Daily Archives: October 10, 2017

संन्याशाला सुळी?

हरमल येथे छापा मारायला गेलेल्या अमलीपदार्थविरोधी विभागाच्या अधिकार्‍यांवर झालेला हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहिल्या, तर गोव्यात अमली पदार्थांविरुद्ध कारवाई करणे किती कठीण आहे आणि त्यात कसकसे हितसंबंध गुंतलेले असू शकतात याचे विदारक दर्शन घडते. जेथे छापा टाकला गेला, तेथे खरोखरच अमली पदार्थ व्यवहार होत होता की नाही हा वेगळा भाग, परंतु या घटनेनंतर राजकीय पातळीवर झालेल्या हालचाली, स्थानिक राजकारण्याकडून त्वरेने ... Read More »

दिल्लीत फटाके विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी

सर्वोच्च न्यायालयाने काल एका निवाड्याद्वारे येत्या दिवाळीत दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवरील बंदी कायम केली. यासंबंधी ११ नोव्हेंबर २०१६मध्ये घाऊक व किरकोळ फटाके विक्री परवान्यांवरील निलंबनाचा आदेश देण्यात आला होता. तो आदेश काल न्यायमूर्ती ए. के. सिक्री यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय खंडपीठाने उचलून धरीत दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी जाहीर केली. या बंदीचा कालावधी १ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. या व्यवसायातील सर्व संबंधितांना या ... Read More »

अमित शहा यांनी राजीनामा द्यावा : कॉंग्रेस

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांचा एका प्रकरणी प्रसारमाध्यमांसमोर येऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बचाव केल्याने गोयल हे केंद्रीय मंत्री आहेत की जय शहांचे प्रवक्ते असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केला. तसेच या प्रकरणी अमित शहा यांनी भाजपाध्यक्षपदाचा राजिनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्यावर झालेल्या ... Read More »

गुजरात राज्य विधानसभेसाठी निवडणूक नजीक असल्याने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये रॅली, सभा, कार्यकर्त्यांच्या भेटी असा जोर लावला आहे. गुजरात दौर्‍यात काल त्यांनी एका कुटुंबासमवेत काही वेळ घालवला त्यावेळी. Read More »

हल्लेखोरांनी पोलिसाचे पिस्तुल पळवले होते ?

>> गुन्ह्याचे गांभीर्य उमगताच परत हरमल-पेडणे येथे छापा टाकण्यासाठी गेलेल्या अमली पदार्थ विरोधी पथकावर हल्ला करणार्‍यांनी पथकातील एका पोलीस अधिकार्‍याचे रिव्हॉल्वर हिसकावून घेऊन पळ काढला होता व नंतर पोलिसांचे रिव्हॉल्वर हरवले होते व ते आम्हाला सापडले होते असे सांगून पेडणे पोलिसांकडे ते जमा करण्यात आल्याची खळबळजनक माहिती हरमल येथील सूत्रांनी दिली. पेडणे पोलिसांचे या भागातील अमली पदार्थ व्यवहारात साटेलोटे आहेत ... Read More »

प्रदेश कॉंग्रेसाध्यक्ष निवडीचे अधिकार अ. भा. अध्यक्षांना

>> प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे ठराव संमत नव्यानेच निवडण्यात आलेल्या गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या काल झालेल्या पहिल्या बैठकीत गोवा प्रदेश अध्यक्ष व अखिल भारतीय कॉंग्रेस समिती सदस्य यांची नियुक्ती करण्याचे अधिकार अ. भा. कॉंग्रेस अध्यक्षांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला. सहाय्यक निर्वाचन अधिकारी पंकज पुनिया यांनी सदर ठराव मांडला. तर त्याला आमदार रवी नाईक यानी अनुमोदन दिले. कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून राहूल ... Read More »

बारामुल्लात ‘जैश’च्या कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये काल भारतीय सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांदरम्यान उडालेल्या चकमकीत जैश ए महंमद या संघटनेचा कमांडर अबू खालिद ठार झाला. बीएसएफच्या कॅम्पवरील अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो सूत्रधार असल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी वरील वृत्ताला दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांनी गेल्या ३ ऑक्टोबर रोजी श्रीनगर विमानतळानजीकच्या बीएसएफच्या तळावर हल्ला केला होता. ... Read More »

कोलंबियाने सामना तर भारताने मने जिंकली

जुआन पेनालोसाने नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर कोलंबियाने भारताचा २-१ असा पराभव करीत फिफा अंडर-१७ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत शानदार विजयासह बाद फेरीसाठीचे आपले आव्हान जिवंत राखले. सलग दुसर्‍या पराभवामुळे भारतीय संघाचे आव्हान स्पर्धेतून संपुष्टात आले आहे. असे असले तरी या सामन्यात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय स्तराचा खेळ करीत तमाम भारतवासिकयांची मने मात्र निश्‍चितच जिंकली. पहिल्या सामन्यात युवा भारताला अमेरिकेकडून ३ -० असे ... Read More »

मालीची तुर्कीवर मात

दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारलेल्या माली संघाने काल सोमवारी झालेल्या फिफा अंडर -१७ विश्‍वचषक स्पर्धेतील सामन्यात तुर्कीचा ३-० असा पराभव केला. दोनवेळा आफ्रिकन अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेल्या मालीने गोल नोंदविण्याचे २९ प्रयत्न केले. माली संघातील खेळाडूंच्या वेगवान खेळाला उत्तर देण्यात तुर्कीचा संघ खूप कमी पडला. पहिल्या सामन्यातील निसटत्या पराभवानंतर मालीने ‘ब’ गटातील आपल्या दुसर्‍या सामन्यात उत्कृष्ट खेळाचे दर्शन ... Read More »

मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी-२० मालिकेतील दुसरी लढत बारसापारा स्टेडियमवर खेळविण्यात येणार असून टीम इंडिया मालिका विजयाच्या इराद्यानेच मैदानावर उतरणार आहे. बारसापारा मैदानावरही हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. ऑस्ट्रेलियन संघ बरोबरी साधण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल. टी-२० मालिकेतील रांचीत पावसाच्या व्यत्ययात झालेला सामना ९ गड्यांनी जिंकत भारतीय संघाने १-० आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमविल्यास टीम इंडियाला मालिका ... Read More »