Daily Archives: September 8, 2017

प्रश्न रोहिंग्यांचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताज्या म्यानमार भेटीच्या पार्श्वभूमीवर रोहिंग्या मुसलमानांचा तेथील प्रश्न आणि त्याचे भारतावर होणारे संभाव्य परिणाम हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. म्यानमारमध्ये लष्करी राजवट असताना तेथील ह्या रोहिंग्यांना निर्वासित मानून त्यांच्याविरुद्ध कडक निर्बंध घातले गेले होतेच, परंतु दोन वर्षांपूर्वी तेथे लोकशाही येऊनही म्यानमारच्या रोहिंग्यांबाबतच्या नीतीमध्ये बदल घडलेला नाही. तेथील लष्कराने चालवलेल्या कारवाईमुळे लक्षावधी रोहिंग्या घरदार सोडून शेजारच्या ... Read More »

अबू सालेमला जन्मठेप, दोघांना फाशी

  >> मुंबईतील १९९३चा साखळी बॉम्बस्फोट खटला >> २४ वर्षांनंतर टाडा न्यायालयाचा निकाल मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेला कुख्यात गुंड अबू सालेम व करीमुल्लाला जन्मठेप तर फिरोज खान व ताहीर मर्चंट ऊर्फ ताहीर टकल्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अन्य एक दोषी रियाज अहमद सिद्दिकीला १० वर्षांची शिक्षा सुनावली. तब्बल २४ वर्षांनंतर विशेष टाडा न्यायालयाने काल हा महत्त्वपूर्ण ... Read More »

तेजपालविरोधात २८ रोजी आरोप निश्‍चित

महिला सहकार्‍याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले ‘तहलका’ मासिकाचे तत्कालीन संपादक तरूण तेजपाल विरोधात २८ सप्टेंबर रोजी आरोप निश्‍चित करण्याचा आदेश म्हापसा येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने काल दिला. म्हापसा न्यायालयात या प्रकरणी इन कॅमेरा सुनावणी सुरू असून आरोप निश्‍चित झाल्यावर तेजपालविरोधात खटला चालणार आहे. आपणावर ठेवण्यात आलेले आरोप मागे घेण्यात यावेत अशी मागणी करणारा तेजपाल यांचा अर्ज जिल्हा आणि ... Read More »

कांदोळीत २ विद्यार्थी बुडाले

अहमदाबाद (गुजरात) येथून अभ्यास दौर्‍यावर गोव्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या गटातील एका विद्यार्थिनीसह दोघा विद्यार्थ्यांचा कांदोळी येथील समुद्रात बुडून मृत्यू झाला. अनुजा सुसान (२३) व गुरेम साई (२५) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. सदर दुर्घटना काल पहाटेच्या वेळी घडली. एका आठवड्यात पर्यटक बुडण्याची ही तिसरी घटना आहे. अहमदाबाद येथील मदुराई इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेश कॉलेजच्या ४७ विद्यार्थ्यांचा गट शिक्षकांसह गोवा अभ्यास दौर्‍यावर आला ... Read More »

राज्यातील अप्रशिक्षित शिक्षकांना बीएड, डीएड अभ्यासक्रमांसाठी मुदत

सध्या अनुदानित तसेच विना अनुदानित विद्यालयांमध्ये सेवेत असलेल्या अप्रशिक्षित शिक्षकांना मार्च २०१९ पर्यंत शिक्षक प्रशिक्षण (बीएड, अथवा डीएड) पूर्ण करावे लागेल. अन्यथा त्यांना नोकरीला मुकावे लागेल, असे शिक्षण संचालक गजानन भट यांनी काल सांगितले. सदर शिक्षकांना ऑनलाईन बीएड करण्यासाठीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे भट यांनी सांगितले. ऑनलाईन लेक्चर ऐकून या शिक्षकांना बीएड, डीएड अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. त्यांना ... Read More »

‘ब्रह्मचारी’ नाटक कारकिर्दीतील मैलाचा दगड : वर्षा उसगावकर

गाणे एकवेळ माझी हौस होती. पण मी ती हौस ठेवली नाही. गाणे जोपासले. मी आधी अभिनेत्री, नंतर गायिका आहे. खरे तर मला गायिका-अभिनेत्री व्हायचे होते. ब्रह्मचारी नाटक माझ्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरले असे विख्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी काल ‘हितगुज’ कार्यक्रमात सांगितले. कॉपरलिफ हॉटेल प्रस्तुत ‘स्वस्तिक’ आणि कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने अकादमीच्या कृष्णकक्षात हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे पार पडला. प्रसिद्ध ... Read More »