Daily Archives: October 3, 2017

गोव्याचा हनु

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांच्या निधनाची वार्ता ज्येष्ठ गोमंतकीय समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांना कळवली तेव्हा ‘काय पडझड चाललीय, नाही?’ असे सहजोद्गार त्यांच्या मुखी आले. खरोखरच ही पडझड विषण्ण करणारी आहे. एकामागून एक उत्तुंग माणसे डोळ्यांआड चालली आहेत आणि त्यांची जागा घेणार्‍यांची वानवाच दिसते आहे. हमोंचे आणि गोव्याचे तर पिढीजात नाते. त्यांचा जन्म भले दोडामार्ग जवळच्या झोळंब्यात ... Read More »

पणजी बसस्थानकावर अग्नितांडव

>> आरटीओ व कदंब कार्यालये, सुपरमार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी >> कोट्यवधींचे नुकसान पणजी कदंब बसस्थानक इमारतीत काल पहाटे ५.३०च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मात्र, जेव्हा ही भीषण आग भडकली तेव्हा इमारतीत लोक नसल्याने जीवितहानी टळली. ह्या आगीत जळून खाक झालेली मालमत्ता नेमकी किती रु.ची आहे हे अद्याप कळू शकलेली नसले तरी ती कोटींच्या घरात असल्याचे अग्नीशामक ... Read More »

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन

प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे काल पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. दीनानाथ मंगेशकर इस्पितळामध्ये उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. दोन वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले ‘दोन स्पेशल’ हे प्रेक्षक – समीक्षकांची दान मिळवलेले नाटक हमोंच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर आधारित आहे. कोकणातील दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावात एका गरीब कुटुंबात जन्मलेले ‘हमो’ १९७० च्या सुमारास ‘निष्पर्ण ... Read More »

अपघात रोखण्यासाठी पालकांचे मुलांकडे लक्ष हवे : वाहतूकमंत्री

पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवले व त्यांना रात्री-अपरात्री पार्ट्या व क्लबमध्ये जाण्यापासून रोखले तर आसगाव येथे ज्या प्रकारचा अपघात घडून दोन युवक मृत्युमुखी पडण्याची जी दुर्घटना घडली तशा दुर्घटना होणार नाहीत, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. रात्री उशिरापर्यंत पार्ट्या करणारे युवक व युवती दारूचे सेवन करून नशेत वेगाने वाहने हाकतात. परिणामी अपघातात सापडून आपले जीव गमावू ... Read More »

ट्रकच्या धडकेने फोंड्यात दुचाकीस्वार जागीच ठार

कुर्टी येथील आमीगोस हॉटेल समोरील जंक्शनवर रविवारी रात्री ८.१५ वा. सुमारास मालवाहू ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात देवेंद्र प्रितम पार्सेकर (२५, सीमेपायण-म्हार्दोळ) या युवकाचा मृत्यू झाला. तर त्याची आई प्रतिमा पार्सेकर (४५) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए ०५-एच-०९४७ क्रमांकाच्या दुचाकीने देवेंद्र व त्याची आई कुर्टीहून बेतोडा बगल रस्त्याच्या दिशेने जात होती. ... Read More »

श्रीलंकेचा नाट्यमय विजय

>> हेराथ, दिलरुवानच्या मार्‍यासमोर पाकिस्तानची शरणागती रंगना हेराथच्या दुसर्‍या डावातील ४३ धावांतील ६ बळींच्या जोरावर श्रीलंकेने नाट्यमय कलाटणी मिळालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा २१ धावांनी पराभव केला. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या १३६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ११४ धावांत संपला. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्राअखेरपर्यंत विजय दृष्टिपथात असताना पाकिस्तानला हेराथच्या फिरकीने पराभवाचा डोस पाजला. चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेचा संघ दुसर्‍या डावात ४ बाद ... Read More »

आनंद संयुक्त द्वितीय

भारतीय ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद याने आईल ऑफ मॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त दुसरे स्थान मिळविले. नॉर्वेच्या विश्‍वविजेत्या मॅग्नस कार्लसनने नवव्या व अखेरच्या फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याला नमवून ७.५ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. जेतेपदासह कार्लसनने ५०,००० पौंड्‌सची कमाई केली. आनंदनने नवव्या फेरीत चीनचा ग्रँडमास्टर होऊ यिफान याच्यावर ५३ चालींत विजय मिळवून आपली गुणसंख्या ७ केली. अखेरच्या फेरीतील बरोबरीमुळे नाकामुराला द्वितीय ... Read More »

रोहितची पाचव्या स्थानी झेप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा याने पाचवे स्थान मिळविले आहे. पाच सामन्यांत ३६च्या सरासरीने केवळ १८० धावा जमवूनही विराटने आपले पहिले स्थान राखले आहे. कांगारुंविरुद्धच्या मालिकेत सर्वादिक २९६ धावा जमवलेल्या रोहितचे चार स्थानांची झेप घेतली. रोहितच्या खात्यात आता कारकिर्दीतील सर्वाधिक ७९० रेटिंग गुण जमा आहेत. रोहितव्यतिरिक्त भारताचा दुसरा सलामीवीर अजिंक्य रहाणेने चार ... Read More »

बांगलादेशचा ३३३ धावांनी पराभव

कगिसो रबाडा व केशव महाराज यांच्या तिखट मार्‍याच्या जोरावर द. आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर ३३३ धावांनी विजय मिळविला. विजयासाठी ४२४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव केवळ ९० धावांत आटोपला. बांगलादेशतर्फे दुसर्‍या डावात ईमरूल काईसने सर्वाधिक ३२ धावा केल्या. यजमानांकडून केशव महाराजने २५ धावांत ४, कगिसो रबाडाने ३३ धावांत ३ व मॉर्नी मॉर्कलने २ गडी बाद केले. सामन्याच्या चौथ्या ... Read More »

अ. भा. उपकनिष्ठ बॅडमिंटन रँकिंग स्पर्धा मडगावात

गोवा बॅडमिंटन संघटनेतर्फे मडगाव शटलर्स क्लब आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने पहिल्यांदाच गोव्यात अखिल भारत उपकनिष्ठ रँकिंग बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते १५ ऑक्टोबरपर्यंत मडगाव येथे ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. स्पर्धा १३ व १५ वर्षांखालील वयोगटातील मुला-मुलींच्या एकेरी व दुहेरीत विभागात खेळविण्यात येणार आहे. पात्रता फेरीचे सामने दि. ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत फातोर्डा, केपे येथील मल्टिपर्पज ... Read More »