ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 3, 2017

नायक!

आजवर अवघे समाजसमर्पित जीवन जगत आलेले आदरणीय रामकृष्ण नायक आज वयाच्या नव्वदाव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. सामान्य माणसाच्या आयुष्यातील वर्षांमागून वर्षे प्रापंचिक जबाबदार्‍या पेलता पेलता मागे पडत असतात, परंतु अशा एखाद्या समाज समर्पित माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मात्र स्वतःपेक्षा समाजासाठी काही तरी देणारा ठरत असतो. त्याच्या धडाडीतूनच समाजात भव्य दिव्य असे काही काम उभे राहते आणि त्यातून इतिहास घडत असतो. ... Read More »

किनार्‍यांवरील वाळूच्या टेकड्या गेल्या कुठे?

सुशांत द. तांडेल छोट्या मोठ्या बांधकामांसाठी लागणार्‍या वाळूसाठी म्हणा किंवा गोर-गरीब उदरनिर्वाहासाठी घालत असलेल्या हंगामी गाळ्यांसाठी म्हणा किंवा थोरा-मोठ्यांच्या मनोरंजनाच्या नावाखाली होत असलेल्या चिरेबंदी बांधकामासाठी म्हणा, किनारपट्टीवर खरा बळी जातो तो हाच वाळूच्या टेकड्यांचा पट्टा. गेल्या चार पाच महिन्यांच्या पावसाळी वातावरणात खवळून गेलेला अथांग महासागर आता पुन्हा एकदा शांत झाला आहे. याच संथ, मनमोहक समुद्राचे नयनरम्य दर्शन घेण्यासाठी येणार्‍या लाखो ... Read More »

काणकोणात मिनी बस उलटून २७ प्रवासी जखमी

>> दुमाणे-आगोंदा येथील दुर्घटना >> १५ प्रवासी गंभीर >> आल्टो कारला धडक काणकोणहून आगोंदा मार्गावर वाहतूक करणार्‍या सोनम या जीए ०८ – टी – ०००९ क्रमांकाच्या प्रवासी मिनी बसला दुमाणे – आगोंदा मार्गावरील एका जीवघेण्या वळणावर समोरून येणार्‍या जीए – ०३ – पी – २१०८ आल्टो कारला बाजू देताना झालेल्या भीषण अपघातात प्रवासी मिनी बस उलटून बसमधील २७ प्रवासी जखमी ... Read More »

६० ग्रेडच्या खनिजावरील निर्यात शुल्क रद्द करावेत

>> मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्रीय खाण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची काल गुरूवारी नवी दिल्ली येथे भेट घेऊन राज्यातील खाण व्यवसायाला बळकटी देण्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ६० ग्रेडच्या खनिजावरील निर्यात शुल्क रद्द करावेत, अशी मागणी केली. केंद्रीय खाण मंत्री तोमर यांच्याशी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी खाण क्षेत्राशी संबंधित सर्व विषयांवर चर्चा केली. ५८ ... Read More »

गोवा महिलांसाठी सर्वाधिक सुरक्षित

भारतात महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे सर्वांत सुरक्षित राज्य असल्याचे ‘प्लान इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार ही राज्ये महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने हा अहवाल काल प्रसिद्ध केला. महिलांच्या सुरक्षेत गोवा अव्वल असला तरी शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत पाचव्या तर गरिबीत आठव्या स्थानावर ... Read More »

बोंडलात वाघाची डरकाळी घुमणार!

राज्यातील एकमेव बोंडला येथील प्राणी संग्रहालयात कर्नाटकातील प्राणी संग्रहालयातून वाघ- वाघिणीची जोडी, हत्ती आणण्याच्या प्रक्रियेला तत्त्वतः मान्यता मिळालेली आहे. वरील प्राणी आणण्याबाबतचे कागदोपत्री सोपस्कार सुरू आहेत, अशी माहिती वन्य जीव उपवनसंरक्षक विकास देसाई यांनी काल दिली. बोंडला प्राणी संग्रहालयातील वाघ – वाघीण यांचा अलीकडेच मृत्यू झाला होता. २००९ मध्ये विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी प्राणी संग्रहालयातून संध्या व राणा ही वाघीण ... Read More »

लाडली लक्ष्मी योजनेच्या प्रलंबित तीन हजार अर्जांना लवकरच मंजुरी

महिला व बालकल्याण खात्याच्या लाडली लक्ष्मी योजनेअर्तंगत प्रलंबित १० हजार अर्जांपैकी ३ हजार अर्ज नोव्हेंबर महिन्यात निकालात काढण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ५१ हजार ८५२ जणांना लाडी लक्ष्मी योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. तसेच पंधरा युवतींना निधीचा शिक्षणासाठी वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी काल दिली. ... Read More »

उदयोन्मुख कलाकारांसाठी कला दालन उभारणार

>> कला-संस्कृती मंत्र्यांची ग्वाही >> राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन- बक्षीस वितरण कलाकारांना कोणतीच कमतरता भासता कामा नये याची खबरदारी घेतली जाईल असे सांगून कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी उदयोन्मुख कलाकारांसाठी कला दालन उभारण्याचे आपले स्वप्न आहे असे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल सांगितले. कला अकादमी गोवा आयोजित ४३व्या राज्य कला प्रदर्शनाचे (चित्रकार विभाग) अकादमीच्या कला दालनात ... Read More »

भारतीय महिला उपांत्य फेरीत

>> कझाकस्तानवर ७-१ अशी मात ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने नोंदविलेल्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर भारतीय महिलांनी आशिया चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. काल खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय महिलांनी कझाकस्तानचा ७-१ असा फडशा पाडला. सामन्याच्या दुसर्‍याच मिनिटाला वीरा दोमाशनेवाने आकर्षक मैदानी गोल नोंदवित कझाकस्तानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु त्यांचा आनंद काही क्षणांपुरतीच टिकाला. कारण गुरजीत कौरने लगेच चौथ्या मिनिटाला ... Read More »

जिंकण्यासाठीच मैदानात उतरू ः सेर्जिओ

आपला संघ आक्रमक खेळावर भर देणार असून जिंकण्यासाठीच मैदानावर उतरणार आहे. एफसी गोवाने एक बॅ्रँड फुटबॉल खेळण्यासाठी तयारी केलेली असून संघ केवळ विजयासाठीच खेळेल असा विश्वास एफसी गोवाचे नवीन स्पेनीश मुख्य प्रशिक्षक सेर्जिओ लोबेरा यांनी बांबोळी ऍथलेटिक स्टेडियवर आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आपला संघ बचावात्मक खेळावर भर देणार नसून फुटबॉल घेऊन आक्रमण करणे हेच आमचे ध्येय असेल. तुम्ही चेंडू ... Read More »