Daily Archives: September 9, 2017

‘स्व’पासून ‘सृष्टी’पर्यंत…

– विद्या प्रभुदेसाई   ईश्वरनिर्मित अशा आकाश, सूर्य, चंद्र, चांदण्या, झाडे-वेली, सागर-डोंगर, गुरे-वासरे, फुले-फळे-पाखरे या सार्‍या घटकांकडे पाहण्याची निकोप दृष्टी या कविता देऊन तर जातातच, पण त्याचबरोबर बालवयातच खूप शिकण्याची, काम करण्याची आणि सर्वांशी प्रेमाने वागण्याची कामना व्यक्त करून पुनः ती ईश्वराने पूर्ण करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करणारे संस्कार मनावर घडविण्याचे कामही या कविता नकळतपणे करून जातात. औपचारिक शिक्षणाची आजची ... Read More »

स्मृतिगंध

– कालिका बापट आपल्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या, वाईट घटनांचा आढावा म्हणजे स्मृती, आठवणी. त्या डोकावत असतात आपल्या आयुष्यात, कधी फूल तर कधी काटे बनून. चांगल्या घटना पुढील प्रवासात लाभदायी, सुखदायी होतात, तर वाईट घटनांच्या आठवणी मन बेचैन करतात. या आठवणींचा आपल्या पुढील आयुष्यावर परिणाम होऊ न देता मार्गक्रमण करणे इष्ट होय. तर आयुष्याच्या या प्रवासात काटे चुकवून, फुलं तेवढी वेचावीत ... Read More »

ऑनलाइन कोलाहल!

कोणतेही तंत्रज्ञान जेवढे चांगल्या गोष्टींसाठी वापरता येते, तेवढाच त्याचा गैरवापरही होऊ शकतो. सध्या बोलबाला असलेल्या सोशल मीडियाला आता एका विकृतीने ग्रासले आहे. कर्नाटकच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ट्वीटरवरून उमटलेल्या अत्यंत द्वेषपूर्ण प्रतिक्रिया अथवा काल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून केलेली अभद्र टिप्पणी ही या विकृतीची अत्यंत ताजी उदाहरणे आहेत. सोशल मीडियासंदर्भात अलीकडे एक शब्द नित्य ... Read More »

एटीएम मशीन पळवून १८ लाख लुटले

>> आगरवाडा, पेडणे येथे धाडसी चोरी >> एटीएम जंगलात दगडांनी फोडले आगरवाडा, पेडणे येथे मुख्य रस्त्यापासून जवळ लोकवस्तीच्या ठिकाणी असलेले भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी जंगलात नेऊन फोडून त्यातील १८ लाख ३० हजार रुपये लुटण्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली आहे. या धाडसी चोरीमुळे पोलिसांची झोप उडाली आहे. दरम्यान, या चोरीची सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सापडली आहे. पोलिसांनी ... Read More »

बंगळूर अपघातात चोपडेचा युवक ठार

धर्मपुरी – बंगळूर येथे झालेल्या अपघातात चोपडे येथील डॉम्निक डिसोझा (३३) या विवाहित युवकाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी शर्ली गंभीर तर मित्र विलट किरकोळ जखमी झाले. या अपघातात त्यांचा तीन वर्षांचा मुलगा आश्‍चर्यकारकरीत्या बचावला. डॉम्निक वेलंकनी येथे देवदर्शनासाठी जाताना ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्या कारला अपघात झाला. रस्त्यावर अचानक आलेल्या दुचाकीस्वाराला चुकवण्याच्या प्रयत्नात कार रस्त्यावर पलटून डॉम्निक याचे निधन ... Read More »

माध्यान्ह आहारातून विषबाधा रोखण्यासाठी उपाययोजना

माध्यान्ह आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा होण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक शाळा समुहाच्या एका मुख्याध्यापकाला त्यांना अन्न पुरवणार्‍या स्वयंसेवी गटाच्या स्वयंपाकाच्या खोलीची तसेच अन्न स्वच्छ वातावरणात शिजवण्यात येते की नाही याची पाहणी करण्याचे अधिकार शिक्षण खात्याने दिले आहेत. त्यांना लवकरात लवकर ही तपासणी करण्याचे काम हाती घेण्याची सूचना केली असल्याचे शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल सांगितले. तपासणी करून खात्याला अहवाल पाठवण्याची सूचनाही ... Read More »

बाजारातील रसायनयुक्त मासळी जप्तीचे संकेत

>> मच्छीमार मंत्र्यांकडून ठोस पावले गोव्यातील मासळी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली जाणारी मासळी ताजी रहावी यासाठी घातक रसायने वापरली जात असल्याची माहिती आपल्या हाती आली आहे. या पार्श्‍वभूमीवर खात्यातील अधिकार्‍यांना अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने छापे मारून रसायनयुक्त मासळी जप्त करण्याचे तसेच या मासळीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मच्छीमारी खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी काल सांगितले. ... Read More »

पर्यटक बुडण्याच्या घटना; व्यावसायिकांना आवाहन

गेल्या काही दिवसांपासून पर्यटक समुद्रात बुडून मृत्युमुखी पडण्याच्या दुर्घटनांची पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी पर्यटकांना संभाव्य धोक्याच्या सूचना वेळोवेळी देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दारूच्या नशेत तसेच सूर्यास्तानंतर समुद्रात स्नानासाठी जाणार्‍या पर्यटकांना धोक्याची सूचना देण्याची गरज आहे. त्याकामी पर्यटक व्यवसायातील लोकांची मदत घेण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री आजगावकर यांनी सांगितले. राज्यातील शॅकमालक, किनारपट्टी भागातील ... Read More »

हरित लवादाचे स्वतंत्र खंडपीठ गोव्यात हवे

>> कॉंग्रेस पक्षाची मागणी राष्ट्रीय हरित लवादाचे स्वतंत्र खंडपीठ गोव्यात स्थापन करण्यात यावे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल येथे पत्रकार परिषदेत केली. पर्यावरणासाठी लढणार्‍या लोकांची संख्या राज्यात मोठी असल्याने राज्यात राष्ट्रीय हरित लवादाच्या खंडपीठाची स्थापना करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. नवी दिल्ली येथील खंडपीठात जाणे गोमंतकीयांसाठी गैरसोयीचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संगीत महोत्सवात अमली पदार्थांचा ... Read More »

माविन-एलिना यांच्यात दुभाजक प्रश्‍नावरून तेढ

पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्या निर्देशानुसार दाबोळीतील चौपदरी मार्गावरील हटविलेला दुभाजक त्वरित पुन्हा घालण्याची सूचना कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संचालकांना केल्यामुळे एलिना साल्ढाणा व माविन गुदिन्हो यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दोन दिवसांत पुन्हा दुभाजक उभारून रस्ता बंद करण्याचे आश्‍वासन संचालकांनी आमदारांना दिले आहे. यामुळे दोन्ही आमदारांच्या कचाट्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक प्रेमानंद दोड्डामणी सापडले आहेत. राष्ट्रीय ... Read More »