Daily Archives: September 11, 2017

मला उमगलेल्या शिरीषताई

– नीलिमा आंगले आज शिरीषताई आमच्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या ‘हायकू’ निर्मितीचा प्रसार बराच होत आहे, होणार आहे आणि होत राहील… सरस्वतीच्या दरबारामधील हायकूंच्या वाटचालीत शिरीष नावाची ज्योत जनमानसात अखंड तेवत राहील. भरल्या कंठाने या ‘हायकूसम्राज्ञी’ला अलविदा! शिरीषताई, अलविदा!! बकुळीची फुले सुकली तरी त्यांचा सुगंध निरंतर टिकून राहतो, तसेच माणूस गेला तरी त्याच्या आठवणींचा सुगंध सदैव ताजाच राहतो. यासंदर्भात सिद्धहस्त महिला ... Read More »

शिक्षकदिन

– सौ. पौर्णिमा केरकर माझ्या या मुलांशी अंतरीच्या जिव्हाळ्याने मी जोडले गेले आहे. मला पक्के माहीत आहे, माझे विद्यार्थी, माझी मुलं यांना आयुष्यातून वजा करून मी पुढे जाऊच शकणार नाही. शिक्षकदिन, गुरुपौर्णिमा तर वर्षातून एकदाच येते… इथे माझा तर प्रत्येक दिवसच ‘शिक्षकदिन’ असतो. १९९३ साल. आताच कोठे मी शिक्षकी पेशात रुजू झाले होते. नव्यानेच सुरू झालेले आमचे उच्च माध्यमिक विद्यालय. ... Read More »

नवी क्षितिजे

काल गोव्यात येऊन गेलेल्या निर्मला सीतारामन यांच्या रूपाने देशाला प्रथमच पूर्णकालीक महिला संरक्षणमंत्री लाभल्या आहेत. सुषमा स्वराज यांच्या रूपाने देशाला एक कणखर आणि कार्यक्षम परराष्ट्रमंत्री लाभल्या असल्याने सीतारामन याही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आपल्या कार्यक्षमतेचा आणि कणखरपणाचा ठसा संरक्षण मंत्रालयावर उमटविणार का याबाबत अर्थातच उत्सुकता आहे. नव्या संरक्षणमंत्र्यांकडून पंतप्रधानांनी एक महत्त्वाची अपेक्षा बाळगलेली आहे ती म्हणजे ‘मेक इन इंडिया’ चा ... Read More »

नौदल महिला अधिकार्‍यांची नौका जगभ्रमंतीवर रवाना

‘नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत नौदलाच्या महिला अधिकार्‍यांचा एक चमू भारतीय बनावटीच्या आय्‌एन्‌एस्‌व्ही ‘तारिणी’ या नौकेने आज जगभ्रमणासाठी रवाना होत आहे ही भारतासाठी एक अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे व ह्या सुवर्ण क्षणाची साक्षी होण्याची संधी आपणाला मिळाली याबद्दल आपण स्वत:ला भाग्यवान समजत आहे, असे उद्गार संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी काल काढले. सीतारमण यांच्या हस्ते रविवारी नौदलाच्या बेती-वेरें येथील ... Read More »

राष्ट्रीय महामार्ग १७व्या रुंदीकरणामुळे होणार हजारो झाडांची कत्तल

>> करमल घाटातील १३ हजार झाडांवर कुर्‍हाड गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग १७ चे चौपदरीकरण व सहापदरीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. मोठे वनक्षेत्र असलेल्या गोव्यात या रस्ता रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे कापावी लागणार असून एका काणकोण तालुक्यातील करमलघाट परिसरातील तब्बल १३ हजार झाडे ह्या रस्ता रुंदीकरणासाठी कापून टाकावी लागणार आहेत. ही झाडे वन खात्याच्या पिसोणे क्षेत्रातील आहेत. केपें तालुक्यातील पाडी व ... Read More »

डॉ. मनमोहनांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ काश्मीरात

>> कॉंग्रेसकडून शांततेसाठी प्रयत्न जम्मू – काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापनेसाठी कॉंग्रेसकडून काही धोरणे आखण्यात आली आहेत. या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी माजी पंतप्रधान तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ काल जम्मूत दाखल झाले. राज्यातील विविध राजकीय नेते तसेच स्थानिक नागरिकांशी हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे. या शिष्टमंडळात माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, करण सिंग ... Read More »

पर्यटन क्षेत्रातील समस्यांवरील नियंत्रणासंदर्भात उच्चस्तरीय बैठक

>> मुख्यमंत्री पर्रीकरांकडून आयोजन पर्यटन स्थळी होणारी भांडणे, पर्यटक समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडण्याच्या घटना, पर्यटक व इतरांकडून मद्यप्राशन करून वेगाने वाहने चालवण्याचे घडणारे प्रकार आदींवर कसा आळा आणता येईल यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज सोमवारी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. पर्यटक समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण कसे खाली आणता येईल, किनारपट्टी भागांत होणारी भांडणे ... Read More »

कुडचडे बाजारात काल अचानक रहदारीच्या ठिकाणी माडाचे झाड मोडून पडले. सुदैवाने त्याखाली वाहन किंवा वाहन चालक सापडला नाही. माड पडल्यानंतर लोकांनी शहाळी काढण्यासाठी धाव घेतली. Read More »

विद्यार्थी खूनप्रकरणी पालकांवर लाठीमार

गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या ७ वर्षीय विद्यार्थ्यांचा या शाळेतच खून झाल्याप्रकरणी काल पालकांच्या निदर्शनांना हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी निदर्शकांवर लाठीमार केला. यावेळी निदर्शकांनी नजीकच्या दारूच्या दुकानाला आग लावली, तसेच शाळेच्या खिडक्यांचा काचा फोडल्या. या खूनप्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली असून त्याला एका आठवड्याच्या आत न्यायालयात उभा करण्यात येईल, असे हरयाणाचे शिक्षणमंत्री राम विलास शर्मा यांनी सांगितले. Read More »

… म्हणून नितीशकुमार भाजपला शरण : लालू

राष्ट्रीय जनता दलातर्फे येथे आयोजित एका रॅलीत या पक्षाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी सृजन घोटाळाप्रकरणी तुरुंगात जावे लागण्याच्या भीतीनेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील तत्कालीन महायुती तोडली व भाजपला शरण गेले अशी घणाघाती टीका केली. दिल्लीत भाजपला सृजन घोटाळ्याचा सुगावा लागला होता व त्यांनी नितीशकुमार यांना धमकीवजा संदेश दिला होता. या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात जावे लागेल असा हा संदेश होता. ... Read More »