ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: November 2, 2017

पुन्हा एकांडा हल्ला

न्यूयॉर्कमधील जगाची आर्थिक राजधानी गणल्या जाणार्‍या मॅनहॅटन भागात काल एका माथेफिरूने एकांडा हल्ला केला. भाड्याने घेतलेली पिकअप त्याने पादचार्‍यांच्या आणि सायकलस्वारांच्या गर्दीत घुसवल्याने आठ जणांचा बळी गेला, तर कित्येक जण जखमी झाले. वर वर पाहता ही घटना तशी छोटी वाटेल, परंतु तिला अनेक परींनी मोठा अर्थ आहे. पहिली गोष्ट म्हणजे या हल्ल्यामागे आयसिसच्या विचारधारेचा सैफुल्ला सैपोव्ह हा उझ्बेक माथेफिरू असल्याचे ... Read More »

दक्षिण आशियातील नवी सत्ता समीकरणे

शैलेंद्र देवळाणकर दक्षिण आशियातील सत्तासमीकरणे सध्या झपाट्याने बदलत आहेत. यामध्ये अङ्गगाणिस्तानातील परिस्थिती महत्त्वाची ठरत आहे. अमेरिकेचे टिलर्सन आणि अङ्गगाणिस्तानचे अश्रङ्ग गनी यांची एकाच वेळी झालेली भारत भेट या नव्या समीकरणांची दिशा ठरवणारी ठरली आहे. सरत्या आठवड्यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड घडली. अमेरिकन सेक्रेटरी ऑङ्ग स्टेट रेक्स डब्ल्यू टिलरसन आणि अङ्गगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष दोघेही एकाच वेळेला भारत भेटीवर आले होते. पंतप्रधान नरेंद्र ... Read More »

सरकारी नोकर्‍यांसाठी यापुढे वर्षातून एकदाच जाहिरात

>> मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय >> पार्सेकर काळातील ६०० पदे भरणार सरकारच्या विविध खात्यातील नोकर भरतीसाठी वर्षातून एकदाच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. २०१८ या वर्षातील नोकरभरतीच्या विविध पदांसाठीच्या जाहिराती डिसेंबर २०१७ मध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मागील सरकारच्या काळातील प्रक्रिया पूर्ण झालेल्या सहाशे पदांसाठी उमेदवारांना नियुक्तिपत्रे देण्यात मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ... Read More »

खनिज मार्गांवरील घरामागे एका ट्रकाला काम मिळणार

>> कायदा हातात घेणार्‍यांचा परवाना रद्द : पर्रीकर कायदा हातात घेणार्‍या व्यक्तीच्या ट्रकांना खनिज माल वाहतूक करण्याची परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खनिज वाहतूक मार्गांवरील ट्रक असलेल्या कुटुंबातील एकातरी ट्रकाला खनिज वाहतुकीचे काम देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिली. खाण खात्याने खनिज मालाची वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने खाण ... Read More »

गोमेकॉत लवकरच २४ तास कार्डियाक विभाग : विश्‍वजित

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये चोवीस तास सेवा देणारा कार्डियाक विभाग सुरू केला जाणार असून मडगाव, पणजी, उत्तर गोव्यातील किनारी भाग, काणकोण व केपे या भागात कार्डियाक रुग्णवाहिकेची सुविधा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे. प्रत्येक कार्डियाक रुग्णवाहिकेवर कार्डियाक डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे काल दिली. राज्यात कार्डियाक रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रुग्णांना वेळेवर आरोग्य ... Read More »

पोर्तुगीज पासपोर्टसाठीच्या नव्या प्रक्रियेला गोवा फॉरवर्डची हरकत

विदेश व्यवहार मंत्रालयाने पोर्तुगीज पासपोर्ट मिळविण्यासाठी नवीन प्रक्रियेला सुरुवात केली आहे. ह्या नवीन प्रक्रियेमुळे पोर्तुगीज पासपोर्ट मिळविण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहेत. त्यामुळे पोर्तुगीज पासपोर्टसाठी जुनी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे केली असल्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी काल सांगितले. राज्यातील युवकांना नोकर्‍या मिळत नसल्याने पोर्तुगीज पासपोर्ट घेऊन ते ... Read More »

पीडीए विभाजन येत्या पंधरा दिवसांत : विजय

नागरीकरण होणारे जास्त विभाग पीडीएखाली आणण्याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सकारात्मक आहेत. नवीन पीडीएच्या प्रस्तावाबाबत येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. नागरीकरणाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने नवीन भाग पीडीएखाली आणणे आवश्यक बनलेले आहे. नवीन भागांचा पीडीएमध्ये समावेश करण्याबाबत योग्य निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगर नियोजन ... Read More »

जीपीएल कर्मचार्‍यांच्या पगारातून होणार भरपाई

>> औषधे कमी आढळल्याचा ठपका गोवा अँटिबायोटीक्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (जीएपीएल) च्या मडगाव येथील मेडीसेंटरच्या सप्टेंबर २०१७ मध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये २६,९०५ रुपयांचा औषधसाठा कमी आढळून आला असून या रक्कमेची वसुली कर्मचार्‍यांच्या तीन महिन्यांच्या पगारातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जीएपीएल कंपनीने सप्टेंबर २०१७ च्या पहिल्या आठवड्यात केलेल्या तपासणीमध्ये जीएपीएलच्या मडगाव येथील मेडीसेंटरमध्ये औषधसाठा कमी असल्याचे आढळून ... Read More »

सागरी क्षेत्रात शांतता प्रस्थापित होण्याची आवश्यकता : संरक्षणमंत्री

> > सागरी परिषद-२०१७ चे उद्घाटन >> आयएनएस मांडवी येथे आयोजन समविचारी राष्ट्रांनी सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून भारतीय महाद्वीपात नव्याने उद्भवणार्‍या धोक्यांना आटोक्यात आणण्याची आवश्यकता आहे. भारतीय महाद्वीपामध्ये जागतिक भवितव्य बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे आपसात राजकीय आणि आर्थिक संवाद प्रस्थापित झाला पाहिजे, असे मत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल येथे व्यक्त केले. संरक्षण मंत्र्यांहस्ते काल आयएनएस मांडवी येथे आयोजित दोन दिवसीय ... Read More »

नेहराला टीम इंडियाचा विजयी निरोप

>> पहिल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडवर ५३ धावांनी मात >> रोहित-धवनची १५८ धावांची भागीदारी टी-२० मध्ये न्यूझीलंडविरुद्धची पराभवाची मालिका खंडीत करताना भारताने बुधवारी झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ५३ धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना ३ बाद २०२ धावा कुटल्यानंतर भारताने किवीज संघाचा डाव १४९ धावांपर्यंत मर्यादित ठेवला. आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या आशिष नेहराने ४ षटकांत २९ धावा देत ... Read More »