ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 24, 2017

आता शिस्तीची अपेक्षा

राज्यातील पर्यटक टॅक्सीमालकांच्या संघटित लॉबीपुढे अखेर सरकार झुकले आहे. न्यायालयीन आदेशानुसार या टॅक्सींना डिजिटल मीटर बसवणे अनिवार्य असल्याने आता त्यात आणखी चालढकल शक्य होणार नाही. त्यामुळे टॅक्सीमालकांना मीटर खरेदीसाठीचे नव्वद टक्के अनुदान सरकार जनतेच्या पैशांतून देणार आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत नुकतीच जी बैठक झाली तिला टॅक्सीमालकांच्या वतीने मायकल लोबो, चर्चिल आलेमाव आणि विजय सरदेसाई यांनी ही शिष्टाई केली आहे. विजय सरदेसाई हे ... Read More »

नोकरभरतीवर आम आदमीने बारकाईने लक्ष ठेवावे

प्रल्हाद भ. नायक राजकीय व्यक्ती आपल्या राजकीय फायद्यासाठी आवश्यकता नसतानाही आपल्या माणसांना सरकारी नोकरीत चिकटवून सर्वसामान्य जनतेवर बोजा टाकतात. जनतेने त्याबद्दल जाहीर चीड व्यक्त करायला हवी. बुधवार दि. १ नोव्हेंबरच्या नवप्रभातील ‘खोगीरभरती’ हा अग्रलेख खरोखरच अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा आहे. गोव्यातील विविध सरकारी कार्यालयांतील डोईजड झालेल्या सरकारी कर्मचार्‍यांविषयी संपादकांनी योग्य शब्दांत उहापोह केला आहे. सरकारी कर्मचार्‍यांचा बरा (?) वाईट (!) ... Read More »

ग्रेटर पणजी व मोपा पीडीए स्थापणार

>> टीसीपी मंडळाच्या बैठकीत निर्णय : मंत्री विजय सरदेसाईर्ंंची माहिती ऑर्चर्ड जमिनीचे बेकायदेशीर रूपांतर करण्यात आले आहे. जमिनीच्या बेकायदा रूपांतराला आळा घालण्यासाठी नगर नियोजन कायद्यात आवश्यक दुरूस्ती करून बेकायदा जमीन रूपांतर करणार्‍याला १ वर्ष शिक्षेची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रेटर पणजी आणि मोपा या दोन नवीन पीडीएंची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरनियोजन मंत्री विजय ... Read More »

ट्रकमालक-सेझादरम्यान खनिज वाहतूक दरांबाबत सहमती

अखेर खाण वाहतुकीतील दरवाढीसाठी चालू असलेल्या समस्येवर काल दि. २३ रोजी ५२ रु. डिझेल प्रती लिटर व वाहतुक दर १२ रुपये असा तोडगा काढण्यात आला. हा दर मान्य असल्याचे ट्रक मालकांनी सांगितले. काल दुपारी तीन वाजता सावर्डेचे आमदार दीपक पावसकर यांच्या कार्यालयात सेझा गोवा कंपनीचे अधिकारी ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष यांच्याबरोबर बैठक घेण्यात आली. या बैठकीला कुडचडेचे आमदार निलेश काब्राल, ... Read More »

पॅरा शिक्षकांना नियमित करणार

आगामी शैक्षणिक वर्षी पॅरा शिक्षकांना सेवेत नियमित करण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे. पर्वरी येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांचा तोडगा पॅरा शिक्षकांनी मान्य नसल्याने जाहीर करून सचिवालयाच्या मुख्य प्रवेशद्वार संध्याकाळी उशिरापर्यत रोखून धरले. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला शिक्षण संचालक आणि पॅरा शिक्षकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरटीई कायद्याच्या ... Read More »

