ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 18, 2017

वाद ‘पद्मावती’चा

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटावरून उसळलेला विवाद दिवसेंदिवस गंभीर रूप घेत चालला आहे. भन्साळींवरील हल्ल्यासाठी पाच कोटींचे बक्षीस जाहीर करण्यापासून अभिनेत्री दीपिका पडुकोनचे नाक कापण्याची धमकी देण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. यापूर्वी कोल्हापुरात या चित्रपटाचा सेट जाळण्यात आला होता, त्यामुळे अशा प्रकारच्या धमक्या गांभीर्याने घेऊन सरकारने अशा फतवेखोरांवर सर्वप्रथम कारवाई केली पाहिजे. भन्साळींचा हा चित्रपट राजपुतांच्या दृष्टीने देवीस्वरूप असलेल्या महाराणी ... Read More »

मराठी साहित्य पुरस्कार खंडित होऊ नयेत!

  दासू शिरोडकर (फोंडा) गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याचा आदर, सन्मान कुणी करायचा? अशा साहित्यिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप कुणी मारायची? कुणी त्यांना अधिक सकस निर्मितीसाठी प्रेरणा देणारी ऊर्जा द्यायची? पुरस्कार हे उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाठीवर शाबासकीची थाप देणारी एक प्रशंसनीय अशी कृती असते. न बोलताच ती सृजनाचे एक मोठे सकारात्मक कार्य करून जात असते. ज्याच्या पाठीवर ती पडते त्याला तर ती ... Read More »

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा सक्षम करणार

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती >> जानेवारीत नवीन साधनसामग्री राज्यातील ग्रामीण भागातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रे व सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. पहिल्या टप्प्यात एक्स रे मशीन, अल्ट्रासाऊंड, हाय पॉवर एक्स रे मशीन, कलर डॉप्लर, रक्त तपासणीसाठी यंत्रणा उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ... Read More »

खाण घोटाळा : यदुवंशी यांची दिगंबर कामत विरोधात जबानी

भारतीय नागरी सेवेतील अधिकारी (आयएएस) तथा राज्याचे माजी खाण सचिव राजीव यदुवंशी यांनी कोट्यवधी रुपयांच्या खाण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विरोधात काल जबानी दिल्याने कामत यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, एसआयटीने माजी प्रधान खाण सचिव राजीव यदुवंशी यांना खाण घोटाळा प्रकरणी सरकारी साक्षीदार बनविले आहे. यदुवंशी यांची सीआरपीसीच्या १६४ कलमाखाली येथील न्यायदंडाधिकार्‍यांसमोर काल जबानी नोंदवून घेण्यात आली. ... Read More »

पेट्रोल-डिझेलवरील जकात नगरपालिकांना द्यावा

>> नगरविकास मंत्र्यांचे संचालकांना सूचनापत्र राज्यातील नगरपालिकांना गेल्या तीन वर्षांपासून वेतन व विकास निधी न मिळाल्याच्या पार्श्‍वभूमीवर आपण नगरपालिका संचालकांना सूचना केली असून पूर्वी पेट्रोल व डिझेलवरील जो जकात नगरपालिकांना मिळायचा तो परत पालिकांनाच द्यावा अशी मागणी सदर सूचना पत्रातून केली असल्याचे नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी काल सांगितले. जर जकात शुल्क पालिकांना दिले तर ‘अ’ आणि ‘ब’ पालिका पाच ... Read More »

कल्याणकारी योजनांचे सर्वेक्षण जीईएलकडे

महिला आणि बाल कल्याण खात्याच्या गृहआधार, लाडली लक्ष्मी या मुख्य योजनांच्या लाभार्थींचे सर्वेक्षण गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (जीईएल) कडे सोपवण्याचा निर्णय काल एका बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री विश्‍वजित राणे, महिला व बालकल्याण खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गृहआधार, लाडली लक्ष्मी, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींचे सर्वेक्षण करण्याची घोषणा ... Read More »

सासष्टी तालुक्याचा पाणीपुरवठा रोखण्याचा सांगेवासियांचा इशारा

>> धरण असूनही पाणी टंचाईमुळे संताप राज्यातील एक मोठे धरण सांगे तालुक्यात असूनही तालुक्यातील ५ पंचायतींना अद्याप पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत ही व्यवस्था करण्यात यावी अन्यथा आंदोलन करून सासष्टी तालुक्याला होणारा पाणीपुरवठा बंद पाडण्याचा इशारा सांगे तालुक्यातील लोकांनी दिला आहे, असे सांगेचे माजी आमदार व भाजप नेते सुभाष फळदेसाई यांनी काल येथे पत्रकार परिषदेत ... Read More »

इफ्फी काळात वाहतूक व्यवस्थेत बदल

वाहतूक पोलिसांनी ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी खास वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आणि समारोप सोहळा ताळगाव येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. इतर कार्यक्रम कांपाल येथील कला अकादमी, आयनॉक्सच्या परिसरात होणार आहेत. आल्तिनो पणजी येथील जॉगर्स पार्कमध्ये काही कार्यक्रम ... Read More »

भारत ५ बाद ७४ पुजारा भक्कम

>> अजिंक्य रहाणे, अश्‍विनकडून निराशा भारत व श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशीदेखील पावसाने अधिराज्य गाजवले. त्यामुळे केवळ २१ षटकांचा खेळ होऊ शकला. पहिल्या दिवसअखेर ३ बाद १७ अशा केविलवाण्या स्थितीत असलेल्या भारतीय संघाने दुसर्‍या दिवसअखेर ५ बाद ७४ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत खेळपट्टी थोडीशी मंदावली असून फलंदाजी करणे तुलनेने सोपे झाले आहे. शेवटच्या १० षटकांत ... Read More »

पेन, मार्श ऑस्ट्रेलिया संघात

यष्टिरक्षक फलंदाज टिम पेन, फलंदाज कॅमेरून बँनक्रॉफ्ट व शॉन मार्श यांची २३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ऍशेस कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. या तिघांना मॅथ्यू वेड, मॅट रेनशॉ व ग्लेन मॅक्सवेल यांच्या जागी स्थान देण्यात आले आहे. वडिलांच्या निधनामुळे अष्टपैलू मार्कुस स्टोईनिस याचा विचार करण्यात आलेला नाही. २०१० साली स्टीव स्मिथ व टिम पेन यांनी पाकविरुद्ध कसोटी पदार्पण ... Read More »