ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 7, 2017

पॅराडाईज पेपर्स!

नोटबंदीच्या वर्षपूर्तीस सरकार काळा पैसा विरोधी दिन पाळण्याच्या तयारीत असतानाच पॅराडाईज पेपर्सच्या रूपाने एक नवा महाघोटाळा काल उजेडात आला. एका जर्मन वर्तमानपत्राने शोधपत्रकारांच्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने साडे तेरा दशलक्ष कागदपत्रांची जवळजवळ दहा महिने छाननी करून हे आर्थिक हलाहल बाहेर काढले आहे. इतर अनेक देशांप्रमाणेच बड्या बड्या भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांनी करबुडवेगिरीसाठी विदेशांमध्ये केलेल्या उचापतींची ही जणू कुंडली आहे. एकूण ... Read More »

जनतेला भाषा सक्ती करणे घटनाबाह्यच!

ऍड. असीम सरोदे राज्यघटनेतील कलम १९ नुसार देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्या मध्ये आपल्या भाषेत व्यक्त करण्याची संधी मिळणे ही बाब अनुस्यूत आहे. तशी व्यवस्था निर्माण करण्याचे काम राज्य शासनाचे आहे… सरकारांकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासंदर्भातील प्रयत्न अधूनमधून होत असतात. यामध्ये बहुतांश वेळा राजकीय स्वार्थ दडलेला असतो. बरेचदा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर एखाद्या समाजाला अथवा विशिष्ट गटाला, समूहाला खुश करण्यासाठी, त्यांचे ... Read More »

वेदांताचा खनिज वाहतुकीचा प्रयत्न फसला

>> हजारभर ट्रकमालकांचे गेटसमोर धरणे >> तोडगा काढण्याचा प्रयत्न असफल कोडली येथील वेदांता कंपनीतर्फे कालपासून पोलीस संरक्षणात खनिज वाहतूक सुरू करण्याचा केलेला प्रयत्न ट्रक मालकांच्या प्रखर विरोधामुळे फसला. ट्रकमालक संघनेने केलेल्या आवाहनानुसार सुमारे हजारभर ट्रकमालकांनी कंपनीच्या गेटसमोर धरणे धरून खनिज वाहतूक करण्यास मज्जाव केला. यावेळी धारबांदोड्याचे मामलेदार लक्ष्मीकांत कुर्ट्टीकर यांनी कपंनीचे अधिकारी व ट्रकमालक यांची बैठक घेऊन तोडग्यासाठी केलेल्या प्रयत्नांनाही ... Read More »

मुरगाव राजाचा मंडप हटविला

सुमारे ३०० हून अधिक पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात मुरगाव पालिकेच्या मुख्याधिकारी, संयुक्त मामलेदार विमोद दलाल, मुरगाव तालुका पोलिस उपअधिक्षक सुनिता सावंत यांच्या देखरेखीखाली हेडलॅण्ड सडा येथील मुख्य नक्यावरील वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या मुरगावच्या राजाच्या शेडखालील सजावट अखेर हटविण्यात आली. या शेडीवरून मुरगावचे आमदार मिलिंद नाईक विरुध्द त्यांचे विरोधक यांच्यामध्ये जुंपली होती. मुरगावच्या राजा गणेशोत्सव शेडखालील मंडप तसेच केलेली सजावट हटवण्याच्या आदेशावरून वाद ... Read More »

‘पॅराडाईज पेपर्स’ संदर्भात यंत्रणांद्वारे संयुक्त तपास

शोध पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने उघड केलेल्या ‘पॅराडाईज पेपर्स’ संदर्भात भारत सरकारच्या आर्थिक गुन्हेविषयक तपास यंत्रणांच्या एका संयुक्त समितीद्वारे चौकशी करण्याची तयारी सरकारने चालवली आहे. १३.४ दशलक्ष कागदपत्रांच्या छाननीतून जगभरातील बड्या कॉर्पोरेटस्‌नी १९ करमुक्त देशांमध्ये केलेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची माहिती उघड झाली असून त्यात ७१४ भारतीयांची नावे आढळली आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन, संजय दत्तची पत्नी मान्यता, केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा, कार्ती ... Read More »

डिजिटल मीटर्सप्रश्‍नी उद्यापर्यंत अध्यादेश द्या : कोर्ट

राज्यातील पर्यटक टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याबाबत बुधवारपर्यंत अध्यादेश जारी करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दिला. पुढील सुनावणी उद्या घेण्यात येईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात राज्यातील टूरिस्ट टॅक्सींना डिजिटल मीटर, जीपीएस व इतर सुविधा बसविण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे. Read More »

सिद्धार्थ, महादेव नाईक यांची मालमत्ता जाहीर

माजी मंत्री महादेव नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी मालमत्तेचा तपशील लोकायुक्तांना काल सादर केला. लोकायुक्तांनी मालमत्तेचा तपशील सादर न करणार्‍या १२ राजकारण्यांची नावे जाहीर केली होती. त्यात माजी मंत्री महादेव नाईक, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या नावाचा समावेश आहे. वर्ष २०१६-२०१७ या आर्थिक वर्षात आमदार म्हणून कार्यरत असलेल्यांना मालमत्तेचा तपशील सादर करणे बंधनकारक आहे. Read More »

वर्षभरात मासळी महामंडळ : मत्स्यद्योगमंत्री

वर्षभरात मासळी महामंडळाची स्थापना करण्यात येणार असल्याचे मच्छीमारी खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी काल सांगितले. मासळी महामंडळाची स्थापना करून गोमंतकीयांना माफक दरात मासळी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात गोमंतकीयांना स्वस्त दरात मासळी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आश्‍वासन पूर्ण करण्यात येणार असून त्यासाठी शीतगृहे उभारून मासळी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात येईल. महामंडळाच्या विक्री ... Read More »

कॉंग्रेसने अन्याय केल्याची आलेक्स सिक्वेरांना खंत

कॉँग्रेस पक्षामुळे राजकीय क्षेत्रात कारकिर्द घडविण्याची संधी प्राप्त झाली. कॉँग्रेस पक्षाचे पक्ष संघटन मजबूत करण्याच्या कार्यात योगदान देण्याच्या उद्देशाने दोन्ही जिल्हा समित्यांना कार्यालये उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु, माझ्या विरोधात पक्षातील काही नेत्यांनी कृती करून पक्षातून निलंबित करण्याचा बनावट फतवा काढला. तसेच फेब्रुवारी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावेळी आपल्यावरच अन्याय केला, अशी खंत माजी वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी ... Read More »

भारत-न्यूझीलंड निर्णायक टी-२० आज

>> सामन्यावर पावसाचे सावट >> कुलदीपला मिळू शकते संधी भारत व न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व शेवटचा सामना आज ग्रीनफिल्ड मैदानावर खेळविला जाणार आहे. भारतीय भूमीवर क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात दोन किंवा जास्त सामन्यांचा समावेश असलेली मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर न्यूझीलंडचा संघ असून त्यांना रोखण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. भारताने शेवटच्या वेळी या मैदानावर सामना खेळला होता. त्यावेळी विराट ... Read More »