ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 28, 2017

दोन बाजू

मल्याळम दिग्दर्शक सनलकुमार शशीधरन यांचा वादग्रस्त ‘एस. दुर्गा’ हा चित्रपट अखेर केरळ उच्च न्यायालयाच्या बडग्यामुळे ‘इफ्फी‘च्या परीक्षक मंडळाला पुन्हा दाखवण्यात आला. या चित्रपटासंदर्भात हा जो वाद उफाळला आहे, त्याच्या दोन बाजू आहेत. पहिली बाजू आहे ती म्हणजे या महोत्सवात दाखवण्यासाठी परीक्षक मंडळाने एखाद्या चित्रपटाची अंतिम शिफारस केलेली असताना दिग्दर्शकांना वा परीक्षक मंडळाला पूर्वकल्पनाही न देता तो महोत्सवातून परस्पर वगळण्याची माहिती ... Read More »

संविधान हाच आपल्या जगण्याचा मार्ग

ऍड. असीम सरोद संविधान दिन नुकताच साजरा झाला. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. लोकशाहीची प्रकृती जेव्हा जेव्हा बिघडते तेव्हा लोकशाहीला आधार देणारा, प्राणवायू देणारा एक मार्ग म्हणून संविधान आहे. संविधानच आपल्या जगण्याचा मार्ग आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये विविध छोटी छोटी राज्ये होती. या राज्यांची मोट बांधणे आणि त्यांच्यात आपण सगळे एक आहोत किंवा ‘हम सब एक’ ... Read More »

इफ्फीचा आज पडदा पडणार

गेल्या २० रोजीपासून सुरू झालेल्या इफ्फीचा आज समारोप होणार असून स्पर्धा गटांतील विजेत्या चित्रपटांना सुवर्ण मयुर, रौप्य मयुर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराच्या स्पर्धेत ‘कच्चा लिंबू’ हा प्रसाद ओक दिग्दर्शित मराठी चित्रपटही आहे. यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार देऊन महानायक अमिताभ बच्चन यांचा गौरव समारोप सोहळ्यात करण्यात येणार आहे. बांबोळी येथील डॉ. श्माया प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये समारोप सोहळा संपन्न होईल. सलमान, ... Read More »

दिगंबर कामतांच्या अटकपूर्व जामिनास विरोध

खाण घोटाळ्याचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) वकील जी. कीर्तनी यांनी माजी मुख्यमंत्री, विद्यमान आमदार दिगंबर कामत यांना खाण घोटाळा प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास खास न्यायालयात सुनावणीच्या वेळी काल जोरदार विरोध केला. या जामीन अर्जावरील पुढील सुनावणी १ डिसेंबर रोजी होईल. दिगंबर कामत यांनी खाण घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या पहिल्या अटकपूर्व जामीन अर्जावर येथील खास न्यायालयात सुनावणी घेण्यात ... Read More »

किनारी व्यवस्थापन आराखडा विलंबाची कारणे द्या : कॉंग्रेस

राज्याचा किनारी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यास सरकारी यंत्रणा अपयशी ठरली आहे. सरकारने आराखडा तयार करण्यात विलंब का झाला याची कारणे जाहीर करावीत, अशी मागणी गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी कॉँग्रेस भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली. एनजीटीच्या किनारी भागातील बांधकाम बंदीमुळे मच्छीमारी समाजासमोर संकट निर्माण झाले आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने किनारी क्षेत्र व्यवस्थापन ... Read More »

काणकोणात बस उलटून १४ जखमी

माटवेमळ, खोला येथील पारयेकट्टा-उणस वळणावरील उतरणीवर मिनी बस उलटून झालेल्या अपघातात १४ जण जखमी झाले असून त्यांपैकी ९ जण गंभीर आहेत. त्यांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर मडगाव इस्पितळात हलवण्यात आले आहे. सदर मिनीबस टेम्पो ट्रेव्हलर (जीए ०८ – यू – ९७०५) ही बस असोळणा येथून आगोंद वाल येथील कपेलमध्ये प्रार्थनेसाठी निघाली होती. पारयेकट्टा येथील धोकादायक वळणावर उतरणीवर ... Read More »

इफ्फीसाठी गोवा परिपूर्ण स्थळ : आलिया

कालिका बापट आपल्याला गोवा फार आवडतो. कामानिमित्त तर येतेच तसेच अधूनमधूनही गोव्यात येत असते. शाहरूख खान बरोबरच्या ‘डियर जिंदगी’च्या चित्रिकरणा दरम्यान आपण पंचेचाळीस दिवस गोव्यात होते. इथल्या समुद्र किनार्‍यांवर चित्रीकरण झाले, तेव्हा सुंदर अनुभव आले. निसर्गसंपन्न गोवा आपल्याला सदैव भुरळ घालतो. शांत, सुंदर, कला आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेला गोवाच इफ्फीसाठी परिपूर्ण असल्याचे मत बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने प्रकट मुलाखतीत व्यक्त ... Read More »

‘गम्मत जम्मत’ तेव्हाचा सैराट चित्रपट : वर्षा

कालिका बापट काळाचा महिमा न्यारा असतो, हे सध्याच्या फिल्म जगतातील घडामोडीवरून दिसते. सत्तावीस, अठ्ठावीस वर्षांपूर्वी गोव्याचा माहोलच वेगळा होता. एवढेच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीतही कमालीचा बदल झाला आहे. आपण भूमिका केलेला तेव्हाचा सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘गम्मत जम्मत’ हा गाजलेला चित्रपट म्हणजे तेव्हाचा ‘सैराट’ होता, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले. बायोस्कोप व्हिलेजच्या ‘स्किल स्टुडिओ’त त्यांनी अभिनेत्री म्हणून ... Read More »

‘डिजिटल क्रांती..’वर ओपन फोरममध्ये चर्चा

इफ्फीमधील ओपन फोरममध्ये काल शेवटचे सत्र पार पडले. ‘डिजिटल क्रांती…चित्रपटाचे बदलते स्वरुप’ हा यावेळी चर्चेचा विषय होता. उज्ज्वल निरगुडकर, सभासद- अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेस, संजय चांदेकर, प्रमुख, रेडिओ एफटीटीआई पुणे, राजेंद्र तालक, उपाध्यक्ष, गोवा मनोरंजन संस्था, एम. ए. राघवेंद्रन, चित्रपट संशोधक आणि समीक्षक यांनी चर्चेत भाग घेतला. इंडियन डॉक्युमेंटरी प्रोड्यूसर्स असोसिएशनचे अध्यक्ष माईक पांडे यांनी सूत्रसंचालन केले. ... Read More »

शेवटी इफ्फीतील कट्‌ट्यावर आलिया आलीच नाही!

काल सोमवारी इप्फीच्या कट्‌ट्यावर लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट रात्री ८ वा. येणार म्हणून हजारोंच्या संख्येने तिच्या चाहत्यांनी, सिनेरसिकांनी एकच गदी केली होती. सात वाजल्याच्या आधीपासूनच तिथे गर्दी व्हायला सुरूवात झाली होती. आलिया येणार आणि तिचे मोबाईलमधील कॅमेर्‍यात छायाचित्र टिपाणार म्हणून सर्वजण उत्सुक होते. मीडियावालेही त्यावेळी आपले कॅमेरे सरसावून सज्ज झाले होते. एवढे दिवस दिसत नव्हता पण काल सोमवारी तिथे मोठ्या ... Read More »