Daily Archives: October 4, 2017

पेरले ते उगवले

आजवर जगाची मनोरंजन राजधानी गणल्या गेलेल्या कॅसिनो नगरी लास वेगासमधील भयावह मृत्युकांडाने जग हादरले आहे. संगीताच्या तालावर थिरकणार्‍या हजारोंच्या गर्दीवर जवळच्या मंडाले बे रिसॉर्टच्या बत्तिसाव्या मजल्यावरून एक माथेफिरू अखंड अंदाधुंद गोळीबार करतो आणि धर्म, जात, वंश असे कुठलेही भेद मनात नसलेल्या आणि केवळ चार घटका मनोरंजनासाठी आलेल्या निष्पापांचे बळी घेतो ही क्रौर्याची परिसीमा आहे. हा हल्ला जगातील सर्वाधिक सुरक्षित आणि ... Read More »

विर्डी धरणाला महाराष्ट्राची मान्यता

>> १४६ कोटींचा निधी मंजूर >> गोव्याच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष गोवा – महाराष्ट्र सीमेवर दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथील रखडलेल्या धरण प्रकल्पासाठी काल महाराष्ट्र सरकारने १४६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. गोव्याच्या तक्रारीनंतर जल लवादाने काम बंदचा आदेश दिलेला असताना महाराष्ट्र मंत्रिमंडळाने निधी मंजूर केल्याने गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या धरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या निर्णयाने गोव्यात ... Read More »

कोमुनिदादींची बेशिस्त खपवून घेणार नाही

>> महसूलमंत्री रोहन खंवटे यांचा इशारा राज्यातील अर्ध्या कोमुनिदादीमध्ये निवडणुकीद्वारे कार्यकारी मंडळे निवडण्यात आलेली नाहीत. ज्या कोमुनिदादीमध्ये कार्यकारी समितीची निवड करण्यात आलेली नाही त्यांना त्वरित कार्यकारी समितीची निवड करण्याची सूचना करण्यात आली आहे. अन्यथा सरकारकडून कोमुनिदाद समित्यांवर सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे, असा इशारा महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात कोमुनिदाद जमीन बेकायदा पद्धतीने विक्रीची अनेक प्रकरणे ... Read More »

विजय मल्ल्याला अटक व सुटका

भारतात बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला काल लंडनमध्ये अटक करण्यात आली. मात्र, न्यायालयात हजर केले असता त्याची त्वरित जामिनावर सुटका करण्यात आली. ब्रिटिश पोलिसांनी ही कारवाई केली. किंगफिशर उद्योग समूहाचे मालक विजय मल्ल्यावर देशातील विविध बँकांचे सुमारे ९ हजार कोटी रुपयांची कर्जे बुडवल्याचा आरोप आहे. मल्ल्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने ... Read More »

मुख्यमंत्री पर्रीकर आज जाणून घेणार जीएसटीसंदर्भात व्यापार्‍यांच्या तक्रारी

व्यावसायिक आणि कर खात्यातर्फे बुधवार दि. ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मिनेझिस ब्रागांझा सभागृहात (आयएमबी) जीएसटी तक्रारीच्या संदर्भात व्यापारी व विक्रेत्यांसाठी खास सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित राहून तक्रारी जाणून घेणार आहेत. जीएसटी अंमलबजावणी दरम्यान निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने जुलै २०१७ मध्ये जीएसटी करप्रणाली लागू ... Read More »

मुख्यमंत्री पर्रीकर यांचे खातेप्रमुखांना आदेश

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व खाते प्रमुखांची बैठक काल घेतली. सरकारी कामकाजात सुसूत्रता आणण्यावर भर देण्याची सूचना खाते प्रमुखांना त्यांनी केली. नागरिकांची कामे वेळेवर हातावेगळी करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्‍यांना दिले. वेळेवर सेवा न देणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. खात्यांनी नवीन वाहनांची खरेदी न करण्याचे आदेश त्यांनी दिले. Read More »

पणजी स्थानकावरील आरटीओ कार्यालय जुन्या पाटो पुलाजवळील इमारतीत हलवणार

आग दुर्घटनेमुळे येथील कदंब बसस्थानकावरील वाहतूक खात्याचे नोंदणी कार्यालय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जुन्या पाटो पुलाजवळील इमारतीमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात येणार आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी गुरुवारपासून कार्यालयातील कामकाज सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती वाहतूक खात्याच्या सूत्रांनी दिली. येथील कदंब बसस्थानकावरील सुपर मार्केट आणि वाहतूक खात्याच्या कार्यालयाला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीमुळे ठप्प झालेला दुकान व्यावसायिकांचा व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर ... Read More »

एल्गार १२व्या तर आमला सातव्या स्थानी

दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज हाशिम आमला व डीन एल्गार यांनी आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या पोचेफस्ट्रूम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील भरीव कामगिरीच्या जोरावर या द्वयीने सकारात्मक दिशेने वाटचाल कायम राखली. पहिल्या डावात १३७ व दुसर्‍या डावात २८ धावा करत आमलाने एका क्रमाने वर सरकताना सातवे तर डावखुरा सलामीवीर एल्गारने (१९९ व १८ धावा) चार स्थानांची सुधारणा करत ... Read More »

पूर्णय रायकर ठरला ‘लोहपुरुष २०१७’

गोवा वेटलिफ्टिंग असोसिएशनने गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने जुने गोवे येथे १ ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या नवव्या गोवा राज्य भारोत्तोलन स्पर्धेत पूर्णय रायकर ‘लोहपुरुष २०१७’ पुरस्काराचा मानकरी ठरला. साग कांपालने सांघिक विजेतेपद तर साग म्हापसाने उपविजेतेपद प्राप्त केले. समाजकल्याण मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यांच्याच हस्ते बक्षिसांचे वितरणही करण्यात आले. निकाल ः ५६ किलो ः १. रवींद्र डायस ... Read More »

अंडर-१९ गोवा संघाच्या कर्णधारपदी हेरंब परब

आलुर-बंगळुरू येथे ७ ते १४ ऑक्टोबरपर्यंत होणार्‍या १९ वर्षांखालील विनू मांकड वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी युवा द्रुतगती गोलंदाज हेरंब परब याची गोव्याच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. गोवा क्रिकेट संघटनेने काल १५ सदस्यीय युवा संघाची घोषणा केली. घोषित संघ पुढीलप्रमाणे ः आलम खान, मंथन खुटकर, राहुल मेहता, तनिश सावकर, दिगेश रायकर, उमंग गोसावी, हेरंब परब (कर्णधार), आदित्य सूर्यवंशी (यष्टिरक्षक), ऋत्विक नाईक, ... Read More »