Daily Archives: October 11, 2017

फटाके बंदी!

ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली एनसीआर मध्ये फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. दिवाळी हे प्रकाशपर्व मानले जात असल्याने फटाक्यांची आतषबाजी हा या उत्सवाचा परंपरेने भाग बनला असल्याने या निवाड्यासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मात्र, या बंदीची पार्श्वभूमीही समजून घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी दिल्लीमध्ये दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुराची एवढी गडद चादर पसरली की तेथील शाळांना सुटी देणे भाग ... Read More »

डिजिटल पोलीस पोर्टल आहे तरी काय?

दीपक राझदान गृह मंत्रालयाने गुन्ह्यांच्या तपासासाठी एक क्रांतिकारी योजना तयार केली आहे. त्यासाठी सरकारने डिजिटल पोलीस पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या सहाय्याने गुन्हे आणि गुन्हेगारांचा तपास करणे, त्यांचे जाळे कसे काम करते, हे शोधणे सोपे होणार आहे.. देशात गुन्ह्यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करीत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास करणे आणि गुन्हेगारांचा शोध ... Read More »

परराज्यातील रुग्णांना गोमेकॉत शुल्क लागणार

>> आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे : डिसेंबरपासून कार्यवाहीचा विचार परराज्यांतून गोव्यातील सरकारी इस्पितळात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांना येत्या डिसेंबर महिन्यापासून मोफत उपचार सेवा मिळणार नसून त्यांना शुल्क लागू करण्याचा विचार आरोग्य खात्याने केला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यानी काल दिली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात कारवारपासून सिंधुदुर्गपर्यंतचे रुग्ण उपचारासाठी येत असतात. परिणामी गोमेकॉवर प्रचंड ताण पडतो. गोमेकॉबरोबरच दोन्ही जिल्हा इस्पितळातही परराज्यातून ... Read More »

‘सागर डिस्कोर्स’ २०१७ आंतरराष्ट्रीय परिषदेस गोव्यात उद्यापासून प्रारंभ

>> २१ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग ‘सागर’ डिस्कोर्स २०१७ या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान गोव्यात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डी. बी. शेकटकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. या परिषदेत २१ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला सागर म्हणजेच समुद्र यावर या परिषदेचा खास भर असणार आहे, अशी माहिती शेकटकर ... Read More »

किटलमध्येच डिफेन्स एक्स्पो

>> सरकारची संरक्षणमंत्रालयास तत्वत: मान्यता केपें तालुक्यातील किटल येथे ‘डिफेन्स एक्स्पो’चे २०१८ साली आयोजन करण्यासाठी गोवा सरकारने संरक्षण मंत्रालयाला तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. २०१६ साली किटल येथे डिफेन्स एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. मनोहर पर्रीकर हे संरक्षण मंत्री असताना किटल येथे या डिफेन्स एक्स्पोचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी किटल येथील जमीन डिफेन्स एक्स्पोसाठी देण्यास तीव्र ... Read More »

महान दुचाकीस्वारा तुला नमस्कार!

हेल्मेट न घालणार्‍या दुचाकीस्वारांना तालांव देण्यासाठी रस्त्याकडेला टपून असलेले पोलीस आपण गोव्यात पाहतो. मात्र या छायाचित्रातील पोलिसदादा आहेत आंध्र प्रदेशमधील अनंतपुर जिल्ह्यातील सर्कल इन्स्पेक्टर शुभकुमार. बायको-मुलांसह पाच जणांना मोटरसायकलवरून आणि तेही हेल्मेट न घालता घेऊन जाणार्‍या या दुचाकीस्वाराच्या साहसाला पोलिसांने नकळत हात जोडून नमस्कार करीत असे न करण्याची विनवणी केली. Read More »

मांडवीतील कॅसिनोंना पाच वर्षात अकरा वेळा मुदतवाढ : कॉंग्रेस

मांडवी नदीतील तरंगत्या कॅसिनोंना तेथून अन्य ठिकाणी जाण्यासाठी भाजप सरकारने गेल्या साडेपाच वर्षांत तब्बल अकरावेळा मुदतवाढ दिलेली असून ही लोकांची फसवणूक आहे. त्यामुळे निदान आता तरी सरकारने ह्या तरंगत्या कॅसिनोंना मांडवीतून अन्यत्र जाण्यासाठी अंतिम मुदत कधीपर्यंत दिली आहे हे स्पष्ट करावे, अशी मागणी काल अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सचिव गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. तरंगत्या कॅसिनोंना मांडवी नदीतून हलवण्यात ... Read More »

भाजपने बोलणारा पंतप्रधान दिला

>> अमित शहांचे राहुल गांधींना उत्तर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी देशाला भाजपने काय दिले असा प्रश्‍न वारंवार करत असल्याच्या टीकेला भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी काल राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यात उत्तर देताना भाजपने देशाला बोलणारा पंतप्रधान दिला असल्याचे उद्गार काढले. शहा यांचा रोख तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर होता. डॉ. सिंग जास्त बोलत नसल्याबद्दल विरोधकांकडून टिकेचे लक्ष्य ठरत असत. गांधी कुटुंबाच्या ... Read More »

आता जय शहांना राजनाथांचाही पाठिंबा

द वायर या डिजिटल वृत्त माध्यमाने भाजपाध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या कंपनीविषयी संशय निर्माण करणारे वृत्त प्रसिध्द केल्यानंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या पाठोपाठ आता केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही जय शहा यांचे समर्थन केले आहे. या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा त्यांनी काल एका कार्यक्रमावेळी केला. याप्रकरणाचे तपासकाम करण्याचीही गरज नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या ... Read More »

इराणसमोर जर्मनीने टाकली नांगी

पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेतील ‘सी’ गटातील सामन्यात इराणने झंझावाती खेळाचे दर्शन घडवताना जर्मनीवर ४-० असा दारुण पराभव लादला. इराणने या बहारदार विजयासह स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. जर्मनीच्या संघाला संपूर्ण सामन्यादरम्यान सूर गवसला नाही. तर इराणने पोषक वातावरणात खेळताना जर्मनीच्या दर्जाला किंमत न देता केवळ आक्रमणावर लक्ष केंद्रित करत गोलांची बरसात केली. सामन्याच्या ... Read More »