Daily Archives: September 6, 2017

मर्यादित यश

चीनमधील शियामेन येथे ब्रिक्स परिषदेत जारी करण्यात आलेल्या पाचही सदस्य देशांच्या संयुक्त घोषणापत्रामध्ये दहशतवादाशी लढण्याची बात करीत असताना जैश ए महंमद आणि लष्कर ए तोयबा या पाकिस्तानमधील दोन दहशतवादी संघटनांचाही उल्लेख झाल्याने हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय मानला जात आहे. गोव्यात यापूर्वी झालेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये अशा प्रकारचे एकमत निर्माण करण्याचे भारताचे प्रयत्न फसले होते. त्या पार्श्वभूमीवर या दोन संघटनांचा नामोल्लेख संयुक्त ... Read More »

पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरूत हत्या

कर्नाटकमधील ‘लंंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादक ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची बेंगळुरुतील राजा राजेश्‍वरी परिसरातील राहत्या घरी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर बेंगळुरूत खळबळ माजली आहे. घरात घुसून तीन हल्लेखोरांनी गौरी लंकेश यांच्यावर सात गोळ्या झाडल्या. गोळीबार करून हल्लेखोरांनी पळ काढला. Read More »

मोदी-जिनपिंग चर्चेत शांतता राखण्यावर एकमत

ब्रिक्स परिषदेच्या दुसर्‍या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्या झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यावर एकमत झाले. चर्चेनंतर परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी चर्चेविषयी माहिती दिली. दोन्ही देशातील सैन्यांमध्ये ताळमेळ ठेवण्यावर एकमत झाले. द्विपक्षीय संबंध चांगले राहण्यासाठी सीमेवर शांतता राखणे आवश्यक असल्याचे दोन्ही देशांनी मान्य केले असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. Read More »

कला – संस्कृती खाते आयोजित राज्यस्तरीय गणेश देखावा स्पर्धेतील प्रथम पारितोषिक पटकाविलेला आखाडा, सांत इस्तेव येथील ब्रह्मेश्‍वर युवक संघाचा श्रीगणेश. Read More »

दोन लाख कंपन्यांची बँक खाती हाताळण्यास बंदी

>> केंद्र सरकारचा दणका >> कंपन्यांची नोंदणीही रद्द कंपनी कायद्याची पायमल्ली करणार्‍या कंपन्यांना केंद्र सरकारने काल जोरदार दणका दिला असून एका आदेशाद्वारे २,०९,०३२ कंपन्यांची नोंदणी रद्द करीत त्यांची बँक खाती गोठवली आहेत. काळा पैसा व कर चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपन्या पुन्हा सुरू करण्यासाठी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कंपनी कायद्याचे उल्लंघन करणार्‍या वरील ... Read More »

वाहतूक परवाने, आरसी बूक आजपासून मिळणार घरपोच

>> वाहतूक मंत्र्यांहस्ते योजनेचा शुभारंभ वाहनचालकांना त्यांचे आरसी बुक (वाहन नोंदणी पुस्तिका) व ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालविण्याचा परवाना) स्पिड पोस्ट सेवेद्वारे घरपोच देण्यात येणार असून काल या योजनेचा वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते पर्यटन भवनमध्ये आयोजित खास सोहळ्यात शुभारंभ करण्यात आला. यावेळी ढवळीकर यांनी स्पिड पोस्टद्वारे ग्राहकांना घरी पाठवण्यासाठीच्या आरसी बुक व ड्रायव्हिंग लायसन्सचा एक शुभारंभी गठ्ठा टपाल खात्याचे पोस्टमास्टर ... Read More »

वर्षभरात सर्व मार्गांवर सीसीटीव्ही ः वाहतूकमंत्री

वर्षभरात राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व जिल्हा रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा वाहतूक खात्याचा विचार आहे, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रीय महामार्गांवर कॅमेरे बसवण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार असून ती मिळाल्यानंतरच राष्ट्रीय महामार्गांवर हे कॅमेरे बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील रस्त्यांवर हे कॅमेरे बसवल्यानंतर वाहतूक नियमांचा भंग करणार्‍यांवर लक्ष ठेवणे सोपे ... Read More »