ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 25, 2017

वचन पाळावे

राज्यातील पॅरा शिक्षिकांना सेवेत कायम करण्याची ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. त्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन त्वरित कामावर रुजू व्हावे, डी. एड. प्रशिक्षण पूर्ण करावे वगैरे अटीही सरकारने त्यांना घातल्या आहेत. मात्र, त्यांना त्या मान्य नाहीत असे दिसते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत सेवेत घेण्यात आलेल्या अशा पॅरा शिक्षिकांचा प्रश्न हा केवळ गोव्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात जटिल बनलेला आहे. गोव्यापासून झारखंडपर्यंत ... Read More »

चतुरस्त्र लेखक, विद्वान संपादक ः चंद्रकांत केणी

भाई नायक (मडगाव) शब्दांकन – अनिल पै कोंकणी आग्रहाचा मुद्दा न सोडणारे, पण त्यासाठी कटुता निर्माण करण्याची किंवा दुसर्‍या भाषांचा द्वेष करण्याची आवश्यकता नाही असे मानणारे भाषिक कार्यकर्ते, संघटक व सर्वांशी समन्वय साधणारे एक प्रसिद्ध लेखक म्हणून चंद्रकांतबाब गोव्याच्या स्मरणात राहतील. मानवतेच्या एका अखंड परंपरेचा आपण तत्कालीक दुवा आहोत, याची जाणीव सामान्य माणसाला क्वचितच असते, परंतु मठग्रामस्थ हिंदुसभेचे कार्य करीत ... Read More »

तरुणाईला, प्रौढांना वाचवायला हवं!!

– प्रा. रमेश सप्रे रात्र तशी वैर्‍याचीच आहे पण आपण जागं राहिलं पाहिजे- इतरांना जागवलं पाहिजे. उपनिषदातील ऋषींचा (स्वामी विवेकानंदांचा आवडता) मंत्र सदैव ध्यानात ठेवू या- जो प्रौढांनी आणि ज्येष्ठांनी आपला श्‍वास नि ध्यास बनवला पाहिजे- ‘उत्तिष्ठत-जाग्रत.. प्राप्यवरान् निबोधत| .. शृण्वन्तु ते अमृतस्य पुत्राः॥ ‘थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली’- म्हणजे विचार विश्‍वकल्याणाचा करा पण कृती स्थानिक पातळीवर करा (कार्याचा आरंभ स्थानिक ... Read More »

जीवनसौंदर्याचा वेध घेणारे जीवनसौंदर्याचा वेध घेणारे  कविकुलश्री बा. भ. बोरकर

 – सोमनाथ कोमरपंत … इथे श्रुती धन्य जहाल्या…. बोरकर शब्दसृष्टीचे किमयागार झाले… या दीर्घकालीन इंद्रदिनांचा रसिकमनांवरील असर अजूनही सरत नाही. कारण कविश्रेष्ठ बा. भ. बोरकरांची कविता ही त्यांच्या नित्यनूतन आनंदाचा ठेवा आहे…………………………  ३० नोव्हेंबर १९१०ला बा. भ. बोरकरांचा जन्म झाला. त्याला आज १०७ वर्षें झाली. त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी कुडचडे येथे झाला. बोरी हा त्यांचा मूळ गाव. आपल्या प्रतिभेच्या सामर्थ्याने ... Read More »

इजिप्तमध्ये दहशतवादी हल्ल्यात २५० ठार

इजिप्तच्या उत्तर सिनाई प्रांतातील मशिदीवर शुक्रवारचे नमाज पठन चालू असल्यावेळी दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटात २५० हून अधिक भाविक ठार झाले असून १०० हून अधिकजण जखमी झाले. अल-अरिश शहरातील सदर मशीदीत या घटनेवेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. बॉम्बहल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी चार वाहनांमधून अंदाधुंद गोळीबारही केला. या घटनेनंतर इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सी यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक बोलावली. इजिप्त सरकारने ... Read More »

