ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 6, 2017

वर्ज्य स्वर

तीन मित्रपक्ष आणि अपक्ष यांचे मिळून बनलेले राज्यातील सरकार स्थैर्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना खुद्द या सत्ताधारी आघाडीचा प्रवर्तक पक्ष असलेल्या भाजपाचेच ज्येष्ठ नेते आणि नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनीच सरकारविषयी नाराजीचा सूर लावून जनतेच्या मनात नाहक संभ्रम निर्माण केला आहे. आपल्या खात्याबाबत प्रशासनाकडून दुजाभाव होत असून सरकारकडून वेतन अनुदान व विकास निधी मिळून दहा कोटींहून अधिक निधी पालिकांना येणे आहे ... Read More »

आपत्कालीन परिस्थितीतील सज्जतेसाठी…

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) विमान हल्ल्यात विमानतळ नष्ट झाले, तर आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमाने उतरवण्याचा सराव असावा यासाठी लखनौ-आग्रा एक्सप्रेस वेवरील चार किलोमीटर भागात २० लढाऊ विमानांच्या उतरण्या – उड्डाणाचा सराव नुकताच झाला. मात्र, पाक व चीन याबाबत आपल्यापुढे आहेत.. मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी भारतीय वायुसेनेने आपल्या शक्तिप्रदर्शनार्थ तसेच युद्धजन्य परिस्थिती प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील उन्नाव जवळच्या लखनौ आग्रा ... Read More »

वेदांताची खनिज वाहतूक आजपासून सुरू होणार?

>> स्थानिक ट्रकमालक धरणार गेटसमोर धरणे कोडली येथील वेदांता कंपनीतर्फे आज सोमवारपासून पोलीस संरक्षणात खनिज वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. मात्र स्थानिकांनी ट्रक खाणीवर पाठवू नयेत तसेच सकाळी ८ वा. ट्रक मालकांनी कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. काल रविवारी कळसाई-दाबाळ येथील आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत स्थानिक आमदार दीपक पाऊसकर, सरपंच संदीप ... Read More »

नव्या पीडीएसंदर्भात चर्चा करूनच निर्णय : सरदेसाई

कुठे कुठे नव्या पीडीएची गरज आहे त्यासंबंधी नगर आणि नियोजन मंडळाच्या बैठकीत चर्चा करून त्यासंबंधी योग्य तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे नगर आणि नियोजन खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. नियोजन म्हणजे खेळ नव्हे. त्यामुळे कुणी मागणी केली म्हणून कुठल्याही भागासाठी नवी पीडीए स्थापन करता येणार नाही असे मगो पक्षाने फोंडा व पेडणे येथे नव्या पीडीए ... Read More »

पर्वरी येथील अपघातात युवक जागीच ठार

पर्वरी महामार्गावरील दमानिया गोवा या फर्निचर शोरुमसमोर काल पहाटे दीड वाजता अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर त्याचा मित्र गंभीररीत्या जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल पहाटे दीड वाजता मानस नारायण दास (३१) आणि त्याचा मित्र सागर दनपत (२०) आपल्या दुचाकीवरून पर्वरी महामार्गावरून पणजीला जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीजखांबाला जोराची धडक दिली. यामुळे मानस हा युवक जागीच ठार ... Read More »

दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी होणार ?

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या येत्या आठवड्यात होणार्‍या बैठकीत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील ही बैठक १० नोव्हेंबरला होणार आहे. ही चर्चा सकारात्मक झाली तर २८ वरून १८ टक्के जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना बराच दिलासा मिळू शकेल. हाताने बनवलेले फर्निचर, प्लास्टिक उत्पादने, शाम्पू आदी वस्तूंवरील कराचा फेरविचार ... Read More »

भाज्यांचे दर कडाडले

>> सर्वच भाज्या ५०रु. किलोच्या पुढे सध्या गोव्यात भाज्यांचे दर गगनाला भिडले असून लोकांवर एक वेळ मासळी परवडली पण भाज्या नकोत असे म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या बाजारात कोणतीच भाजी ५० रु. प्रती किलोपेक्षा कमी दरात उपलब्ध नसून गाजर व बीटचे दर प्रती किलो ८० रु. असे भडकले आहेत. सर्वांत स्वस्त समजल्या जाणार्‍या कोबीचे दरही प्रती किलो ५० ते ६० ... Read More »

खाजगी बसमालकांचे धरणे आंदोलन मागे

आपल्या विविध मागण्यांसाठी खासगी बसमालकांनी आज सोमवारी येथील वाहतूक खात्याच्या कार्यालयासमोर धरणे धरण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला असल्याचे खासगी बसमालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. खासगी बसमालकांना वाहतूक खात्याकडून इंधनावर अनुदान दिले जाते. प्रती कि. मी. ३ रु. एवढे हे अनुदान इंधनावर देण्यात येत असते. तसेच बसगाड्यांच्या विम्याचा जो हप्ता असतो त्याचे ५० टक्के पैसे ... Read More »

मुरगाव शेड समर्थक-विरोधक आमनेसामने

>> वातावरणात तणाव, शेड आज हटवणार? ‘मुरगावचा राजाची शेड’वरून शेड समर्थक तसेच आमदार मिलिंद नाईक समर्थक असे दोन गट काल रविवारी सडा येथील मुख्य नाक्यावर एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे याठिकाणी काही काळ वातावरण तंग झाले. मात्र मिलिंद नाईक समर्थक, भाजप मंडळ, भाजयुमो व महिला मोर्चाच्या कार्यकर्ते या ठिकाणी पत्रकार परिषद घेतल्यानंतर तेथून निघून गेल्यामुळे वातावरण शांत झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात ... Read More »

गोमंतकीय कलाकारांची डिरेक्टरी काढणार ः गावडे

>> कला अकादमीत केसरबाई केरकर समारोहाची सांगता गोव्यातील कलाकारांची अकादमीतर्फे लवकरच डिरेक्टरी काढण्यात येणार आहे. असे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. कला अकादमी आयोजित ३७ व्या सूरश्री केसरबाई केरकर संगीत समारोहाची सांगता काल रविवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंत्री श्री. गावडे यांच्या हस्ते संगीत समीक्षक पं. रवींद्र मिश्र, शशिकांत चिंचोरे व जनार्दन वेर्लेकर यांचा तसेच संमेलनात ... Read More »