोपांखाली फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात समाधान व्यक्त करण्यात आले. काही ठिकाणी आनंदही ... Read More »

समुद्राला उधाण आल्याने व्यावसायिकांना लाखोंचा फटका

>> खवळलेल्या समुद्राचे पाणी जोरात घुसले शॅकमध्ये >> ओखी चक्रीवादळाचा गोव्यातही परिणाम तामिळनाडू व केरळमधील ओखी चक्रीवादळाच्या परिणामस्वरूप उत्तर व दक्षिण गोव्यातही समुद्राच्या पाण्याची पातळी शनिवारी रात्री अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याने विविध किनार्‍यांवरील शॅकमधील मालमत्तेचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. किनार्‍यांवरील शॅकमध्ये समुद्राचे पाणी घुसल्याने आतील विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, किमती फर्निचर अशा मालाचे नुकसान झाले. या प्रकारामुळे जीवितहानी झाली नसली ... Read More »

एनआरआयच्या मालमत्ता रक्षण ः कायदा दुरुस्ती प्रस्ताव

>> आगामी विधानसभा अधिवेशनात विधेयक अनिवासी भारतीय नागरिकांच्या (एनआरआय) मालमत्तेच्या रक्षणासाठी कायद्यात दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा केली असून आगामी अधिवेशनात हे दुरूस्ती विधेयक विधानसभेत सादर केले जाणार आहे, अशी माहिती नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांताक्रुज येथे काल दिली. राज्यात काही अनिवासी भारतीय नागरिकांच्या बनावट पॉवर ऑफ ऍटर्नी घेऊन त्यांच्या ... Read More »

कोडली खाणीत गाडलेल्या कामगाराचा पत्ता नाही

कोडली येथील वेदांता खाणीत शनिवारी संध्याकाळी डंप कोसळून मातीत गाडलेल्या मनोज नाईक कळंगुटकर याचा शोध शनिवारी पुन्हा घेण्यास सुरुवात झाली. मात्र संध्याकाळपर्यंत ते सापडू शकला नसल्याने सोमवारी पुन्हा शोधकार्य सुरू होणार आहे. दुर्घटनेनंतर खाणीवर जाणार्‍या सर्व गेट समोर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार काही परप्रांतीय कामगार मातीत गाडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. रविवारी सकाळपासून डंपची माती ... Read More »

गोंयच्या सायबाचे फेस्त आज

जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्ताची तयारी पूर्ण झाली असून आज सोमवार दि. ४ रोजी दिवसभर या फेस्ताची धूम जुने गोवे चर्च परिसरात चालू राहणार आहेत. यंदा दीड लाखाहूनही अधिक भाविक फेस्ताला उपस्थित राहणार असल्याची माहिती चर्चच्या सूत्रांनी दिली. गेले आठ दिवस चाललेल्या नोवेन्हा प्रार्थनासभांना लाखों भाविकांनी उपस्थिती लावून ज्येष्ठ धर्मगुरूंनी दिलेल्या उपदेशपर संदेशाचा लाभ घेतला. बासिलिका बॉम जीझसच्या ... Read More »

नोटाबंदीवरून कॉंग्रेस नेते रडकुंडीला ः पंतप्रधान

नोटाबंदीवरून कॉंग्रेसकडून केंद्रातील भाजप सरकारला विरोधकांकडून सतत लक्ष्य केले जात असतानाच काल येथील निवडणूक प्रचार सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर या विषयावरून घणाघाती टीका केली. नोटाबंदीमुळे कॉंग्रेस नेते रडकुंडीला आले अशा शब्दात मोदी यांनी खिल्ली उडवली. भ्रष्टाचार, जातीयवाद व घराणेशाही या सगळ्यांना कॉंग्रेसशी जवळचा संबंध आहे आणि त्या गोष्टीला आमचा विरोध असल्याने कॉंग्रेसने आपले धोरण आमच्या विरोधात ठेवले आहे. ... Read More »

भारताची कसोटीवर मजबूत पकड

>> कर्णधार विराट कोहलीचे सहावे द्विशतक >> श्रीलंका पहिल्या डावात ३ बाद १३१ श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने कर्णधार विराट कोहलीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक २४३ धावांच्या बळावर पहिला डाव ५३६ धावांवर घोषित केला. त्यानंतर दिवसअखेर लंकेच्या तीन फलंदाजांना १३१ धावांत बाद करत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले आहे. दिवसअखेर मॅथ्यूज ५७ आणि कर्णधार चंदीमल २५ धावांवर नाबाद आहेत. श्रीलंकेचा संघ अजूनही ४०७ धावांनी ... Read More »

टीम इंडियाच्या कर्णधारपदी पृथ्वी शॉ

पुढील वर्षी १३ जानेवारीपासून न्यूझीलंडमध्ये होणार्‍या अंडर १९ क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी मुंबई रणजी संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ याची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये या वर्षारंभी झालेल्या युथ एकदिवसीय मालिकेत ९२.६६च्या सरासरीने धावा केलेल्या शुभम गिल याच्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. हरियाणाच्या हिमांशू राणा व आसामचा लेगस्पिनर रियान पराग यांनादेखील १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. या ... Read More »

न भूतो ‘इफ्फी’

– बबन भगत यंदाच्या ‘इफ्फी’चे यश होते ते यावेळी आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या मास्टर क्लासेस, वेगवेगळे पॅनल डिस्कशन्स, ओपन फोरम आदीत. यंदा हे कार्यक्रम खर्‍या अर्थाने यशस्वी करून दाखवण्यात आले. अभिनयापासून ‘चित्रपटनिर्मिती कशी करावी’, ‘नवे तंत्रज्ञान सिनेमासाठी तारक की मारक’, ‘सिनेमाची कथा कशी फुलवावी’, ‘चित्रपटात ध्वनीचा परिणामकारकपणे कसा वापर करावा’, ‘ब्रिक्समधील चित्रपट’, ‘रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य आणि चित्रपट’, ‘चित्रपटातील व्यक्तिरेखा ... Read More »