ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 9, 2017

गडकरींचा संताप

गोव्याच्या जनतेचा विरोध असेल तर मुरगाव बंदराच्या विकासासाठी आखलेल्या योजनांचा लाभ गोव्याऐवजी विजयदुर्ग वा कारवार बंदराला मिळवून देण्याचा इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नुकताच गोव्यातील आपल्या एका कार्यक्रमात दिला. गोव्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणास सुरू झालेल्या जनतेच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे, परंतु जनतेमधून हा विरोध का होऊ लागला आहे हे त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. मुळात नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या ... Read More »

ट्रम्प यांचा आशिया दौरा भारतासाठीही महत्त्वाचा!

शैलेंद्र देवळाणकर ‘अमेरिका ङ्गर्स्ट’चा नारा देत विविध बहुराष्ट्रीय करारांमधून माघार घेणार्‍या अमेरिकेच्या माघारीच्या भूमिकेमुळे आशिया खंडातील देशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. ती दूर करून त्यांच्यामध्ये विश्‍वासनिर्मिती करण्यासाठी ट्रम्प यांचा आशिया दौरा सुरू आहे… अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला महत्त्वाकांक्षी आशिया दौरा नुकताच सुरु झाला आहे. जानेवारीमध्ये अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर ते पहिल्यांदा आशियाच्या दौर्‍यावर आले आहेत. या १२ ... Read More »

सरकारी नोकरभरती धोरण जाहीर

>> मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती >> तीन खात्यांकडे प्रक्रियेची जबाबदारी काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोकरभरती प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी धोरण निश्‍चित करण्यात आले. नव्या धोरणानुसार मनुष्यबळ खाते, कार्मिक खाते व अर्थ खाते ही तीन खाती नोकरभरतीची प्रक्रिया सांभाळतील. ज्या खात्यात पदे भरायची असतील त्या खात्याबरोबर वरील तिन्ही खाती बैठक घेऊन जी पदे भरण्याचा प्रस्ताव आहे त्या पदांना मंजुरी द्यायची की ... Read More »

शंभर कोटींचा काळा पैसा कॅसिनोतून जप्त : पर्रीकर

संचालनालय (ईडी) आणि आयकर खात्याच्या संयुक्त पथकाने केलेल्या एका कारवाईत राज्यातील कॅसिनोशी संबधीत शंभर कोटी रूपयांचा काळा पैसा ताब्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल दिली. यावेळी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी जोरदार समर्थन केले. नोटाबंदीचा गोव्याच्या पर्यटन क्षेत्रावर कोणताही विपरित परिणाम झालेला नाही. उलट पर्यटन व्यवसायात १८ ते ... Read More »

१० डिसेंबर रोजी पेडण्यातील तीन पंचायतींच्या निवडणुका

राज्य निवडणूक आयोगातर्फे १० डिसेंबर रोजी कासारवर्णे, हळर्ण, चांदेल – हसापूर अशी तीन ग्रामपंचायतींसाठी सर्वसाधारण निवडणूक तसेच पेडणे तालुक्यातील पालये ग्रामपंचयतीतील वॉर्ड क्रमांक १ आणि सांगे तालुक्यातील उगे ग्रामपंचायतीतील वॉर्ड क्रमांक ७, मडकई ग्रामपंचायतीतील वॉर्ड क्रमांक १ आणि कुंडई ग्रामपंचायतीतील वॉर्ड क्रमांक १ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पेडणे, फोंडा आणि सांगे तालुक्यातील मामलेदारांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. ... Read More »

खोगीर नोकरभरती होणार म्हणून बंदी घातली : पार्सेकर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी नोकरभरतीमध्ये खोगीरभरती झाली असती. तसेच योग्य उमेदवारांवर अन्याय झाला असता. त्यामुळे नोकर भरतीवर तात्पुरती बंद घालण्यात आली होती, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल केले. सरकार ही निरंतन प्रक्रिया आहे. त्यामुळे मागील सरकारच्या काळातील नोकर भरतीची प्रक्रिया विद्यमान भाजप आघाडी सरकारने पुढे नेण्याची गरज आहे. परंतु प्रक्रिया पूर्ण झालेल्या पदांबाबत नियुक्तिपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात ... Read More »

नोटाबंदी विरोधात कॉंग्रेसची निषेध रॅली

गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीने काल शहरात रॅली काढून केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय बेकायदा आहे. आरबीआय बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला नव्हता. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लाखो लोकांना रोजगाराला मुकावे लागले, अशी टीका गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी केली. जीएसटीमध्ये दर निश्‍चित करताना योग्य विचार करण्यात आलेला नाही. जीएसटीसाठी कॉँग्रेसच्या ... Read More »

दाबोळी विमानतळावर ३३ लाखांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावरील कस्टम खात्याच्या गोवा विभागाच्या अधिकार्‍यांनी काल केलेल्या एका कारवाईत हवाई प्रवाशाकडून सुमारे ३३ लाख रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. प्रवाशाने आपल्या बॅगेत लपवून ठेवलेले १२४० ग्रॅम सोने कस्टम अधिकार्‍यांना सापडले. सोने तस्करी विरोधात कस्टम विभागाने आठ महिन्यांत केलेली ही दहावी कारवाई आहे. आतापर्यंत २.७४ कोटी रुपयांचे १०.१ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. जेधाह व्हाया मस्कतहून ओमन ... Read More »

यंदा इफ्फीत गोमंतकीय चित्रपट व लघुपटांचे प्रिमियर

यंदा इफ्फीत गोवा विभागात गोमंतकीय निर्मात्यांनी तयार केलेले चित्रपट व लघुपट यांचे प्रिमियर होणार असून या विभागासाठी ‘महाप्रयाण’ या फिचर फिल्मची तर अन्य तीन बिगर फिचर फिल्म्सची निवड झाली असल्याचे गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, इफ्फीसाठी आतापर्यंत ५४५१ जणांनी प्रतिनिधी म्हणून नोंदणी केली आहे. त्यांपैकी ४७२३ जणांची नोंदणी मंजूर झाली आहे. ‘महाप्रयाण’चे निर्माते ... Read More »

प्रणॉय, सायना राष्ट्रीय चॅम्पियन

>> महिला एकेरीत गोव्याच्या अनुरा प्रभुदेसाईला कांस्य पदक एच.एस. प्रणॉय व सायना नेहवालने धक्कादायक निकालांची नोंद करताना ८२व्या राष्ट्रीय सीनियर बॅडमिंटन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या किदांबी श्रीकांतला व पी.व्ही. सिंधूला या द्वयीने पराभव करत अनुक्रमे पुरुष एकेरी व महिला एकेरीत बाजी मारली. प्रणॉयने श्रीकांतवर २१-१५, १६-२१, २१-७ अशी मात करत राष्ट्रीय स्पर्धेतील आपले पहिलेवहिले अजिंक्यपद पटकावले. ... Read More »