‘इंदू सरकार’ ला विनाकारण विरोध

‘इंदू सरकार’ हा आपला वादग्रस्त ठरलेला चित्रपट इंदिरा गांधी यांच्या जीवनावर नसून आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवर तयार केलेला तो चित्रपट आहे. या चित्रपटाची ७५ कहाणी ही काल्पनिक तर त्यातील ३० टक्के घटना या खर्‍या आहेत, असे मधुर भंडारकर यांनी काल इफ्फीत पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले. गेल्या जुलै महिन्यात जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो अत्यंत वादग्रस्त ठरला. लोकांनी चित्रपटाला विनाकारण प्रचंड ... Read More »

विविध भाषांतील चित्रपटांबद्दल भारतीयांना ओढ

  >>‘यंग फिल्म मेकर्स ऑफ इंडिया’ : भास्कर हजारिका यांचे मत ‘यंग फिल्म मेकर्स ऑफ इंडिया’ या पैनल चर्चेत कार्तिक सुब्बाराज, आर. एस. प्रसन्ना, भास्कर हजारिका, राजा कृष्ण मेनन यांनी सहभाग घेतला. त्याचे सूत्रसंचालन फिल्म निर्माता अश्‍विनी अय्यर यांनी केले. भास्कर हजारिका यांनी सांगितले, चित्रपट क्षेत्रात सब टायटल असलेले चित्रपटही तितकेच चमकले. भारतातील लोक कोरियन चित्रपट बघतात, तसेच मणिपुरी चित्रपटही ... Read More »

तंत्रज्ञान आत्मसात करण्यास भारतीय अग्रेसर तंत्रज्ञान आत्मसात करण्यास भारतीय अग्रेसर 

> साउंड डिझाइनर रेसूल फुकूटी यांचे मत – कालिका बापट ‘अ रेनी डे’ भारतीय सिनेसृष्टीतली क्रांती गोव्यातील राजेंद्र तालक यांचा ‘अ रेनी डे’ हा मराठी चित्रपट साऊंड डिझाइनींगच्या बाबतीतली भारतीय सिनेसृष्टीतली क्रांती म्हणावी लागेल, असे रेसूल फुकूटी यावेळी म्हणाले. पूर्ण चित्रपट हा केवळ पावसाच्या आवाजावर बेतलेला असून हा पहिलाच चित्रपट आहे जो या पध्दतीने केला आहे, असे फुकूटी म्हणाले. ज्यावेळी ... Read More »

उसगावात घरमालकानेच केला भाडेकरुचा पैशांवरून खून

तिस्क-उसगाव येथील पोलीस आऊट पोस्टसमोर भाड्याच्या खोलीत राहणार्‍या विजय हरिजन (३५, उत्तर प्रदेश) याचा बुधवारी रात्री घरमालकाने खून केला. याप्रकरणी विनय रत्नाकर रायकर (२८, तिस्क उसगाव) याला फोंडा पोलीसांनी अटक केली. दोन महिन्यांचे भाडे न दिल्याने घरमालकाने हरीजनला लाथाबुक्यांनी मारहाण केली त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. प्राप्त माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी संशयिताने दोन महिन्यांचे थकीत असलेले ३ हजार रुपये ... Read More »

सरकारी कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी आधार प्रणाली

सरकारी कर्मचार्‍याच्या हजेरीसाठी आधार एनेबल्ड बायोमॅट्रीक एटेंडन्स सिस्टमचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ डिसेंबर २०१७ पासून नवीन आधार सक्षम प्रणालीचा वापर सचिवालयातून केला जाणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक सर्वसाधारण प्रशासन विभागाने जारी केले आहे. सरकारी कर्मचार्‍याच्या हजेरीत शिस्त आणण्याच्या उद्देशाने हजेरीसाठी बायोमॅट्रीक प्रणालीचा वापर केला जात आहे. सचिवालयातील कर्मचार्‍याच्या हजेरीसाठी २०१० मध्ये बायोमॅट्रीक प्रणालीचा वापर करण्यास सुरूवात करण्यात ... Read More »