Daily Archives: September 7, 2017

महायुद्धाचे ढग

उत्तर कोरियाने नुकतीच केलेली हायड्रोजन बॉम्बची चाचणी सफल ठरल्याने जगापुढे संभाव्य तिसर्‍या जागतिक महायुद्धाची वावटळ नकळत घोंगावू लागली आहे. उत्तर कोरियाचा नेता किम जॉँग -उन आणि त्याची देशाला अण्वस्त्रसज्ज करण्याची आक्रमक मनीषा यातून हे संकट निर्माण झालेले आहे. ही त्या देशाची सहावी चाचणी आहे. उत्तर कोरियाचा हा हायड्रोजन बॉम्ब त्यांनी नव्यानेच विकसित केलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राला जोडून त्याद्वारे कोणत्याही देशावर हल्ला ... Read More »

मद्यधुंद पर्यटकांविरोधात कडक कायद्याचा प्रस्ताव ः पर्यटनमंत्री

दारूच्या नशेत आंघोळीसाठी समुद्रात उतरणार्‍या पर्यटकांवर कडक कारवाई करण्याची गरज असून तसा कायदा करण्यात यावा, अशी सूचना आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना करणार असल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी काल सांगितले. सरकारला आवश्यक वटहुकूम काढण्याचा व गरज वाटल्यास यंदाचा पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच तो जारी करण्याचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले. हल्लीच्या दिवसांत काही व्यक्ती राज्यातील समुद्रात बुडून मरण्याच्या घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर ... Read More »

लंकेश हत्या प्रकरणी संशयिताला अटक

ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. संदीप असे या युवकाचे नाव आहे. हत्येच्या घटनेनंतर त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टच्या आधारावर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. लंकेश हत्या प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकामार्फत करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल वरील आदेश दिला. दरम्यान, या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, ... Read More »

मुख्यमंत्र्यांकडे उद्योग, वन खाते कायम

>> तिसर्‍या टप्प्यातील खातेवाटप जाहीर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल तिसर्‍या टप्प्यातील खातेवाटप केले असून आपल्याकडे गृह, वित्त, खाण, दक्षता, शिक्षण, सर्वसामान्य प्रशासन, कार्मिक या खात्यांसह उद्योग व वन ही खाती कायम ठेवली आहेत. मगो नेते व साबांखा व वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांना नदी परिवहन व वस्तू संग्रहालय तर गोवा फॉरवर्डचे प्रमुख व नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना ... Read More »

‘मोपा’साठी १.४४ लाख चौ. मी. जमीन केंद्र सरकारच्या ताब्यात देण्याचा निर्णय

मोपा विमानतळासाठी हवी असलेली गोवा सरकारच्या मालकीची १.४४ लाख चौ. मी. एवढी जमीन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या स्वाधीन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विमानतळासाठीचे काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारच्या मालकीची असलेली ही जमीन नागरी उड्डाण मंत्रालयाकडे हस्तांतरीत करण्याची गरज होती, असे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. दरम्यान, पर्वरी येथे २० एमएलडी क्षमतेचा ... Read More »

प्रत्येक मंत्र्यांच्या मदतीला दोन अतिरिक्त अधिकारी

राज्यातील प्रत्येक मंत्र्याला दोन अतिरिक्त विशेष अधिकारी देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. यासंबंधी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, सध्याच्या काळात मंत्र्यांना इत्यंभूत अशी माहिती असणे आवश्यक आहे. पण मंत्री हे तज्ज्ञ नव्हेत. त्यामुळे त्यांना आवश्यक ती माहिती पुरवणार्‍या व ती योग्य प्रकारे समजावून सांगणार्‍या अधिकार्‍यांची गरज भासत असते. मंत्र्यांना आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा ... Read More »

परेड मैदान झाडी व कचर्‍याच्या विळख्यात

>> फुटबॉल स्टेडियमची पायाभरणी होऊन उलटले १५ महिने! काही वर्षांपूर्वी कांपालवरील बांदोडकर फुटबॉल स्टेडियम दर्जेदार फुटबॉल सामन्यांनी गजबजलेले असायचे. मात्र, शहरातील एक महत्त्वाचे क्रीडा केंद्र मानले जाणारे हे स्टेडियम सुमारे दशकभरापूर्वी तत्कालीन सरकारने मोडून टाकले. त्यानंतर आजतागायत शहरातील उदयोन्मुख फुटबॉलपटू फुटबॉल स्टेडियमसाठी टाहो फोडत आहेत. काही व्यक्ती – संस्थांनी त्यासाठी चळवळही उभारल्यानंतर कांपाल परेड मैदानावर स्टेडियम उभारण्याची घोषणा सरकारने केली. ... Read More »

दोडामार्ग अपघातात एक ठार, एक गंभीर

गावाळ, दोडामार्ग येथे मोटारसायकल व मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात समीर दशरथ परमेकर (२५) हरिजनवाडा, खानयाळे-भेडशी हा युवक ठार झाला तर शुभम सदानंद जाधव (२२) हा गंभीर जखमी झाला. डिचोली पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, स्प्लेंडर मोटारसायकलने वरील दोघे म्हावळींगे येथून दोडामार्गला जात होते. ते गावाळ येथे पोचले असता जीए – ०४ – ४३६८ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला धडक बसल्याने मोटारसायकल चालक ... Read More »