Daily Archives: October 2, 2017

राणे यांचा व्हाया एनडीए भाजपाप्रवेश?

ल. त्र्यं. जोशी (ज्येष्ठ पत्रकार, नागपूर) महाराष्ट्रातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या भावी वाटचालीबाबतच्या ताज्या बातम्या लक्षात घेतल्या तर त्यांचा व्हाया एनडीए भाजपाप्रवेश आता निश्चित झालेला दिसतो. कारण त्याला अनुरूप अशा घटना २५ सप्टेंबर रोजी दिल्लीत व त्यानंतर महाराष्ट्रात घडल्या आहेत. म हाराष्ट्रातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या भावी वाटचालीबाबतच्या ताज्या बातम्या लक्षात घेतल्या तर त्यांचा व्हाया एनडीए ... Read More »

कादंबरीकार अरुण साधू

– डॉ. सोमनाथ कोमरपंत अशा निर्मोही, निःस्पृह आणि निरहंकारी लेखकाचे या जगातून जाणे म्हणजे खरोखरच पोकळी निर्माण करणारे आहे. लेखक आणि ‘माणूस’ म्हणून मोठे असलेल्या अरुण साधू यांना विनम्र आदरांजली. मराठीतील राजकीय कादंबरीलेखनाला नवी मिती प्राप्त करून देणारे समर्थ कादंबरीकार आणि इंग्रजी पत्रकारितेत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे नामवंत पत्रकार अरुण साधू यांचे मुंबईत वयाच्या ७६व्या वर्षी सोमवार दि. २५ ... Read More »

विठ्ठलवाडीतील टोपले कुटुंबीय शिक्षणाची गंगोत्री

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट पोर्तुगीज अमदानीत समाजपरिवर्तनाचे ध्येय उराशी बाळगून शिक्षणदानाचे धनुष्य कै. अ. र. टोपले यांनी उचलले होते. ते पेलण्याचे कार्य त्यांच्या पुढील दोन पिढ्यांनी केले आहे, आज त्यांची तिसरी पिढीदेखील शिक्षणक्षेत्रात आपले योगदान देत आहे.   म्हापसानगरीतील सात वाड्यांपैकी एक वाडा असलेल्या ‘अन्साभाट’ परिसरातील ‘विठ्ठलवाडी’त ज्या ठिकाणी श्री देव विठ्ठल-रखुमाई देवस्थानचे सुबक व सुंदर मंदिर आहे, त्या ... Read More »

व्यर्थ चकमक

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर आणि विशेषतः अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर देशाच्या आर्थिक स्थितीवरून जी तोफ डागली, ती जेटलींच्या वर्मी लागल्याचे दिसते. प्रत्युत्तर देताना सिन्हा हे ‘८० वर्षांचे नोकरीचे अर्जदार’ असल्याचे उद्गार त्यांनी कुत्सित विनोदाने काढले. वय हे काही माणसाच्या हाती नसते. ते वाढतच जाते. त्यापासून सिन्हांचीही सुटका नाही आणि जेटलींचीही. जेटलींचे वयही आज ६४ आहे आणि तेही ... Read More »

ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क रक्षणासाठी कायदा करणार

>> समाजकल्याण मंत्र्यांची ग्वाही ज्येष्ठांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. मात्र, समाज कल्याण खात्याने ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या ओळखपत्राला काही जणांकडून किंमत दिली जात नाही, ही खेदाची गोष्ट असून सार्वजनिक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कायदा तयार करण्याचा सरकारचा विचार असल्याचे समाजकल्याणमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी काल सांगितले. पणजीत समाजकल्याण खात्याने आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिक दिन सोहळ्यात त्यांनी वरील माहिती ... Read More »

नारायण राणेंकडून नव्या पक्षाची घोषणा

घटस्थापनेच्या मुहूर्तावर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या नारायण राणे यांनी काल ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ या नव्या पक्षाची घोषणा केली. दरम्यान, नारायण राणे यांनी नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर अवघ्या तासाभरातच त्यांना एनडीएत सहभागी होण्याचे आमंत्रण भाजपने दिले आहे. कॉंग्रेस सोडल्यानंतर एखाद्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वत:चा नवीन पक्ष सुरू करणे असे दोन पर्याय आपल्यासमोर होते. त्यातील दुसरा पर्याय आपण निवडला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत ... Read More »

विद्यार्थ्यांना आधारकार्डद्वारे जोडण्याचे काम पूर्णत्वाकडे

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आधार कार्डाद्वारे जोडण्याचे काम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी काल सांगितले. सध्या ९६ टक्केे विद्यार्थ्यांना यापूर्वीच आधार कार्डाद्वारे जोडण्यात आलेले असून केवळ ४ टक्के विद्यार्थ्यांना जोडण्याचे काम शिल्लक राहिले असल्याचे भट यांनी सांगितले. सांगे व काणकोण तालुक्यातील १०० टक्के विद्यार्थ्यांना आधारद्वारे जोडण्यात आलेले आहे. तर सासष्टी, बार्देश, फोंडा ... Read More »

भीषण कार अपघातात आसगाव येथे दोघे ठार

सावतावाडा, आसगाव येथे काल रविवारी पहाटे साडेतीनच्या दरम्यान बर्थडे पार्टी आटोपून परतणार्‍या भरधाव कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कारची कुंपणाला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोघे ठार झाले तर दोघांची प्रकृती चिंताचनक आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांत एथॉन व्हिएगश (कारचालक) व लीएन रोचा यांचा समावेश आहे. जखमींवर बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत. सावळे-पिळर्ण येथील एथॉन ब्रायन व्हियेगश आपल्या अन्य तीन मित्रांसमवेत ... Read More »

५१९ विदेशी पर्यटकांसह पहिले चार्टर विमान दाखल

यंदाच्या पर्यटन मोसमातील पहिले चार्टर विमान काल सकाळी ८.३० वाजता ५१९ पर्यटकांना घेऊन दाबोळी विमानतळावर दाखल झाले. रशिया एअरलाईन्सचे ‘बोईंग ७४७’ हे विमान मॉस्कोहून दाबोळी विमानतळावर उतरताच पर्यटन खात्यातर्फे ब्रास बँड वादनाने व गुलाब पुष्प देऊन भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पर्यटकांना मिठाईही देण्यात आली. दरम्यान, काल गोव्यात पहिले चार्टर विमान आल्याच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गोव्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांची संख्या ३० ... Read More »

रोहितचे शतक; भारत विजयी

पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवत पाच एकदिवसीय सामन्याची मालिका ४-१ अशा ङ्गरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले २४३ धावांचे लक्ष्य भारताने रहाणे, रोहित व विराट यांचा बळी देत पूर्ण केले. शतकी खेळी केलेला रोहित सामनावीर तर अष्टपैलू हार्दिक पंड्या मालिकावीर किताबाचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यातील विजयामुळे भारताने पुन्हा एकदा आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर ... Read More »