आमदारांच्या आश्‍वासनानंतर पॅरा शिक्षकांचे आंदोलन स्थगित

२० दिवसात योग्य तोडगा काढून त्याबाबतचे परिपत्रक पॅरा शिक्षकांना देण्याचे स्पष्ट आश्‍वासन कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल व सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी दिल्यानंतर पॅरा शिक्षकांनी आपले आंदोलन स्थगित केले आहेे. आज शनिवारपासून सर्व पॅरा शिक्षक सेवेत रूजू होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी कायम स्वरूपी तोडगा न काढल्याने नाराज बनलेल्या पॅरा शिक्षकांची भाजपचे आमदार काब्राल आणि सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी पर्वरी येथे ... Read More »

ऐतिहासिक भूमिकांना मी अग्रक्रम देते

>> मृणाल कुलकर्णी यांचे मत : इफ्फीच्या कट्ट्यावर रंगली चर्चा ऐतिहासिक भूमिका वठविणे कठीण असते. खूप मेहनत, अभ्यास करावा लागतो व त्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांकडून आदराचे स्थान मिळवावे लागते. पण मी ऐतिहासिक भूमिकांना अग्रक्रम देते. ऐतिहासिक भूमिका मी विश्‍वासार्हततेने केल्या याचा मला अभिमान आहे, असे स्पष्ट करून लोकप्रिय अभिनेत्री तथा दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी भारतीय इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्व चित्रपटाच्या माध्यमातून पुढे ... Read More »

टागोर यांच्या साहित्यावर चित्रपट शक्य

गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहून ठेवलेल्या विपुल साहित्यावर अजून कित्येक दर्जेदार व अभिजात असे चित्रपट बनवणे शक्य असून नव्या दमाच्या चित्रपट दिग्दर्शकाने हे शिवधनुष्य उचलावे, असा सूर काल ‘टागोर इन सिनेमा’ या विषयावरील परिसंवादातून बोलताना वक्त्यांनी व्यक्त केला. या परिसंवादात सुप्रसिद्ध अभिनेत्री मूनमून सेन, टागोर यांच्या साहित्याच्या अभ्यासक शोभा चटर्जी टागोर यांच्यावर चित्रपट बनवलेले दिग्दर्शक पाबलो सिझर यांनी सहभाग घेतला. ... Read More »

‘कॅन्डी फ्लीप’ इंग्रजी चित्रपटाचा शुभारंभ

वास्कोत मंगळवारपासून ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील चित्रपट प्रदर्शनाला सुरूवात झाली असून वास्कोत के सेरा सेरा चित्रपटगृहात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते या चित्रपट प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले होते. तर काल या सिनेमागृहात अभिनेत्री कल्की कोयक्लीन यांच्या हस्ते ‘कॅन्डी फ्लीप’ या इंग्रजी चित्रपटाचे प्रदर्शनाचा मुहूर्तमेढ करण्यात आला. या चित्रपट प्रदर्शनाला यावेळी एनआरबी ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नारायण बांदेकर, नयना ... Read More »

लिहीत रहा, चांगला चित्रपट चालून येईल : सुधीर मिश्रा

चित्रपट विषयक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मी सांगत असतो, लिहित रहा, एक दिवस असाच चांगला चित्रपट तुमच्याकडे चालून येईल. आजही सांगतो, लिहीत रहा, थकू नका. संधी चालून येतात त्याचा लाभ घ्या, असे पटकथा लेखक, दिग्दर्शक सुधीर मिश्रा स्किल स्टुडिओ कार्यक्रमात बोलताना म्हणाले. हिंदी सिने सृष्टीतील पहिल्या पाच सर्वकालीन चित्रपटांमध्ये ज्या चित्रपटाचा उल्लेख होतो त्या कुंदन शाह दिग्दर्शित ‘जाने भी दो यारो’ ... Read More »