Daily Archives: October 12, 2017

गोमेकॉचे दुखणे

गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात आणि राज्यातील अन्य जिल्हा इस्पितळांमध्ये उपचारांसाठी येणार्‍या परप्रांतीय रुग्णांना शुल्क आकारण्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केली आहे. येथे ‘परप्रांतीय’ म्हणजे ज्यांच्यापाशी गोव्यातील वास्तव्याचे ओळखपत्र नसेल ते शेजारील प्रांतांतील लोक असे त्यांना अपेक्षित आहे. परप्रांतांतून येऊन गोव्यात स्थायिक झालेल्या मंडळींना अवघ्या पाच वर्षांत दीनदयाळ आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळतो. शिवाय त्यांच्यापाशी येथील वास्तव्याचे ओळखपत्र असल्याने त्यांना ... Read More »

विश्‍वजीतविरोधातील अपात्रता याचिका न्यायालयाने फेटाळली

कॉंग्रेस पक्षाने आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्याविरुद्ध दाखल केलेली अपात्रता याचिका काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळली. या याचिकेसंबंधीचा युक्तीवाद गेल्या महिन्यात संपला होता व न्यायालयाने आपला निवाडा ११ ऑक्टोबर रोजी राखून ठेवला होता. विश्‍वजीत राणे हे सध्या भाजपचे आमदार असून मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री आहेत. मार्च महिन्यात झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत विश्‍वजीत राणे हे कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर ... Read More »

सरकारी इस्पितळांत परप्रांतियांना माफक शुल्क

परराज्यांतून गोव्यातील सरकारी इस्पितळात येणार्‍या रुग्णांना येत्या डिसेंबर महिन्यापासून उपचारासाठी शुल्क द्यावे लागणार असले तरी ते माफक असेल व अगदीच गरीब परप्रांतीय रुग्णांना पूर्वीप्रमाणे मोफत उपचार मिळतील. मात्र, सरकार सगळ्याच परप्रांतीय रुग्णांना मोफत उपचार देणे शक्य नाही. गोव्यातील सरकारी इस्पितळे ही गोव्यातील लोकांसाठी आहेत, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. आमच्या इस्पितळांवर अन्य राज्यातून येणार्‍या रुग्णांमुळे प्रचंड ... Read More »

रा. स्व. संघाच्या मातृभाषा बचाव मोहिमेचे भाभासुमंकडून स्वागत

भोपाळ येथे आज दि. १२ रोजी होणार्‍या रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय बैठकीत राष्ट्रीय स्तरावर ‘मातृभाषा बचाव’ मोहीम राबण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे वृत्त असून ते खरे असल्यास त्याचे भाभासुमं स्वागत करीत आहे असे या मंचने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यापूर्वी मार्च २०१५ साली रा. स्व. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी संस्थेने मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण व्हावे असा ठराव घेतला होता. ... Read More »

संघ नेत्यांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ भाजपतर्फे मोर्चा

केरळ राज्यात कम्युनिस्टांकडून संघाच्या नेत्यांवर हल्ले होण्याच्या ज्या घटना घडत आहेत त्याच्या निषेधार्थ १६ रोजी भाजपने पणजीत निषेध सभा व निषेध मोर्चाचे आयोजन करण्याचा निर्णय काल झालेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत झाला. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी ही माहिती दिली. तसेच ३१ रोजी वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त ‘रन फॉर युनिटी’चेही आयोजन ... Read More »

पियुष गोयल जय शहांचे सीए आहेत काय? ः सिन्हा

भ्रष्टाराचाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’च्या बाता मारणार्‍या भाजपने अमित शहापुत्र जय शहा यांच्या वादग्रस्त प्रकरणामुळे नैतिकता गमावली असल्याचे वक्तव्य करीत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी या वादात उडी घेतली आहे. जय शहांच्या कंपनीच्या भरभराटीच्या प्रकरणाचा पर्दाफाश करणारे वृत्त द वायर या डिजिटल वृत्त माध्यमाने केल्यानंतर या माध्यमावर अब्रुनुकसानीचा दावा गुदरण्याच्या कृतीवरही सिन्हा यांनी टीका केली. तसेच या वृत्तानंतर जय शहा यांची ... Read More »

इंग्लंड अंतिम सोळा संघात दाखल

इंग्लंडने अटीतटीच्या लढतीत मेक्सिकोचा ३-२ असा पराभव करत फिफा अंडर १७ फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. ‘एफ’ गटातील हा सामना विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगणावर काल बुधवारी झाला. सलामीच्या लढतीत चिलीवर ४-० असा विशाल विजय मिळविलेला दोनवेळचा अंडर १७ विश्‍वविजेता इंग्लंडचा संघ ३-० असा आघाडीवर होता. परंतु, दिएगो लायनेझ याने सात मिनिटांत दोन गोल नोंदवून रंगत निर्माण केली. पहिल्या ... Read More »

भारताची लढत आज बलाढ्य घानाशी

अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गेल्या दोन सामन्यात आकर्षक खेळ करीत तमाम देशवासियांकडून कौतुकाची थाप घेतलेल्या भारतीय संघाशी लढत आज बलाढ्य घानाशी होणार आहे. भारताचे लक्ष्य विजयासह आपली या स्पर्धेत छाप कायम ठेवणे हे असेल. तर घाना पूर्ण गुणांसह बाद फेरीतील आपले स्थान निश्‍चित करण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल. पहिल्यांदाच फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळताना भारताची आतापर्यंच्या दोन्ही सामन्यातील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. जरी ... Read More »

होंडुरासकडून न्यू कॅलेडोनियाचा धुव्वा

कार्लोस मेजिया आणि जोशुआ कॅनालेस यांनी नोंंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर गुवाहाटीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मध्य अमेरिकेच्या होंडुरासने न्यू कॅलेडोनियाचा ५-० असा धुव्वा उडवित बाद फेरीतील आपले आव्हान जिवंत राखले. कार्लोस मेजियाने २५व्या मिनिटाला होंडुरासचे खाते खोलले. जोशुआने कॅनालेसने २७व्या मिनिटाला आघाडी २-० अशी केली. ४२व्या मिनिटाला कार्लोसने स्वतःचा दुसरा व संघाला ३ -० अशा आघाडीवर नेणारा ... Read More »

भारताने जपानवर डागले पाच गोल

नवीन प्रशिक्षक शोएर्ड मरिन यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळताना भारतीय हॉकी संघाने काल बुधवारी झालेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेेच्या शुभारंभी लढतीत जपानचा ५-१ असा धुव्वा उडविला. दोनवेळच्या विजेत्या व विद्यमान उपविजेत्या भारताने नूतन प्रशिक्षक शोएर्ड मरिन यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळताना आपल्या पहिल्याच लढतीत जपानला दयामाया न दाखवता विशाल विजय साकारला. भारतीय खेळाडूंनी तब्बल २३ वेळा जपानच्या सर्कलमध्ये दाखल होत आक्रमकतेचे दर्शन घडविले. सामन्याच्या ... Read More »