Daily Archives: September 12, 2017

अमृत(वि)योग!

गोमंतकीय समाजजीवनामध्ये काही ठोस जीवननिष्ठा घेऊन जगणारी माणसे हळूहळू पडद्याआड जाताना दिसत आहेत ही बाब विलक्षण खंत देणारी आहे. सतीश सोनक गेले. र. वि. जोगळेकर गेले. आता ऍड. अमृत कासार यांच्यासारखा एक विचारवंतही आपल्यातून निघून गेला आहे. एक यशस्वी कायदेतज्ज्ञ, संविधानतज्ज्ञ अशी त्यांची ओळख तर गोमंतकाला होतीच, परंतु त्याहून एक अत्यंत व्यासंगी, चिकित्सक, बुद्धिवादी विचारवंत म्हणून ऍड. कासार यांचे महत्त्वाचे ... Read More »

गोळा उठणे

– वैदू भरत नाईक गोळा आतड्यात कोठे आहे याची निश्‍चिती करावी. आमाशय, पच्चमानाशय, पक्वाशय यांची तपासणी रिकाम्या पोटी करावी. गोळा स्पर्श केल्यावर हलतो का? उष्ण स्पर्श आहे का? दडस व न हलणारा आहे का? याच्या स्थानावरून व इतर लक्षणांवरून वात, पित्त, कफ यांचा संबंध ठरवता येतो. ‘पोटात गोळा उठणे’ हा वाक्‌प्रचार नेहमी ऐकू येतो. गडबडा लोळणे, पोट धरून बसणे, रोग्याची ... Read More »

ल्युकेमिया (ब्लड कॅन्सर)

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) रुग्णाच्या शारीरिक तपासणी दरम्यान लिम्फ नोड्‌समध्ये सूज आढळल्यास व इतर लक्षणांवरून या रोगात रक्ताची तपासणी महत्त्वाची ठरते. रक्त परिक्षणात रक्तातील पांढर्‍या पेशी प्रचंड वाढलेल्या असतात. वर्षानुवर्षे आपण अनेक चित्रपटातील पात्रांना होणारा कॅन्सर हा ‘ब्लड कॅन्सर’ झालेलाच पाहिला आहे. आत्ता-आत्तापर्यंत कॅन्सर म्हणजे ‘रक्ताचा कॅन्सर’ हेच समीकरण सर्वांना ज्ञात होते. फक्त हल्ली काही वर्षांत कॅन्सरचे रुग्ण ... Read More »

अमृताहुनी गोड असे ऍड. कासार

सुरेश वाळवे अमृत सह्रदयी होता, संवेदनशील होता आणि हळवा, भावनाप्रधानही होता. गप्पागप्पांत कष्टाचे जुने दिवस आठवून अनेकदा त्याचा कंठ दाटून येई. ही वॉज द सेल्फ मेड मॅन… ऍड. अमृत कासार आणि माझी दोस्ती डिचोलीच्या अवर लेडी ऑफ ग्रेस हायस्कूलमध्ये आम्ही विद्यार्थी होतो, तेव्हापासूनची – म्हणजे ५५ वर्षांपासूनची. त्यामुळे अमृत पुढे ज्येष्ठ विधिज्ञ बनला, तरी आमचे संभाषण ‘अरे – तुरे’ तच ... Read More »

मेधा खोले आणि जातींची खोल पाळेमुळे

ऍड. असीम सरोदे भारतीय संविधानामध्ये कलम १४,१५ मध्ये स्पष्टपणाने सांगितले आहे की, तुमच्या समाजातील स्थानानुसार कोणताही भेदभाव करता येत नाही. पण आपण आदर्श मूल्ये आणि व्यवहार यांच्यात ङ्गारकत केलेली आहे. मेधा खोले यांनीही तेच केले… पुण्यातील हवामान वेधशाळेच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी निर्मला यादव यांच्याविरोधात ‘सोवळे मोडल्याच्या’ केलेल्या तक्रारीची बरीच चर्चा होत आहे. यासंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित होत ... Read More »

संध्याकाळी ७ नंतर समुद्रात स्नानासाठी उतरण्यावर बंदी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या एका उच्च स्तरीय बैठकीत गोव्यात येणार्‍या पर्यटकांना संध्याकाळी ७ नंतर समुद्रात स्नानासाठी उतरू न देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच समुद्र किनार्‍यांवरील सुरक्षेसाठी पर्यटन खात्याने एका समितीचीही स्थापना केली. बाबू केणी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून गोव्यातील किनारे सुरक्षित, स्वच्छ व अपघात मुक्त रहावेत त्यासंदर्भात अभ्यास करून अहवाल सादर करण्याची सूचना ... Read More »

माजी खासदार, घटनातज्ज्ञ ऍड. अमृत कासार यांचे निधन

उत्तर गोव्याचे माजी खासदार, वकील, घटनातज्ज्ञ, समाजसेवक अमृत कांसार (वय ७०) यांचे काल सोमवारी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अल्प आजाराने निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते कर्करोगाने आजारी होते. रविवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. तेथेच सोमवारी सकाळी ६.३० वा. त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र व दोन कन्या असा परिवार आहे. आज सकाळी सांतइनेज येथील स्मशानभूमीत त्यांच्या ... Read More »

म्हादई : कर्नाटकचा साक्षीदार निरूत्तर

म्हादई प्रश्‍नी काल पुन्हा जललवादासमोर सुनावणी सुरू झाली. गोव्याच्या पथकाने साक्षीदार ए. के. बजाज यांना विविध प्रश्‍न विचारले असता त्यांनी गोंधळलेल्या अवस्थेत उत्तरे देताना चुकीची व वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी माहिती दिली. त्यामुळे पहिल्याच दिवशी कर्नाटकाचा साक्षीदार अपयशी ठरला. २००३ सालातील केंद्रीय जल आयोगाचा अहवाल यांच्यातील पावसाची आकडेवारीबाबत विचारले असता साक्षीदार गोंधळला. म्हादई खोर्‍यातील पावसाबाबतही साक्षीदार निरुत्तर झाला. नदीची लांबी ११७ ... Read More »