ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 10, 2017

शिस्त लावण्याची वेळ

राज्यातील पर्यटक टॅक्सीवाल्यांची मुजोरी पुन्हा सुरू झालेली दिसते. उच्च न्यायालयाने बडगा उगारल्याने सरकारने टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याचे फर्मान काढले खरे, परंतु संघटित टॅक्सीवाले आणि त्यांचे राजकीय कैवारी यांच्या दबावापुढे सरकार झुकू लागल्याचे दिसते आहे. मायकल लोबो हे टॅक्सीवाल्यांचे कैवारी असल्याच्या थाटात नेहमी पुढे सरसावत असतात. यावेळी त्यांच्या जोडीला जयेश साळगावकरही आहेत. आम्ही टॅक्सींना डिजिटल मीटर लावणार नाही, आम्ही जीपीएस लावणार ... Read More »

स्वच्छ आर्थिक प्रणालीकडे देशाची वाटचाल…

अरूण जेटली देश स्वच्छ, पारदर्शक आणि प्रामाणिक आर्थिक प्रणालीकडे वाटचाल करत आहे. याचे फायदे अद्याप काही लोकांना दिसत नसतील. भावी पिढी नोव्हेंबर, २०१६ नंतर राष्ट्राच्या आर्थिक विकासाकडे अभिमानाने पाहील, कारण तिने त्यांना जगण्यासाठी एक न्याय्य आणि प्रामाणिक व्यवस्था दिली आहे. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने विमुद्रीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेचा सरकारचा हेतू साध्य झाला का याबाबत चर्चा सुरु झाली आहे. निर्धारित उद्दिष्टांच्या संदर्भात अल्पकालीन ... Read More »

काम सुरू झाल्यानंतर मागण्यांवर विचार

>> आमदार नीलेश काब्राल यांची ट्रकमालकांना ग्वाही >> सहकार्य करण्याचे आवाहन आधी काम सुरू होऊ द्या, नंतर ट्रक मालकांनी सादर केलेल्या मागण्यांच्या पूर्ततेकडे लक्ष देऊ, अशी ग्वाही कुडचड्याचे भाजपचे आमदार नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. मागण्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन देऊनही फक्त ५० रुपयांच्या फरकासाठी ट्रकवाल्यांनी स्वतःच्याच पोटावर गदा आणली आहे. जे विरोधक त्यांना भडकावत आहेत ते त्यांना काहीही ... Read More »

डायोसेसनच्या शाळांनी प्राथमिक शिक्षण कोकणी – मराठीत द्यावे

>> माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरोंचा सल्ला राज्यातील चर्च संस्थेशी निगडीत डायोसेसन सोसायटीच्या विद्यालयांतून प्राथमिक स्तरावर इंग्रजी माध्यमातून दिले जाणारे शिक्षण बंद करून कोकणी व मराठी माध्यमातून द्यावेे, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री एदुआर्द फालेरो यांनी कॉँग्रेस हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिला. राज्यात माध्यम प्रश्‍न प्रलंबित असून सरकारने नियुक्त केलेल्या समितीने माध्यम प्रश्‍नी आपला अहवाल अद्याप सादर केलेला नाही. ... Read More »

कोळसा प्रकल्पाशी संबंधित कामे त्वरित बंद करा : कॉंग्रेस

गोव्याला कोळसा वाहतुकीचे प्रमुख केंद्र बनविण्यास कॉँग्रेस पक्षाचा सक्त विरोध आहे. कोळसा वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची कामे त्वरित बंद करावीत, अशी मागणी कॉँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी कॉँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात कोळसा वाहतुकीला विरोध होत असल्यास हा प्रकल्प अन्यत्र हलविण्याबाबत केलेल्या घोषणेवर विश्‍वास ठेवला जाऊ शकत ... Read More »

एलईडीद्वारे मासेमारी बंदीस केंद्राची तयारी : पालयेकर

मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी केंद्रीय मच्छीमारी मंत्री राधा मोहन सिंग यांची दिल्ली येथे काल भेट घेऊन एलईडी पद्धतीच्या मासेमारीवर बंदीची मागणी केली. केंद्रीय मंत्री सिंग यांनी एलईडी पद्धतीच्या मासेमारीवर बंदी घालण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच राज्यातील मच्छीमारी साधनसुविधांसाठी ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे, अशी माहिती मच्छीमारी मंत्री पालयेकर यांनी दिली. मंत्री पालयेकर यांनी एलईडी, बुल ... Read More »

पोलिसांना मोबाइल वापरण्यास निर्बंध

पोलिसांना सेवा बजावत असताना केवळ अधिकृत कामांसाठी मोबाइल फोनचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे. सेवा न बजावता मोबाइलवर टाइमपास करणार्‍यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांकडून सेवा बजावत असताना मोबाइल फोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे आढळून आले आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कामावर असताना वैयक्तिक कामासाठी किंवा वेळ घालविण्यासाठी मोबाइल फोनचा वापर करणार्‍या ... Read More »

पॅरा शिक्षकांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पॅरा शिक्षकांच्या प्रश्‍नावर १९ नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती पॅरा शिक्षक संघटनेच्या स्मिता देसाई यांनी काल दिली. पॅरा शिक्षकांच्यावतीने मुख्यमंत्री पर्रीकर यांना एक निवेदन काल गुरूवारी सादर करण्यात आले. पॅरा शिक्षकांच्या प्रश्‍नावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. १३३ पॅरा शिक्षकांच्या नियुक्तीबाबत नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आदेश जारी करण्यात आलेला ... Read More »

फा. बिस्मार्क मृत्यू प्रकरणाचा तपास ८ आठवड्यांत पूर्ण करा

>> उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फा. बिस्मार्क डायस मृत्यू प्रकरणाचा तपास ८ आठवड्यांत पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्याचा आदेश गुन्हा अन्वेषण विभागाला दिला आहे. फा. बिस्मार्क डायस यांच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासकाम करण्याची सूचना गुन्हा ... Read More »

साई प्रणिथ १५व्या स्थानी

>> महिला एकेरीत गोव्याची अनुरा प्रभुदेसाई १४४ वी सिंगापूर ओपन सुपर सीरिज विजेत्या बी. साई प्रणिथ याने काल गुरुवारी जाहीर झालेल्या साप्ताहिक बॅडमिंटन क्रमवारीत एका स्थानाची प्रगती करताना पंधरावे स्थान मिळविले आहे. आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चौदाव्या स्थानाची बरोबरी करण्यासाठी त्याला अजून एका स्थानाने वर सरकावे लागणार आहे. जून महिन्यात त्याने सदर स्थान मिळविले होते. महिला एकेरीत गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईने दोन ... Read More »