ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: December 1, 2017

ट्रम्पकार्ड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका नुकतीच हैदराबाद येथे भारत – अमेरिकेने संयुक्तरित्या आयोजित केलेल्या जागतिक उद्योजक परिषदेसाठी येऊन गेली. इव्हांकाचे अधिकृत पद अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची विशेष सल्लागार असे आहे. हे पद विनामानधन आहे. असे असूनही जगातील सर्वांत प्रबळ राष्ट्राच्या अध्यक्षांची लाडकी कन्या असल्याने भारताने तिच्यासाठी लाल पायघड्या घातल्या. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या निवडणुकीच्या धामधुमीतून वेळ काढून निझामाच्या ... Read More »

नद्यांच्या राष्ट्रीयीकरणासंबंधीची सरकारची भूमिका

राज्यात पाच नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. या जलमार्गांच्या विकासासंबंधी भारतीय अंतर्गत जलमार्ग अधिकारिणी, मुरगाव पोर्ट ट्रस्ट आणि गोवा सरकार यांच्यात होणार्‍या करारासंदर्भात सरकारची भूमिका अशी आहे – भारतीय संविधानाच्या कलम २४६ द्वारे घटनेच्या सातव्या परिशिष्टातील पहिल्या यादीत (जिला केंद्रीय यादी संबोधले जाते) नमूद केलेल्या गोष्टींबाबत कोणतेही कायदे बनवण्याचे घटनात्मक अधिकार संसदेला आहेत. यातील नोंद क्र. २४ मध्ये संसदेने ... Read More »

बेनामी संपत्तीचा छडा आधारकार्डद्वारे लावणार : मोदी

बेनामी संपत्तीचा छडा लावण्यासाठी आधारकार्डचा वापर करण्यात येणार असून प्रसंगी भ्रष्टाचार विरोधातील लढ्याची राजकीय किंमत चुकवण्यासही आपली तयारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सांगितले. नवी दिल्लीतील ‘हिंदुस्तान टाइम्स समीट’ मध्ये बोलताना मोदींनी टीकाकारांना सडेतोड उत्तर देत भ्रष्टाचारविरोधी लढ्यापासून कदापि मागे हटणार नसल्याचा पुनरुच्चार केला. मालमत्ता व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी काळा पैसा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हे गैरप्रकार रोखण्यासाठी आधारकार्डचा वापर ... Read More »

कोलवाळ येथे साकारणार ४०० कोटींचा गृहनिर्माण प्रकल्प

गोवा गृहनिर्माण महामंडळातर्फे कोलवाळ येथे अंदाजे ४०० कोटी रुपये खर्चून १६५० फ्लॅट्‌स बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पाची निविदा येत्या ३ ते ४ महिन्यांत जारी केली जाणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांनी काल दिली. मंत्री साळगावकर यांनी मंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर कोलवाळ येथे महामंडळाच्या जागेत गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू केले. या ठिकाणी १६५० फ्लॅट्‌स उभारण्याचा आराखडा ... Read More »

  गोव्याचे माजी मुख्य सचिव जे. सी. आल्मेदा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर Read More »

तामिळनाडू, केरळात चक्रीवादळाचे ८ बळी

ओखी या चक्रीवादळाचा मोठा तडाखा तामिळनाडू व केरळ राज्याच्या किनारपट्टीला बसला आहे. आतापर्यंत या वादळाने ८ जणांचे बळी घेतले आहेत. या चक्रीवादळात झाडे कोसळून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ओखी चक्रीवादळाने दुपारनंतर लक्षद्वीप बेटांकडे कूच केले. त्यामुळे दक्षिणेकडील केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी ... Read More »

मनपाचे इमारत पायाक्षेत्रासाठी नवे शुल्क

>> जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी महानगरपालिकेच्या काल झालेल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधकामांसाठी नव्याने निश्‍चित केलेल्या पायाक्षेत्र – २०१६ नुसार शुल्काची आकारणी १ जानेवारी २०१८ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही माहिती मनपा आयुक्त अजित राय यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली, महापौर सुरेंद्र फुर्तादो यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत महानगरपालिकेच्या नवीन इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाबाबत सविस्तर माहिती नगरसेवकांना ... Read More »

पणजीत ७ ते १० दरम्यान ‘ऍक्वा गोवा’ मत्स्य महोत्सव

मच्छीमारी संचालनालयातर्फे येत्या ७ ते १० डिसेंबर दरम्यान कांपाल, पणजी येथील साग मैदानावर पहिल्या ‘ऍक्वा गोवा’ या मेगा मत्स्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. या महोत्सवात गोमंतकीयांना विविध जातीचे मासे पाहण्याची संधी मिळणार आहे. महोत्सव काळात प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ऍक्वारियम फिश ... Read More »

रंगतदार लढतीत एफसी गोवाची बंगळुरूवर मात

स्पॅनिश खेळाडू फेरान कोरोमिनासने नोंदविलेल्या या पर्वातील पहिल्या हॅट्‌ट्रिकच्या जोरावर एफसी गोवाने सात गोलांच्या थरारात रंगलेल्या सामन्यात बंगळुरू एफसीची विजयी घोडदौड ४ अशी रोखताना हीरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत घरच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर पूर्ण गुणांची कमाई केली. पहिल्या सत्राच्या ३६व्या बेंगळुरूचा प्रमुख गोलरक्षक गुरप्रीत सिंग याने एफसी गोवाच्या मान्युएल लान्झारॉतच्या डोक्यावर ठोसा मारल्याने त्याला रेफ्रीने लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर ... Read More »

जमशेदपूर-एटीके सामना आज

जमशेदपूर एफसी व ऍटलेटिको दी कोलकाता यांच्यात आज जमशेदपूर येथे इंडियन सुपर लीगमधील सामना खेळविला जाणार आहे. पदार्पण करणार्‍या जमशेदपूरचा आपल्या घरच्या मैदानावरील हा पहिलाच सामना असेल. जमशेदपूरचा एटीकेपेक्षा एक गुण अधिक असून घरच्या प्रेक्षकांसमोर चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. जमशेदपूरला आपल्या दोन्ही सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे. या दोन्ही लढतीत त्यांना गोल नोंदविण्यात मात्र अपयश आले आहे. ... Read More »