ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 29, 2017

चित्रगंगा

यंदाच्या अठ्ठेचाळीसाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा म्हणजे ‘इफ्फी’चा पडदा काल पडला. सन २००४ पासून ‘इफ्फी’चे आयोजन गोव्यात होत आहे, म्हणजे गेल्या चौदा वर्षांचा आयोजनाचा भरपूर अनुभव गोव्याला आहे, परंतु या अनुभवातून आयोजक काही शिकल्याचे आणि परिपक्व झाल्याचे अजूनही दिसून येत नाही. गोवा मनोरंजन संस्थेचा गलथान, भोंगळ कारभार या वर्षी दिसून आला. महोत्सवाची साधी निमंत्रणे ज्यांना व्यवस्थित पाठवता येत नाहीत, त्यांची ... Read More »

गोमेकॉतील उपचार ः एक अनुभव

दासू शिरोडकर स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेनसारख्या पंचतारांकित स्वप्नांच्या मागे लागून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा जनतेचे आरोग्य, जनतेच्या नित्याच्या गरजा, जनतेचा आर्थिक स्तर उंचावणे निश्‍चितच अधिक आवश्यक आहे माझ्या मनात बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातील सेवेविषयी मनात सुरुवातीपासूनच अढी होती. ओळखी किंवा वशिला असल्याशिवाय तेथे व्यवस्थित सेवा मिळत नाही, अशी एक सर्वसाधारण समजूत आहे. कदाचित तिथे शुल्क आकारत नाहीत म्हणून ही ... Read More »

फ्रान्सच्या ‘१२० बिट्‌स पर मिनिट’ला सुवर्ण मयूर

>> इफ्फीचा शानदार समारोप >> महानायकाचा पर्सनॅलिटी ऑफ द इयरने सन्मान काल झालेल्या इफ्फीच्या शानदार समारोप सोहळ्यात ‘१२० बिट्‌स पर मिनिट’ ह्या फ्रेंच चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार प्राप्त झाला. सुवर्ण मयुराबरोबरच रोख ४० लाख रु. व प्रशस्तीपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. रोख रक्कम चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांना विभागून देण्यात येणार आहे. रॉबीन कांपिलो यांनी ह्या चित्रपटाचे ... Read More »

इफ्फीतील क्लोजिंग फिल्ममुळे आनंद : सीजर

थिंकिंग ऑफ हिम हा गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांच्यावरील आपला चित्रपट इफ्फीसाठीचा क्लोजिंग फिल्म ठरला याचा आपणाला खूप आनंद होत असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक पाब्लो सीजर यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. चित्रपटाचे निर्माते सुरज कुमार यांच्याशी २०१५ साली आपण इफ्फीसाठी आलो तेव्हा भेट झाली होती. या भेटीतच टागोर यांच्यावरील चित्रपटासंबंधी त्यांच्याशी बोलणी झाली होती. आता त्याच चित्रपटाने इफ्फीचा समारोप होत ... Read More »

फॅन्सी वाहन क्रमांक शुल्कात ५०% वाढ

वाहतूक खात्याने फॅन्सी वाहन क्रमांक शुल्कात ५० टक्के वाढ केली असून या निर्णयामुळे आता वाहन चालकांना पसंतीचा क्रमांक घेण्यासाठी जास्त रक्कम फेडावी लागणार आहे. वाहतूक खात्याने फॅन्सी वाहन क्रमांकासाठीचे नवीन शुल्क अधिसूचित केले आहेत. काही नागरिकांकडून वाहनांसाठी पसंतीचा क्रमांक घेतला जातो. पसंतीच्या क्रमांकांसाठी शुल्क निश्‍चित करण्यात आले आहेत. वाहतूक खात्याने महसूल वाढविण्याच्या दृष्टीने वर्षभरापूर्वी वाहन कराच्या शुल्कात वाढ केली होती. ... Read More »

राज्यात अन्न सुरक्षा नियम अधिसूचित

राज्यात गोवा अन्न सुरक्षा (तक्रार निवारण यंत्रणा, पारदर्शकता आणि जबाबदारी) नियम २०१७ अधिसूचित करण्यात आले आहेत. या नियमाखाली तालुका पातळीवरील तक्रारी हाताळण्यासाठी नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाचे काम हाताळणारे संयुक्त मामलेदार यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा तक्रार निवारण अधिकारी, दक्षता तसेच देखरेख समितीच्या नियुक्तीची नव्या कायद्यात तरतूद आहे. नोडल अधिकार्‍यांकडे नागरिक किंवा संस्था सार्वजनिक वितरण ... Read More »

‘रेरा’ कायदा अधिसूचित

नगरविकास खात्याने ‘रेरा’ कायद्याचे अंतिम नियम अधिसूचित केले असून बिल्डर व प्रवर्तकांना नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गोवा बांधकाम नियमन आणि विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. पाटो पणजी येथे नगर नियोजन खात्याच्या कार्यालयात रेरा खास विभागाची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारने रिअल इस्टेट ऍक्ट २०१६ (रेग्युलेशन अँड डेव्हलप’ेंट) या कायद्याच्या कार्यवाहीची ... Read More »

मेरशीत मिनीबस कलंडून १५ जखमी

पणजी ते चिंबल मार्गावर प्रवासी वाहतूक करणारी मिनीबस (जीए ०१ झेड ५६५५) मेरशी जंक्शनजवळ बस चालकाचा ताबा सुटल्याने कलंडून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. हा अपघात काल संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास झाला. प्रवासी मिनीबस पणजी येथून रायबंदरमार्गे चिंबल येथे जात होती. मेरशी जंक्शनजवळ मुख्य रस्त्यावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानंतर माती तसेच कचर्‍याच्या ढिगार्‍याला धडक देऊन मिनीबस रस्त्यावरच कलंडली. या ... Read More »

पणजीत तिघे अल्पवयीन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

>> नॅनो कारसह पाच दुचाक्या हस्तगत पणजी पोलिसांनी चोरी प्रकरणी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नेनो कार व पाच दुचाक्या हस्तगत केल्या आहेत. तिघेही अल्पवयीन चोरटे पणजी स्थानकाच्या हद्दीतील असून चौकशीनंतर त्यांची मेरशी येथील अपनाघरमध्ये रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तिघेही मुलगे आगशी, पर्वरी व इतर भागातून वाहने चोरून आणून पणजी परिसरात चालवायचे. नेनो कारगाडी ... Read More »

पुजारा, जडेजा द्वितीय स्थानावर

>> आयसीसी कसोटी क्रमवारी >> विराट कोहली ‘जैसे थे’ भारताचा आघाडी फळीतील फलंदाज चेतेश्‍वर पुजारा याने काल मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळविले आहे. कर्णधार विराट कोहली याने आपले पाचवे स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ पहिल्या स्थानावर आहे. पुढील चार स्थानांवरील खेळाडूंमध्ये केवळ ११ गुणांचे अंतर असल्याने क्रमवारीतील झुंज रंगतदार झाली ... Read More »