Daily Archives: October 6, 2017

एकाचवेळी निवडणुका

लोकसभेच्या आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या कल्पनेला आपली तयारी दर्शवीत, सप्टेंबर २०१८ पर्यंत निवडणूक आयोग त्याला सज्ज असेल, फक्त निर्णय सरकारने घ्यायचा आहे असे सांगत निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी चेंडू सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. लोकसभा तसेच विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याची कल्पना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेतच्या नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली होती. खरे तर त्याही आधी ... Read More »

अखेर ‘लकी सेव्हन’ बाहेर काढण्यात यश

>> ८० दिवसांनी यश >> जहाज वेरे-बेती येथे हलविले >> जयगड रत्नागिरी येथे दुरूस्तीसाठी नेणार मिरामार किनार्‍यावर रूतलेले एम. व्ही. लकी सेव्हन कॅसिनो जहाज अखेर काल गुरूवारी ८० दिवसांनी बाहेर काढण्यात यश प्राप्त झाले आहे. हे रूतलेले कॅसिनो जहाज गुरूवारी सकाळी बाहेर काढून मांडवी नदीच्या पात्रात वेरे – बेती येथे उभे करून ठेवण्यात आले आहे. मांडवी नदीच्या पात्रात या कॅसिनो ... Read More »

खनिज वाहतूक दराचा निर्णय मुख्यमंत्र्यांवर

>> केपेत खाण व्यावसायिक, आमदार बैठक खनिज वाहतुकीचे दर ठरवण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेच घेतील असा निर्णय केपे येथील उपजिल्हाधिकारी कचेरीत आयोजित करण्यात आलेल्या ट्रक मालक, खनिज व्यावसायिक व सरकारी अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर, केपेचे जिल्हाधिकारी प्रशांत शिरोडकर, आग्नेल फर्नांडिस, मामलेदार प्रताप गावकर, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र राऊत देसाई, निरीक्षक रवींद्र देसाई, सुदेश नाईक, ट्रक ... Read More »

सिकेरी ते बागा रस्त्यावरील ३०० अतिक्रमणे हटवणार

>> वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आस्थापनांना नोटिसा उत्तर गोवा नगर नियोजन प्राधिकरणाने (एनजीपीडीए) सिकेरी ते बागा या किनारी भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी या मुख्य रस्त्याच्या रूंदीकरण क्षेत्रात येणार्‍या हॉटेल व अन्य आस्थापनने मिळून सुमारे ३०० जणांना अतिक्रमण हटविण्याची नोटीस बजावली आहे. या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. या रस्त्याचे रूंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ता रूंदीकरणाबरोबरच सुशोभिकरण आणि पार्कींग व्यवस्था ... Read More »

दिल्लीत जीएसटीच्या बैठकीत मांडणार व्यावसायिकांच्या समस्या ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटीमुळे राज्यातील व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी राज्यातील व्यावसायिकांकडून जीएसटीबाबतच्या समस्या जाणून घेतल्या आहे. ६ ऑक्टोबरला दिल्ली येथे होणार्‍या जीएसटी मंडळाच्या बैठकीत राज्यातील व्यावसायिकांना भेडसावणार्‍या अडचणी मांडण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बैठकीत दिली. जीएसटीबाबतच्या सर्व समस्या डिसेंबरपर्यत दूर करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिली. ... Read More »

सरदेसाई विरोधातील तक्रार नोंद न केल्याने पोलिसांना नोटीस

>> आयरिश रॉड्रिगीस यांची याचिका नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याविरुद्ध फातोर्डा पोलीस स्थानकावर तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याची याचिका ऍड. आयरिश रॉड्रीगीस यांनी दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली. त्यावेळी त्वरित न्यायालयाने दक्षिण गोव्याचे पोलीस अधिक्षक अरविंद गावस व फातोर्डाचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांना नोटीस पाठविली असून, त्यांना आपले म्हणणे न्यायालयात मांडण्याचा आदेश दिला आहे. ऍड. ... Read More »

दाबोळीतील चार्टर विमानांचे वेळेचे बंधन नौदलातर्फे मागे

दाबोळी विमानतळावर चार्टर विमानांना नौदलाने घातलेले वेळेचे बंधन अखेर नौदलातर्फे मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे चार्टर विमानांची वेळेसंदर्भातील अडचण दूर झाली आहे. राज्य सरकारला नौदलाचे मन वळवण्यात यश मिळाले आहे. या पर्यटन हंगामात विमानतळावर उतरणार्‍या विदेशी चार्टर विमानांना उतरण्यासाठी वेळ देण्यात आला नसल्याने सदर विमान कंपन्यांना बराच त्रास सहन करावा लागणार होता. त्यामुळे यंदा चार्टर विमानांच्या संख्येत निम्मी घट होण्याचाही ... Read More »

द. आफ्रिका-बांगलादेश दुसरी कसोटी आजपासून

दक्षिण आफ्रिकेकडून पहिल्या कसोटीत डावाने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बांगलादेशचा संघ आजपासून सुरू होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यात सुधारित कामगिरीसाठी प्रयत्न करणार आहे. स्फोटक सलामीवीर तमिम इक्बालच्या अनुपस्थितीत कमकुवत बनलेल्या बांगलादेशचा संघ हा सामना अनिर्णीत राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल तर यजमान संघाने पाहुण्यांवर पुन्हा एक दारुण पराभव लादण्यासाठी आपले सर्वस्व झोकून देण्याची तयारी केली आहे. डेल स्टेन, व्हर्नोन फिलेंडर व मॉर्नी मॉर्कल ... Read More »

लसिथ मलिंगाला डच्चू, अँजेलो मॅथ्यूज जायबंदी

पाकिस्तानविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याला वगळले आहे. १३ रोजी दुबईतील सामन्याद्वारे या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दुखापतीमुळे अँजेलो मॅथ्यूज या मालिकेला मुकणार आहे. ‘२०१९’ विश्‍वचषक स्पर्धा नजरेसमोर ठेवून संघबांधणी करण्याच्या उद्देशाने मलिंगाला बाहेर ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. जून महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केल्यानंतर मलिंगाने १३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ६ सप्टेंबर ... Read More »

बुद्धिबळात पार्थ कामतला प्रथम क्रमांक

‘जीव्हीएम’च्या सावईवेरे येथील पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील मुलामुलींसाठी फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेने (पीटीसीए) आयोजित केलेली बुद्धिबळ स्पर्धा पार्थ कामत याने जिंकली. या स्पर्धेत एकूण २६ विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचे मुख्य लवाद म्हणून आनंद कुर्टीकर यांनी काम पाहिले. ध्रुव जगताप, रोहित भारद्वाज, सौरीश हळदणकर व उद्धव मडगावकर यांनी अनुक्रमे दुसरा ते पाचवा क्रमांक मिळविला. ‘पीटीसीए’चे अध्यक्ष अमोघ नमशीकर, सचिव ... Read More »