ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 4, 2017

गरज खबरदारीची

खाण व्यवसायाच्या अतिरेकाने अलीकडेच होरपळून निघालेल्या गोव्यात मुरगाव बंदरात उतरविल्या जाणार्‍या कोळशाच्या आंतरराज्य वाहतुकीच्या रूपाने नवे पर्यावरणीय संकट उभे राहिल्याचा इशारा देणारी वृत्तमालिका नुकतीच इंडियन एक्स्प्रेस या राष्ट्रीय दैनिकाने चालवली. एखादे वृत्तपत्र हाताळत असलेल्या विषयाची दुसर्‍याने दखलच घ्यायची नाही, असा जणू वृत्तपत्रीय क्षेत्रात अकारण संकेत बनून गेला आहे, परंतु जेव्हा अशा एखाद्या जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर काही महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाशझोत एखाद्या ... Read More »

कपिल सिब्बल यांचा फुसका सिद्धान्त

ल. त्र्यं. जोशी सकृतदर्शनी असे वाटत होते की, सिब्बल यांच्या या प्रतिपादनात दम आहे. तो निष्कर्ष सिब्बल यांच्या वकिली युक्तिवादाच्या कौशल्याचा परिणाम असेलही पण वस्तुस्थितीच्या आधारे जेव्हा त्या युक्तिवादाचा विचार केला जातो तेव्हा सिब्बलसाहेबांचा युक्तिवाद आडवा होतो.. नोटबंदी आणि जीएसटीसारख्या आर्थिक मुद्द्यांवरुन मोदी सरकारला घेरण्याचा कॉंग्रेसचा नेटाचा प्रयत्न सुरु असतानाच तो अधिक मजबूत करण्यासाठी माजी माहिती तंत्रज्ञान व विधी मंत्री ... Read More »

करिअर आणि संस्कृती

– प्रा. रामदास केळकर जबाबदारी शाळेपुरती किंवा सरकारपुरती मर्यादित नसून ती तुम्हा-आम्हा सर्वांचीच जबाबदारी आहे. हा देश चालविण्यासाठी याच देशाचे नागरिक पुढे यायला हवेत. त्यासाठी योग्य ती संस्कृती आपणच निर्माण करायची आहे. यासाठी माहितीची गंगोत्री आपल्या मदतीला आहेच. आपण नेहमी एकाच नजरेने गोष्टींचा विचार करतो पण ज्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे सगळे करत असतो त्यांचेही विचार आपण जाणून घेतले पाहिजेत ना! ... Read More »

विवेक स्पंदन परत मातृभूमीला…

– प्रा. रमेश सप्रे नरेंद्र जो आता स्वामी विवेकानंद बनला होता तो नुसता अक्षयवट बनणार नव्हता तर चैतन्यवट बनणार होता. कारण एरवी वटवृक्षाखाली इतर रोपं-झाडं वाढत नाहीत. पण नरेंद्राच्या म्हणजेच विवेकानंदांच्या छायेत अनेक जीवनं विकसणार होती. देशविदेशात विस्तारणार होती. ‘मी परतेन तेव्हा एखाद्या बॉंबगोळ्यासारखा आपल्या समाजावर आदळेन’, हे उद्गार होते स्वामी विवेकानंदांचे परदेशात जाण्यापूर्वी. त्यांना आपल्या जीवनकार्याची पूर्ण कल्पना होती. ... Read More »

मोपा विस्थापितांचे पुनर्वसन

>> १५ सदस्यांना जीएमआर कंपनीत नोकर्‍या >> १४ कुटुंबांना पुनर्वसन पॅकेज मोपा – पेडणे येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे सरकारने काल पुनर्वसन केले. १४ कुटुंबांना पुनर्वसन पॅकेज आणि १५ सदस्यांना नोकरीची नियुक्तिपत्रे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आली. या १५ प्रकल्पग्रस्तांना जीएमआर कंपनीतर्फे कायम स्वरूपी नोकरी दिली जाणार असून पुनर्वसन आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारने जीएमआर ... Read More »

डिझेल दर उतरवा किंवा १४ रु. दर द्या

>> खाण ट्रकमालकांची सावर्डे बैठकीत ठाम मागणी सरकारने निश्‍चित केलेला खनिज वाहतूक दर डिझेल दरामुळे परवडणार नसल्याने डिझेलचा दर उतरवला तरच परवडण्यासारखा आहे. म्हणून सरकारने या समस्येवर तोडगा काढणे महत्त्वाचे आहे. एक तर डिझेलचा दर कमी करा किंवा १४ रुपये दर निश्‍चित करा या मागणीवर ट्रकमालक ठाम आहेत असा पवित्रा कालच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारपासून पोलीस संरक्षणात खनिज वाहतूक सुरू ... Read More »

‘महिलांसाठी गोवा सुरक्षित’ चे श्रेय मुख्यमंत्र्यांणा : सुलक्षणा सावंत

केंद्रीय बाल आणि महिला विकास मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात गोवा राज्य हे मुले व महिला यांच्यासाठी सुरक्षित राज्य असल्याचे दिसून आलेले आहे. गोव्यातील मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार त्यासाठी अभिनंदनास पात्र असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. भाजप महिला मोर्चातर्फे आपण त्यासाठी सरकारचे अभिनंदन करीत असल्याचे त्या म्हणाल्या. महिला सुरक्षेत गोवा ... Read More »

पंचायतींच्या पोटनिवडणुका १० डिसेंबर रोजी घेणार

राज्यातील चार पंचायतीच्या चार प्रभागासाठी १० डिसेंबर २०१७ रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. पेडणे तालुक्यातील पालये पंचायतीच्या प्रभाग १ , सांगे तालुक्यातील उगे पंचायतीच्या प्रभाग ३, फोंडा तालुक्यातील मडकई पंचायतीच्या प्रभाग २ (राखील ओबीसी) आणि कुंडई पंचायतीच्या प्रभाग १ साठी निवडणूक घेतली जाणार आहे. दरम्यान, १० डिसेंबर २०१७ रोजी निवडणूक होणार्‍या हर्ळण पंचायतीचा प्रभाग ५ अनुसुचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला ... Read More »

भारतीय महिला अंतिम फेरीत

>> आशिया चषक हॉकी ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर भारतीय हॉकी महिला संघाने आपली विजयी घोडदौड चालू ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. काल झालेल्या उपांत्य लढतीत भारतीय महिलांनी गतविजेत्या जपानवर ४-२ अशी मात करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत भारतीय महिलांची गाठ चीनशी पडणार आहे. चीनने दक्षिण कोरियाला ३-२ असे पराभूत ... Read More »

टी-२० मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-२० लढतींच्या मालिकेतील दुसरा सामना आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात न्यूझीलंडवर मात करीत पाच वर्षातील आपल्या तिसर्‍या टी -२० मालिका विजयाच्या इराद्यानेच मैदानावर उतरणार आहे. तर न्यूझीलंड संघ मालिकेत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील असेल. टीम इंडियाने दिल्लीत झालेल्या पहिल्या सामन्यात ५३ धावांनी विजय मिळवित मालिकेत १-० अशी आघाडी मिळविलेली ... Read More »