ब्रेकिंग न्यूज़

Monthly Archives: October 2017

मत्स्य पुराण

‘इतुक्या लवकर येई न मरणा, मज अनुभवु दे या सुखक्षणा’ अशी कामना करणार्‍या कविवर्य बा. भ. बोरकरांनी ‘दिवसभरी श्रम करित रहावे, मासळीचा सेवित स्वाद दुणा’ अशी ‘सुख-क्षणा’ची कल्पना आपल्या कवितेतून केली होती. मात्र, आज गोवेकर त्यांच्या प्रिय मासळीपासून वंचित होऊ लागले आहेत. मासळीचे सतत चढते राहिलेले दर कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची खिरापत सरकार मच्छीमारांना वाटत असूनही खाली उतरलेले दिसत नाहीत. मत्स्योद्योग ... Read More »

ब्ल्यू व्हेल गेमच्या निमित्ताने…

ऍड. असीम सरोदे आत्महत्येस प्रवृत्त करणारा ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. अशा हिंसक आणि विकृत गेम्सवर बंदी घालण्याची मागणीही होत आहे. पण तांत्रिक कारणांमुळे ते शक्य नाही. म्हणूनच मुलांनी अशा गेम्सच्या आहारी जाऊ नये यासाठी उपाययोजना करायला हव्यात… गेल्या काही महिन्यांपासून भारतात ब्ल्यू व्हेल या ऑनलाईन गेमची चर्चा सुरू झाली आहे. या गेमची रचना ... Read More »

मटका तपासासाठी एसआयटीची स्थापना

>> न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारचा निर्णय राज्य सरकारच्या गृह खात्याने उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार मटका प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. उच्च न्यायालयात काल झालेल्या सुनावणीवेळी सरकारने ही माहिती दिली. या संबंधीचा आदेश १७ ऑक्टोबर २०१७ रोजी जारी करण्यात आला होता. राज्यातील मटका व्यवसायाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी या विशेष पथकाची नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली होती. या विशेष पथकाच्या ... Read More »

इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी भारत दौर्‍यावर असून काल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत सहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी भारत दौर्‍यावर असून काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत सहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा, राजनैतिक संबंध, ऊर्जा, सांस्कृतिक सहकार्य, दोन्ही देशांमधील परराष्ट्र ... Read More »

पार्किंग प्लाझा प्रकल्पात उद्यापासून शुल्क

गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या पाटो, पणजी येथील पांढरा हत्ती बनलेल्या बहुमजली पार्किंग प्लाझा प्रकल्पात १ नोव्हेंबरपासून पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीटीडीसीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पार्किंग प्लाझासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. अंदाजे ४५ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या प्रकल्पाचे ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी तत्कालीन संरक्षणमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. या ... Read More »

कला गुण देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

शालेय विद्यार्थ्यांना कला गुण देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. विद्यार्थ्यांमध्ये कलेविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने शालेय स्तरावर १२ वी पर्यंत कलागुण देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. क्रीडा खात्याकडून विद्यार्थांना क्रीडा क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी क्रीडा गुण दिले जातात. त्याच धर्तीवर मुलांना कला क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी कला गुण ... Read More »

पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या

पोलीस उपअधीक्षकपदी बढती मिळालेले गुरुदास गावडे यांची डिचोलीचे उपअधीक्षक आणि उत्तम राऊत देसाई यांची केपेचे उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच उपअधीक्षक गावडे यांच्याकडे वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या उपप्राचार्यपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश पोलीस मुख्यालयातील अधीक्षक एस. एम. प्रभुदेसाई यांनी काल जारी केला. पोलीस खात्यातील सात उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पणजी जीएचआरसीचे उपअधीक्षक किरण पौंडवाल यांची ... Read More »

नवीन पीडीए स्थापन करणे राज्याच्या हिताविरोधात : कॉंग्रेस

नवीन मल्टी पीडीए स्थापन करणे राज्याच्या हिताचे नाही, असे मत गोवा प्रदेश कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी पत्रकार परिषदेत काल व्यक्त केले. उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाची प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर नवीन पीडीए स्थापन करण्यास मान्यता देणार नाही, असा विश्‍वास नाईक यांनी व्यक्त केला. परंतु, राजकीय दबावाखाली नवीन पीडीएला मान्यता दिली जाऊ शकते असे ते म्हणाले. ... Read More »

फर्मागुडी आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा वर्गावर बहिष्कार

>> शिक्षकाच्या अत्याचाराचा विद्यार्थ्यांकडून निषेध >> शिक्षकाला निलंबित करण्याचा मंत्र्यांचा आदेश फर्मागुडी येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इलेक्ट्रिशियन विभागातील एक शिक्षक विद्यार्थ्यांवर अत्याचार करीत असल्याचा आरोप करीत सुमारे १०० विद्यार्थ्यांनी काल सोमवारी वर्गावर बहिष्कार घातला. जोपर्यंत त्या शिक्षकाला निलंबित केले जात नाही तोपर्यंत वर्गावर बहिष्कार घालण्याचा निर्णय सर्व विद्यार्थ्यांनी घेतला आहे. यासंबंधी विद्यार्थ्यांनी प्राचार्यांकडे लेखी तक्रार दिली आहे. दरम्यान, या ... Read More »

विराट, मिताली पहिल्या स्थानी

>> आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची एकदिवसीय क्रमवारी जाहीर भारताच्या पुरुष संघाचा कर्णधार विराट कोहली व महिला संघाची कप्तान मिताली राज हिने काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पहिले स्थान मिळविले आहे. कोहलीने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक गुणसंख्या प्राप्त करताना याबाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलादेखील पछाडले. मितालीने एका क्रमांकाची उडी घेत अव्वल स्थानाचा मान मिळविला. १० दिवसांपूर्वीच कोहलीला आपला पहिला ... Read More »