ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: November 2017

वेदांताची खनिज वाहतूक दुसर्‍या दिवशीही रोखली

कोडली येथील वेदांता कंपनीच्या गेटसमोर हजारो ट्रकमालक दुसर्‍या दिवशी एकत्रित झाल्याने पोलीस बंदोबस्तात खनिज वाहतूक करण्याचा कंपनीचा बेत पुन्हा फसला. गोवा स्पॉईंज कंपनीचा एक ट्रक ट्रक मालकांनी रस्त्यावर रोखून धरल्याने परिसरात वातावरण तंग झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून स्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ट्रक मालकांनी दिला आहे. सोमवारी पोलीस ... Read More »

‘रेरा’चा मसुदा कायदा विभागाकडे

सरकारने रिअल इस्टेट ऍक्ट २०१६ (रेग्यूलेशन अँड डेव्हलपमेंट) या कायद्याच्या कार्यवाहीसाठी प्रयत्न चालविले असून ‘रेरा’ कायद्याच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन मान्यतेसाठी कायदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. नगरविकास खात्याने रेरा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गोवा बांधकाम नियमन आणि विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. पाटो, पणजी येथे नगर नियोजन खात्याच्या ... Read More »

नोकरभरतीवर बंदी घातल्याने पार्सेकरांचा पराभव : सुदिन

नोकरभरती बंद केल्याच्या प्रश्‍नावरून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारवर टीका करणार्‍या लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपण मुख्यमंत्रीपदी असताना २०१६ साली नोकरभरती का बंद केली होती, असा प्रश्‍न काल सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल केला. पार्सेकर यांनी ही नोकरभरती बंद केल्यानेच ते स्वत: मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचा दावाही ढवळीकर यांनी केला. पार्सेकरांनी निवडणुका तोंडावर असताना नोकरभरती रद्द केल्याने भाजपच्या ... Read More »

तिसवाडीला मेपर्यंत मर्यादित पाणी

>> ओपातून कमी पुरवठ्यामुळे समस्या ओपा प्रकल्पातून तिसवाडी तालुक्यातील पाच मतदारसंघात सध्या १० एमएलडी पाण्याचा कमी पुरवठा होत असल्याने राजधानी पणजीसह ताळगाव, बांबोळी, सांताक्रुझ, मिरामार, सांतआंद्रे या भागात मर्यादित पाणीपुरवठा करावा लागत आहे. ओपा पाणी प्रकल्पात नवीन २७ एमएलडी पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम मे -२०१८ मध्ये पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठ्यात सुसूत्रता येेऊ शकते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाचे ... Read More »

संमेलनाध्यक्षपद जनमानसाच्या मानसातला अधिकार

>> ‘अक्षर मानव’चे संस्थापक राजन खान यांचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा अधिकार हा जनमानसाच्या मानसातला अधिकार असतो. आजवर लेखक म्हणून माणूस म्हणून जे काम करत आलो, ‘अक्षर मानव’च्या विविध उपक्रमांनी माणसं एकमेकांशी जोडून देण्याचे प्रयत्न करत आलो, साहित्याच्या आणि समाजाच्या विकासाचे प्रयत्न करत आलो, त्या सर्व कामांना अध्यक्षपदाच्या अस्तित्वाचे बळ मिळेल. भूमिका मांडायला व्यापक जागा मिळेल. ती ... Read More »

टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली

>> रोमहर्षक निर्णायक लढतीत न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात >> बुमराह सामनावीर व मालिकावीर पावसाच्या व्यत्ययात खेळविण्यात आलेल्या प्रत्येकी ८ षट्‌कांच्या निर्णायक व शेवटच्या सामन्यात गोलंदाजांच्या सूत्रबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात करीत टी-२० मालिका २ -१ अशी जिंकली. भारतासाठी हा ऐतिहासिक मालिका विजय ठरला. कारण त्यांनी पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध टी -२० मालिका विजय जिंकण्याचा पराक्रम केला. टीम ... Read More »

गोवा पराभवाच्या छायेत

कचखाऊ फलंदाजीमुळे पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर राजस्थानविरुद्ध सुरू असलेल्या चार दिवशीय अंडर-१९ कूच बिहार क्रिकेट स्पर्धेत गोवा पराभवाच्या छायेत आहे. १६७ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना काल तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत गोव्याची स्थिती ८ बाद १२१ अशी झाली आहे. त्यांना विजयासाठी अजून ४६ धावांची गरज असून केवळ २ गडी बाकी आहेत. एकवेळ गोव्याची स्थिती ८ बाद ९३ अशी झाली होती. ... Read More »

मेरी कोम अंतिम फेरीत

>> आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा पाच वेळची जागतिक स्पर्धा विजेती भारताची स्टार मुष्टियोद्धी एम. सी. मेरी कोम हिने आपल्या पाचव्या आशियाई मुष्टियुद्ध सुवर्ण पदकाकडे वाटचाल करताना अंतिम फेरीत धडक दिली आहे. काल झालेल्या ४८ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत मेरी कोमने जपानच्या सुबासा कोमुरा हिच्यावर ५-० असा एकतर्फी विजय मिळवित आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. यापूर्वी ३५ वर्षीय ... Read More »

महेश नाईकला कॅरमचे जेतेपद

डचोली येथील नवचैतन्य सौस्कृतिक मंडळ व पिपळेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित अखिल गोवा कॅरम स्पर्धेत महेश नाईक तर संदेश गाड व सहकारी विजयी ठरले. वडाचा वाडा बोर्डे येथे आयोजित या स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. एकेरी गटात ईश्वर पाल उपविजेता तर गोविंद गोसावी, नागेश पिळगावकर यांनी तिसरे व चौथे बक्षीस पटकावले दुहेरीत सहकारी यांनी उपविजेते पद पटकावले ,तसेच नागेश पिशगावकर व सहकारी ... Read More »

पॅराडाईज पेपर्स!

नोटबंदीच्या वर्षपूर्तीस सरकार काळा पैसा विरोधी दिन पाळण्याच्या तयारीत असतानाच पॅराडाईज पेपर्सच्या रूपाने एक नवा महाघोटाळा काल उजेडात आला. एका जर्मन वर्तमानपत्राने शोधपत्रकारांच्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने साडे तेरा दशलक्ष कागदपत्रांची जवळजवळ दहा महिने छाननी करून हे आर्थिक हलाहल बाहेर काढले आहे. इतर अनेक देशांप्रमाणेच बड्या बड्या भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी करबुडवेगिरीसाठी विदेशांमध्ये केलेल्या उचापतींची ही जणू कुंडली आहे. एकूण ... Read More »