ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 16, 2017

पुन्हा दाऊद

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीच्या दूरध्वनीवरील संभाषणांच्या ध्वनिफिती एका वृत्तवाहिनीने प्रसारित केल्याने तो पुन्हा एकवार चर्चेत आला आहे. या ध्वनिफिती अलीकडच्या काळातील असल्याने त्यातील दाऊदचा आवाजही एका प्रौढाचा आहे. दाऊदची हिरो स्टाइलची छायाचित्रे जरी आजवर प्रसारमाध्यमांमधून वारंवार दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात ती पंचवीस – तीस वर्षांपूर्वीची आहेत. शारजातील एका क्रिकेट सामन्याला दाऊद हजर राहिला होता, तेव्हाची त्याची ... Read More »

मोदींच्या ङ्गिलीपाईन्स दौर्‍याचे महत्त्व

शैलेंद्र देवळाणकर आसियान आणि ईस्ट एशिया समिट या दोन परिषदांच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी ङ्गिलीपाईन्स दौर्‍यावर गेले होते. आसियानच्या स्थापनेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत; तर भारत-आसियान आर्थिक सहकार्य संवादाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यादृष्टीने मोदींचा दौरा हा महत्त्वाचा ठरला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच ङ्गिलीपाईन्सच्या दौर्‍यावर गेले होते. या दौर्‍यादरम्यान ङ्गिलीपाईन्सची राजधानी मनीला येथे होणार्‍या बहुराष्ट्रीय ... Read More »

शाहरूख खान हस्ते इफ्फीचे उद्घाटन

>> महानायक अमिताभला गौरविणार >> ‘बियॉंड द क्लाऊड्‌स’ने पडदा उघडणार ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आघाडीचे सीने अभिनेते शाहरूख खान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या सोहळ्यात ख्यातनाम सीने अभिनेता, महानायक अमिताभ बच्चन यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान राजधानी पणजीत इफ्फी संपन्न होणार आहे. यंदाच्या महोत्सवाचा पडदा इराणी ... Read More »

कचरा विल्हेवाटीचे सर्वाधिकार व्यवस्थापन महामंडळाकडे

>> मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय कचरा व्यवस्थापनाची सगळी जबाबदारी कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे सोपवण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आतापर्यंत विविध प्रकारच्या कचर्‍याची जबाबदारी विविध खाती सांभाळत होती. ई कचर्‍याची जबाबदारी आयटी खाते सांभाळत होते. तर जैव वैद्यकीय कचर्‍याची जबाबदारी आरोग्य खाते सांभाळत होते, असे त्याविषयीची माहिती देताना पर्रीकर यांनी सांगितले. ... Read More »

नद्यांचे राष्ट्रीयीकरण केलेले नाही ः पर्रीकर

केंद्र सरकारने राज्यातील सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण केलेले नसून त्या सहा नद्या राष्ट्रासाठी महत्त्वाच्या असल्याचे जाहीर केले आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यामुळे या सहा नद्या राज्य सरकारच्याच ताब्यात राहणार असल्याचे पर्रीकर म्हणाले. ह्या नद्यांचे सर्व हक्क राज्य सरकारकडेच राहणार आहेत. राज्य सरकारचेच कायदे त्यांना लागू होणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. काही हितशत्रू कोळशाप्रमाणेच ... Read More »

राजीव यदुवंशी यांची सहा तास कसून चौकशी

>> खाण घोटाळा प्रकरण खाण घोटाळ्याची चौकशी करणार्‍या विशेष तपास पथकाने खाण खात्याचे माजी प्रधान सचिव राजीव यदुवंशी यांची काल बुधवारी सहा तास कसून चौकशी केली. दरम्यान, यदुवंशी यांना आजही चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. खाण घोटाळ्याच्या सोळा प्रकरणांमध्ये यदुवंशी यांची सखोल चौकशी केली जात आहे. खाण खात्याच्या सचिवांनी नोंदविलेल्या निरीक्षणांना बगल देत यदुवंशी यांनी मान्यता देण्याचा निर्णय ... Read More »

कोळसा प्रकल्पाचा विस्तार नाहीच

गोवा सरकारने मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी टर्मिनसचा विस्तार न करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असताना काही हितशत्रू जाणूनबुजून कोळसा प्रकरणी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काल पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला. यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणी टर्मिनसचा विस्तार करायचा नाही अशी भूमिका सरकारने घेतलेली आहे. गेल्या पावसाळी अधिवेशनातच आपण सरकारची सदर भूमिका स्पष्ट केली ... Read More »

मराठी चित्रपट दिग्दर्शकांची इफ्फीवर बहिष्काराची चिन्हे

इफ्फीसाठी इंडियन पॅनोरमा विभागात निवड झालेला ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट अश्‍लील ठरवून वगळण्यात आल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी भडकली असून या महोत्सवात सादर होणार्‍या सर्व मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक या महोत्सवावर बहिष्कार घालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सुवर्ण कमळ विजेता चित्रपट ‘कासव’च्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी इफ्फी महोत्सवातून माघार घेत ‘न्यूड’ चित्रपटाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. या व्यतिरिक्त इफ्फीत ... Read More »

स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत साडेचारशे सीसीटीव्ही कॅमेरे

राजधानी पणजीत स्मार्ट सिटीअंतर्गत ४५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पणजी शहराबरोबरच कुजिरा शैक्षणिक संकुल, जीएमसी – बांबोळी, गोवा विद्यापीठ – ताळगाव या भागातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची योजना स्मार्ट सिटी अंतर्गत आखण्यात आली आहे. या योजनेवर साधारण १५० कोटी रुपये खर्च ... Read More »

भारत-श्रीलंका पहिली कसोटी आजपासून

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेस आजपासून प्रारंभ होत आहे. सुमारे अडीज महिन्यानंतर टीम इंडिया पुन्हवा एकदा श्रीलंकेला कसोटी मालिकेत धूळ चारण्यासाठी सज्ज आहे. गत जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या तीन कसोटींच्या मालिकेत श्रीलंकेचा त्यांच्याच भूमीवर भारताने ३-० व्हाईटवॉश केला होता. आता युवा आक्रमक कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पुन्हा एकदा तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ज्याची सुरुवात आजपासून ... Read More »