ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: December 2017

अग्नितांडव

मुंबईतील लोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमध्ये एका इमारतीत लागलेल्या भीषण आगीत काल चौदा जणांचा बळी गेला. काही दिवसांपूर्वी मुंबईतच साकीनाक्यावरील एका फरसाण दुकानाच्या माळ्याला आग लागून बारा जणांचा बळी गेला होता. या दोन्ही दुर्घटनांना कारणीभूत ठरली आहे ती संबंधित यंत्रणांची कमालीची बेफिकिरी. ज्या ठिकाणी या आगी लागल्या ती दोन्ही ठिकाणे बेकायदेशीर होती. फरसाण दुकान अवैधरीत्या चालवले जात होते, तर काल ... Read More »

राजकारण्यांच्या विळख्यात म्हादई प्रश्न!

शंभू भाऊ बांदेकर कर्नाटकची सगळी नाटके लवादासमोर उघडी पडली असताना एका राजकीय पक्षाने आपल्या निवासस्थानी बैठक बोलावून म्हादई प्रश्‍नावर कर्नाटकच्या बाजूने तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे कितपत योग्य आहे?   म्हादईचा लढा जललवादासमोर निर्णायक टप्प्यावर असताना व लवादापुढे जलस्त्रोत खात्याच्या मुख्य अभियंत्यांपासून गोव्याच्या वतीने सर्व साक्षीदारांनी कर्नाटक भोवती म्हादईचा फास आवळला असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चेची भूमिका घेतल्यामुळे गोव्यातील कॉंग्रेससह सर्व ... Read More »

मुंबईत आग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू

लोअर परळ येथील कमला मील कम्पाऊंडला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेतील पाच दोषी अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. या अधिकार्‍यांनी नियमांचे उल्लंघन करून रेस्टॉंरंटला परवानगी दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या अग्नितांडवाप्रकरणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख ... Read More »

नव्या मांडवी पुलाच्या खांबाला अचानक आग

येथील मांडवी नदीवरील तिसर्‍या पुलाच्या बांधकाम सुरू असलेल्या ३३ व्या खांबाला काल दुपारी २ च्या सुमारास लागली. मात्र, अग्निशामक दलाच्या जवांनानी आग वेळीच विझविल्याने धोका टळला. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने या आगीच्या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडू नयेत म्हणून कंत्राटदाराला खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. तसेच आगीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेश ... Read More »

म्हादई बचाव अभियानाची जानेवारीपासून ‘जलयात्रा’

म्हादई बचाव अभियानाच्या तातडीच्या बैठकीत सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अभियानाने कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून जनजागृतीसाठी जानेवारीपासून राज्यात ‘जलयात्रा’ काढण्याचे ठरविले आहे. कर्नाटकाशी कुठल्याही प्रकारची बोलणी करण्यास अभियानाने विरोध केला आहे. पाण्याची समस्या आणि सद्यःस्थिती याबाबत जलयात्रेतून माहिती दिली जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकातील भाजपचे नेते येडियुरप्पा यांना पिण्याच्या पाण्याबाबत चर्चा करण्यास तयार असल्याचे ... Read More »

कांदोळी, सिकेरी किनार्‍यांवर जेलीफीशमुळे सतर्कतेचे आदेश

दृष्टीच्या जीवरक्षकांना उत्तर गोव्यातील कांदोळी ते सिकेरी समुद्र किनार्‍याच्या टप्प्यात जेलीफिशच्या खुणा आढळून आल्या असून स्थानिक तसेच पर्यटकांना वरील भागातील समुद्रात उतरू नये, अशी सूचना केली आहे. जेलीफिश समुद्र किनार्‍यावर किंवा पाण्यास असू शकतात, असा इशारा दिला आहे. दृष्टीच्या जीवरक्षकांना दि. २९ डिसेंबरला समुद्र किनार्‍यावर फेरफटका मारताना जेलीफिशच्या खुणा आढळून आल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर गोव्यातील समुद्र किनार्‍यावर जेलीफिशच्या ... Read More »

वास्को रेल्वे स्थानकावर सराईत चोरट्याला अटक

>> सुवर्णालंकारासह साडेसहा लाखांचा माल जप्त वास्को रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत जयराज पाटील (१९, रा. बेळगाव) या सराईत चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील ६ लाख रुपये किंमतीचे सोने तसेच १७,६०० रुपये रोख व चार मोबाइल फोन (१८ हजार किंमतीचे) हस्तगत केले. रेल्वे पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारवाईबद्दल दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी रेल्वे पोलीसांना पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर ... Read More »

न्यूझीलंडचा विंडीजवर ४७ धावांनी विजय

मन्रो व फिलिप्स यांच्या अर्धशतकानंतर गोलंदाज व क्षेत्ररक्षकांच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने काल शुक्रवारी झालेल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजचा ४७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ७ बाद १८७ धावा केल्या. विंडीज संघाचा डाव १९ षटकांत १४० धावांत संपला. न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात संथ झाली. टेलरने गप्टिलला दुसर्‍या षटकात पायचीत करत संघाला पहिले यश मिळवून दिले. ग्लेन फिलिप्स तिसर्‍या क्रमांकावर ... Read More »

मॉरिसला संधी

>> केपटाऊन कसोटीसाठी आफ्रिका संघ जाहीर भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील केपटाऊन येथे होणार्‍या पहिल्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेने आपला १५ सदस्यीय संघ काल शुक्रवारी जाहीर केला. वेगवान गोलंदाज दुआने ऑलिव्हर याला या संघात जागा मिळाली नसून त्याच्या जागी अष्टपैलू ख्रिस मॉरिस याचे पुनरागमन झाले आहे. तंदुरुस्तीच्या अभावी झिंबाब्वेविरुद्धच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीला मुकलेल्या डेल स्टेन व फाफ ड्युप्लेसिस यांनोदखील स्थान मिळाले आहे. झिंबाब्वेविरुद्धच्या ... Read More »

स्पोर्टिंग दवर्ली उपांत्य फेरीत

स्पोर्टिंग क्लब दवर्लीने रोझमन क्रूझ नागवा वेर्णावर ३-१ गोलने विजय मिळवित बेताळभाटी स्पोर्टिंग क्लब आयोजित मार्टिन कप फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. हा सामना बेताळभाटी मैदानावर झाला. १६ व्या मिनिटाला मार्क बोर्जीसने गोल करीत दवर्लीला आघाडीवर नेले. ३५ व्या मिनिटाला रोझमनच्या एजुदेव फर्नांडिसने १-१ असी बरोबरी साधून देणारा गोल झळकावला. ३८ व्या मिनिटाला अँड्र्यू कुलासोने दुसरा गोल नोंदवीत दवर्लीला २-१ ... Read More »