Daily Archives: October 9, 2017

आता तरी गृह खात्याने जागे व्हावे : पालयेकर

>> ड्रग माफियांचा पोलिसांवर हल्ला प्रकरण ड्रग माफियांकडून पोलिसांवर हल्ला करण्याची जी घटना घडली त्या पार्श्‍वभूमीवर आता गृह खात्याने ह्या ड्रग माफियांचे कंबरडे मोडण्याचे काम हाती घेण्याची गरज आहे, असे गेल्या महिनाभरापासून ह्या ड्रग माफियांविरुध्द आवाज उठवणारे मच्छिमारी मंत्री विनोद पालयेकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आता वेळ न दवडता या लोकांवर कारवाई करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ... Read More »

जरासा दिलासा

वस्तू आणि सेवा कर कायद्याच्या म्हणजे जीएसटीच्या अंमलबजावणीस तीन महिने झाले असताना जीएसटी कौन्सिलने छोटे व्यापारी, उद्योजक, तसेच निर्यातदारांना दिलासा देणारे काही महत्त्वपूर्ण निर्णय नुकतेच घेतले. कोणतीही नवी व्यवस्था ही परिपूर्ण नसते. त्यामध्ये त्रुटी राहू शकतात, बदल आवश्यक असू शकतात. त्यामुळे जीएसटीसंदर्भात तीन महिन्यांनंतर फेरआढावा घेण्याचे सरकारचे पाऊल हे त्याप्रती संवेदनशीलतेचे लक्षण म्हणावे लागेल. दुसरे कारण या फेरबदलांना आहे ते ... Read More »

गुजरातमधील वाडनगर या जन्मगावी पंतप्रधान बनल्यावर नरेंद्र मोदी यांनी काल प्रथमच भेट दिली. त्यावेळी त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. त्यावेळी त्यांना हात उंचावून अभिवादन करताना मोदी. Read More »

अमित शहा यांच्या पुत्राच्या कंपनीची चौकशी व्हावी : कॉंग्रेस

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या टेंपल एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १६ हजार पटींनी आपल्या नफ्यात अविश्‍वसनीय अशी वाढ केल्याने या कंपनीच्या या ‘नेत्रदीपक’ विकासप्रकरणी जय शहा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकशी करावी अशी मागणी काल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल तसेच आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनी वेगवेगळ्या पत्रकार ... Read More »

चिलीला इंग्लंड तिखट

फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेतील रविवारी झालेल्या ‘एफ’ गटातील सामन्यात इंग्लंडने चिलीला ४-० असे पराजित केले. खेळाच्या प्रत्येक विभागात इंग्लंडने सरस खेळ दाखवून ‘चिली’ झोंबणार नाही याची दक्षता घेतली. जेडन सांचो याच्या वेगवान खेळाला चिलीच्या संघाला चोख प्रत्युत्तर देणे शक्य झाले नाही. दक्षिण अमेरिकेन स्पर्धा विजेत्या चिलीच्या संघाला आपल्या युरोपियन प्रतिस्पर्ध्यासमोर नैसर्गिक खेळ करता आला नाही. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला जेडन ... Read More »

फ्रान्ससमोर न्यू कॅलेडोनिया फिका

बलाढ्य फ्रान्सने अंडर १७ फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेला झोकात प्रारंभ करताना विश्‍वचषकातील पदार्पणवीर न्यू कॅलेडोनियावर ७-१ असा दारुण पराभव लादला. पहिल्या सत्रात गोलांचा पाऊस पाडताना फ्रान्सने ६ गोल लगावले. इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर झालेल्या या सामन्याची सुरुवात धक्कादायक झाली. फ्रान्सच्या खेळाडूचा फटका बाहेर ढकलण्याच्या प्रयत्नात न्यू कॅलेडोनियाच्या बर्नार्ड इवा याच्या स्वयंगोलामुळे पाचव्या मिनिटाला फ्रान्सने १-० अशी आघाडी घेतली. अमीन ... Read More »

होंडुरासचा फडशा

फिफा अंडर १७ ‘ई’ गटातील काल रविवारी झालेल्या लढतीत जपानने होंडुरासचा ६-१ असा फडशा पाडला. जपानच्या केटो नाकामुरा याने हॅट्‌ट्रिक नोंदविली. तांत्रिक तसेच कौशल्याच्या बाबतीत असलेला उजवेपणा जपानने काल दाखवून दिला. २२व्या मिनिटाला पहिला गोल अप्रतिम हेडरद्वारे नोंदविल्यानंतर ३०व्या मिनिटाला नाकामुराने आपला दुसरा गोल केला. ३६व्या मिनिटाला पॅट्रिक पेलासियोस याने पिछाडी कमी करणारा गोेल लगावला. मध्यंतराला दोन मिनिटे असताना नाकामुराने ... Read More »

छत्तीसगडचे वर्चस्व

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘ड’ गटातील गोवा व छत्तीसगड यांच्यात पर्वरी येथे सुरू असलेला सामन्यात छत्तीसगडला पहिल्या डावात आघाडी घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. छत्तीसगडच्या पहिल्या डावातील ४५८ धावांच्या प्रत्युत्तरादाखल खेळताना गोव्याने तिसर्‍या दिवसअखेर ४ बाद २२३ धावा केल्या आहेत. सुमिरन आमोणकर (७९) याने स्वप्निल अस्नोडकर (२०) याच्यासह ७३ धावांची सलामी दिली. स्वप्निल बाद झाल्यानंतर सुमिरनने कर्णधार सगुण कामत (४७) ... Read More »

देशाच्या अर्थव्यवस्थेप्रती शल्याची वृत्ती का?

नरेंद्र मोदी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाच्या सुवर्णमहोत्सव सोहळ्यातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकारच्या आर्थिक कामगिरीवरील टीका खोडून काढली. त्या महत्त्वपूर्ण भाषणाचा हा संपादित भाग बंधू-भगिनींनो, चाण्यकाने सांगितले आहे, एकेन शुष्क वृक्षेण, दह्य मानेन वह्नि ना| दह्यते तत वनम् सर्वम् कुपुत्रेण कुलम यथा॥ म्हणजे संपूर्ण वनात जरी एका सुकलेल्या झाडाला आग लागली तरी संपूर्ण वन जाळून खाक ... Read More »

 नियोजन सुटीचे!                                                         

 – प्रा. रामदास केळकर सुट्टी म्हणजे धमाल, मज्जा असली तरी लवकर उठण्यावर भर द्यावा आणि व्यायामाची सवय लावून घ्यावी. सूर्यनमस्कार घालण्याची सवय मुद्दाम लावून घ्यावी. एक म्हणजे ह्याला काही पैसे पडत नाहीत, शिवाय घरच्याघरी तुम्ही हे करू शकता. लहानपणी शरीर लवचीक असले तर ही लवचिकता आयुष्यभर टिकण्यासाठी व्यायामाची सवय आवश्यक असते. ह्या जगात आपण सर्वजण एका बाबतीत भाग्यवान आहोत ती ... Read More »