ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: November 2017

‘रेरा’चे स्वागत

केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकून गोवा रिअल इस्टेट (रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट) नियमावली राज्य सरकारने अखेर अधिसूचित केली आहे. बांधकाम व्यवसायातील अनागोंदी आणि बेफिकिरी संपुष्टात आणण्याच्या दिशेने टाकले गेलेले हे एक फार मोठे पाऊल आहे आणि त्याचे स्वागत व्हायला हवे. केंद्र सरकारने या दिशेने पहिले पाऊल संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार असताना टाकले होते. २०१३ सालीच यासंबंधीचे विधेयक लोकसभेत मांडले गेले होते. ... Read More »

हाफिज सईदची मुक्तता आणि त्यानंतर…

शैलेंद्र देवळाणकर पाकिस्तान सरकारने ठोस पुरावे न सादर केल्यामुळे तेथील न्यायालयाने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या हाङ्गिज सईद याची मुक्तता केली आहे. ही भारतासाठी चिंताजनक बाब आहे. भविष्यात हाङ्गिज सईदकडून पुन्हा एखादा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच भारताने अत्यंत सावध राहण्याची आणि त्याचबरोबर स्वयंसज्ज राहण्याची गरज आहे. मुंबईवर झालेल्या अत्यंत भीषण दहशतवादी हल्ल्याला यंदा नऊ वर्षे पूर्ण झाली. ही ... Read More »

नद्या राष्ट्रीयीकरणसंदर्भात लोकप्रतिनिधींसमोर सादरीकरण ः मुख्यमंत्री

राज्यातील नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाच्या सामंजस्य कराराचे ११ डिसेंबर २०१७ रोजी आमदार, सेवाभावी संस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसाठी सादरीकरण केले जाणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल दिली. नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचे विधेयक कॉंग्रेस सरकारच्या काळात संमत झाले होते असेही यावेळी पर्रीकर म्हणाले. कॉँग्रेसच्या कार्यकाळात प्रकल्पांना मान्यता देण्यात आलेली आहे, यासंबंधीेचे पुरावे ... Read More »

गोव्यातून परराज्यात मत्स्यविक्रीवर शुल्क लागू करणार ः मंत्री पालयेकर

गोव्यातून विक्रीसाठी परराज्यात पाठवण्यात येणार्‍या मासळीवर शुल्क लागू करण्यात येणार असल्याचे मच्छीमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. गोव्यातील मासळी मोठ्या प्रमाणात परराज्यांत नेऊन विकण्यात येत असल्याने राज्यात मासळीची उणीव निर्माण होते व पर्यायाने दर भडकतात. त्यामुळे स्थानिकांना अत्यंत महाग दरात मासळी विकत घ्यावी लागते, असे पालयेकर यांनी सांगितले. गोव्यातील जनता जो कर भरते त्या पैशातून आम्ही मच्छीमारांना ... Read More »

कॉंग्रेसची जीएसटी म्हणजे ग्रँड स्टुपिड थॉट ः पंतप्रधान

कॉंग्रेसकडून मांडल्या जाणार्‍या जीएसटीच्या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका निवडणूक प्रचार सभेवेळी खिल्ली उडवली. कॉंग्रेसची जीएसटी म्हणजे ‘ग्रँड स्टुपिड थॉट’ अशा शब्दात मोदी यांनी कॉंग्रेसची संभावना केली. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी विविध सभांमधून या विषयावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करीत असतानाच मोदी यांनी ही खिल्ली उडवली आहे. कॉंग्रेसच्या संकल्पनेतील जीएसटीची अंमलबजावणी झाली असती तर जीवनावश्यक वस्तूंवरही १८ टक्के ... Read More »

पंचायत क्षेत्रांतील शौचालयांचे लवकरच होणार सर्वेक्षण

राज्यातील पंचायत क्षेत्रातील शौचालय सर्वेक्षणाच्या कार्यात स्त्री शक्ती अभियान कार्यक्रमाअर्ंतगत स्वयं सहाय्य गटांची मदत घेतली जाणार आहे. पंचायत खात्याकडून स्वच्छता मोहीमे अंतर्गत शौचालयांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सरकारी पातळीवर २०१९ पर्यत राज्य हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणातून शौचालयांच्या एंकदर स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी – गोवा आणि इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ऍण्ड ... Read More »

धावशिरे शाळेतील ९३ विद्यार्थ्यांचा वर्गांवर बहिष्कार

धावशिरे उसगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेतील ९३ विद्यार्थ्यांनी बुधवारी दुसर्‍या दिवशी वर्गावर बहिष्कार घातला. शिक्षण खात्याला मुदत देऊनही कायमस्वरूपी शिक्षक पाठविण्यात न आल्याने पालकांत तीव्र नाराजी पसरली आहे. शाळेत पॅरा शिक्षकाऐवजी कायमस्वरूपी शिक्षक पाठविण्याची मागणी पालकांनी शिक्षण खात्याकडे केली होती. मात्र शिक्षण खात्याने याविषयाकडे गांभिर्याने न पाहता २ पॅरा शिक्षकांना शाळेत पाठविण्यास सुरू केले. गेल्या मंगळवारपासून विद्यार्थ्यांसमवेत पालकांनी वर्गावर बहिष्कार ... Read More »

ईडीसी व आयडीबीआय यांचा कर्जवसुली कारवाईबाबत निर्णय

>> आयडीबीआय वरिष्ठांशी कुंकळयेकरांची चर्चा ईडीसीचे चेअरमन सिद्धार्थ कुंकळयेकर यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष संतोष केंकरे व व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र वेर्णेकर यांनी काल आयडीबीआय बँकेच्या कार्यकारी संचालक मैथिली यांची मुंबई येथे भेट घेतली. या भेटीत ईडीसी व आयडीबीआय यांनी ज्यांना संयुक्तपणे कर्ज दिले होते व त्यापैकी जे कर्जदार कर्जाची परतफेड करीत नाहीत त्यांच्याकडून कर्ज वसूल करून घेण्यासाठी संयुक्तपणे आवश्यक ती सर्व कारवाई ... Read More »

नागरिकांनी पारंपरिक जमीन राखून ठेवावी ः मुख्यमंत्री

नागरिकांनी आपली पारंपरिक जमीन राखून ठेवली पाहिजे. जमिनीच्या विक्रीमुळे कायमस्वरूपी नुकसान होत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल केले. ऍडवेन्त्झ ग्रुपच्या जय किसान ऍपचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी चेअरमन सरोज कुमार पोद्दार, झुवारी ग्लोबल चे व्यवस्थापकीय संचालक सुरेश कृष्णन यांची उपस्थिती होती. राज्यातील बर्‍याच नागरिकांकडून जमिनीची विक्री केली जात आहे. जमीन विक्रीतून मिळालेल्या पैशातून अलिशान गाड्या ... Read More »

आदिवासी कल्याण खात्याच्या केंद्रीय योजनांचा आढावा

केंद्रीय राज्यमंत्री (आदिवासी कल्याण) सुदर्शन भगत यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या केंद्रीय योजनांचा पर्वरी येथे सचिवालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी गोव्याचे आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे, आदिवासी कल्याण खात्याचे सचिव पी. एस. रेड्डी, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक व्हेनांन्सियो फुर्तादो, गोवा राज्य अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अजित पंचवाडकर उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांची राज्यात कार्यवाही केली ... Read More »