ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 8, 2017

नोटबंदीची वर्षपूर्ती

गतवर्षी देशात आर्थिक भूकंप घडवून आणणार्‍या नोटबंदीच्या निर्णयाला आज बरोबर एक वर्ष पूर्ण होत आहे. कोट्यवधी भारतीयांना स्वतःच्याच पैशासाठी उन्हातान्हात रांगा लावायला लावणार्‍या या निर्णयातून सरतेशेवटी काय निष्पन्न झाले याचा लेखाजोखा मांडण्याची ही वेळ आहे. जी उद्दिष्टे नोटबंदी लागू करताना पंतप्रधानांनी आपल्या दूरदर्शनवरील संदेशात सांगितली होती, ती पूर्ण झाली का हा प्रश्न या समयी विचारणे अप्रस्तुत ठरू नये. नोटबंदीच्या निर्णयाद्वारे ... Read More »

वैद्यक क्षेत्रातील गैरप्रकार बंद व्हावेत…

काही इस्पितळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या हतबलपणाचा, भावनांचा गैरफायदा घेऊन त्यांना लुबाडत आहेत असे अनेकदा दिसून येते. या दुःस्थितीवर अनेक सत्शील, प्रामाणिक, वैद्यकक्षेत्रातील निष्ठावंत डॉक्टरांनी आवाज उठवला आहे. त्यामुळे अनेक गुपित कारस्थाने जगासमोर उघड झाली आहेत. संस्कृतमध्ये वैद्याला ‘यमराज सहोदर’ असे सुभाषितकारांनी म्हटले आहे. त्याचा अर्थ-वैद्य हा यमाचा मोठा भाऊ आहे. यम केवळ प्राण हरण करतो, मात्र वैद्य प्राण घेऊन धनही लुटतो. ... Read More »

…तर गोव्यातील प्रकल्प महाराष्ट्रात : गडकरी

केंद्र सरकार गोव्याच्या विकासासाठी भरीव आर्थिक निधी देत आहे. येथील नद्यांचा विकास व जलमार्गांच्या सुविधांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटी मंजूर केले आहेत. मात्र, कोळसा वाहतूक व नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाला गोमंतकीय जनतेचा विरोध असेल बळजबरीने गोव्यावर प्रकल्प लादले जाणार नसून सदर प्रकल्प महाराष्ट्रातील विजयदुर्ग येथे नेण्यात येतील असे केंद्रीय नदी परिवहन, भूपृष्ठ खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितले. देशातील पोर्ट ... Read More »

वेदांताची खनिज वाहतूक दुसर्‍या दिवशीही रोखली

कोडली येथील वेदांता कंपनीच्या गेटसमोर हजारो ट्रकमालक दुसर्‍या दिवशी एकत्रित झाल्याने पोलीस बंदोबस्तात खनिज वाहतूक करण्याचा कंपनीचा बेत पुन्हा फसला. गोवा स्पॉईंज कंपनीचा एक ट्रक ट्रक मालकांनी रस्त्यावर रोखून धरल्याने परिसरात वातावरण तंग झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून स्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ट्रक मालकांनी दिला आहे. सोमवारी पोलीस ... Read More »

‘रेरा’चा मसुदा कायदा विभागाकडे

सरकारने रिअल इस्टेट ऍक्ट २०१६ (रेग्यूलेशन अँड डेव्हलपमेंट) या कायद्याच्या कार्यवाहीसाठी प्रयत्न चालविले असून ‘रेरा’ कायद्याच्या मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन मान्यतेसाठी कायदा विभागाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. नगरविकास खात्याने रेरा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गोवा बांधकाम नियमन आणि विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. पाटो, पणजी येथे नगर नियोजन खात्याच्या ... Read More »

नोकरभरतीवर बंदी घातल्याने पार्सेकरांचा पराभव : सुदिन

नोकरभरती बंद केल्याच्या प्रश्‍नावरून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सरकारवर टीका करणार्‍या लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपण मुख्यमंत्रीपदी असताना २०१६ साली नोकरभरती का बंद केली होती, असा प्रश्‍न काल सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल केला. पार्सेकर यांनी ही नोकरभरती बंद केल्यानेच ते स्वत: मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचा दावाही ढवळीकर यांनी केला. पार्सेकरांनी निवडणुका तोंडावर असताना नोकरभरती रद्द केल्याने भाजपच्या ... Read More »

तिसवाडीला मेपर्यंत मर्यादित पाणी

>> ओपातून कमी पुरवठ्यामुळे समस्या ओपा प्रकल्पातून तिसवाडी तालुक्यातील पाच मतदारसंघात सध्या १० एमएलडी पाण्याचा कमी पुरवठा होत असल्याने राजधानी पणजीसह ताळगाव, बांबोळी, सांताक्रुझ, मिरामार, सांतआंद्रे या भागात मर्यादित पाणीपुरवठा करावा लागत आहे. ओपा पाणी प्रकल्पात नवीन २७ एमएलडी पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम मे -२०१८ मध्ये पूर्ण झाल्यानंतर पाणी पुरवठ्यात सुसूत्रता येेऊ शकते, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाचे ... Read More »

संमेलनाध्यक्षपद जनमानसाच्या मानसातला अधिकार

>> ‘अक्षर मानव’चे संस्थापक राजन खान यांचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा अधिकार हा जनमानसाच्या मानसातला अधिकार असतो. आजवर लेखक म्हणून माणूस म्हणून जे काम करत आलो, ‘अक्षर मानव’च्या विविध उपक्रमांनी माणसं एकमेकांशी जोडून देण्याचे प्रयत्न करत आलो, साहित्याच्या आणि समाजाच्या विकासाचे प्रयत्न करत आलो, त्या सर्व कामांना अध्यक्षपदाच्या अस्तित्वाचे बळ मिळेल. भूमिका मांडायला व्यापक जागा मिळेल. ती ... Read More »

टीम इंडियाने टी-२० मालिका जिंकली

>> रोमहर्षक निर्णायक लढतीत न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात >> बुमराह सामनावीर व मालिकावीर पावसाच्या व्यत्ययात खेळविण्यात आलेल्या प्रत्येकी ८ षट्‌कांच्या निर्णायक व शेवटच्या सामन्यात गोलंदाजांच्या सूत्रबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने रोमहर्षक लढतीत न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात करीत टी-२० मालिका २ -१ अशी जिंकली. भारतासाठी हा ऐतिहासिक मालिका विजय ठरला. कारण त्यांनी पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध टी -२० मालिका विजय जिंकण्याचा पराक्रम केला. टीम ... Read More »

गोवा पराभवाच्या छायेत

कचखाऊ फलंदाजीमुळे पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर राजस्थानविरुद्ध सुरू असलेल्या चार दिवशीय अंडर-१९ कूच बिहार क्रिकेट स्पर्धेत गोवा पराभवाच्या छायेत आहे. १६७ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना काल तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत गोव्याची स्थिती ८ बाद १२१ अशी झाली आहे. त्यांना विजयासाठी अजून ४६ धावांची गरज असून केवळ २ गडी बाकी आहेत. एकवेळ गोव्याची स्थिती ८ बाद ९३ अशी झाली होती. ... Read More »