Daily Archives: September 2, 2017

पुन्हा फेरबदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍यांदा आपल्या मंत्रिमंडळाची फेररचना हाती घेतली आहे. येत्या अठरा – वीस महिन्यांत येणार असलेल्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन आपल्या मंत्र्यांचे पत्ते पिसण्याचे हे पाऊल पंतप्रधानांनी उचललेले दिसते. यापूर्वीच्या मंत्रिमंडळ फेरबदलामध्येही पुढे होणार्‍या निवडणुका लक्षात घेऊनच मंत्रिपदे देण्यात आली होती. मात्र, यावेळी निवडणुकांबरोबरच मंत्र्यांची प्रत्यक्षातील कामगिरीही विचारात घेतली गेलेली दिसते. ... Read More »

मोदी मंत्रिमंडळात उद्या होणार फेरबदल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करणार असून या पार्श्‍वभूमीवर मंत्रिमंडळातील दोन ज्येष्ठ व चार कनिष्ठ मंत्र्यांनी राजिनामे दिले आहेत. यामुळे आता मोदी मंत्रिमंडळात बरेच नवे चेहरे समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. केंद्रातील सत्ताधारी आघाडीत अलीकडेच डेरेदाखल झालेल्या संयुक्त जनता दल तथा जेडीयूच्या दोन खासदारांची वर्णी यावेळी लागण्याची चर्चा आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी रविवारी राष्ट्रपती भवनात सकाळी १० वा. होणार आहे. ... Read More »

गोव्याच्या मंत्र्यांना लवकरच आणखी खाती

राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अतिरिक्त खाती देण्याचे काम पुढील आठवड्यात होणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. काल पणजीत ऑनलाईन सार्वजनिक ग्राहक निवारण पोर्टलचे अनावरण केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. मंत्रिमंडळात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह १२ मंत्री आहेत. त्यापैकी विश्‍वजीत राणे व माविन गुदिन्हो यांच्याकडे प्रत्येकी एकच खाते आहे. राणे यांच्याकडे आरोग्य तर गुदिन्हो यांच्याकडे पंचायत खाते आहे. ... Read More »

धार्मिक प्रतिके हल्लाप्रकरण सीबीआयकडे द्या : कॉंग्रेस

राज्यात धार्मिक प्रतिकांवरील हल्ल्यांचे तपास काम सीबीआय्‌कडे सोपवण्यात यावे, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल पत्रकार परिषदेत केली. या अनुषंगाने आपण गृह खात्याला पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. वरील प्रकरणी पोलिसानी एका व्यक्तीला अटक केली असली तरी त्याच्या अटकेनंतरही राज्यात प्रार्थना स्थळांवर हल्ले होण्याच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केलेली असली तरी याप्रकरणी ... Read More »

शॅक्स वाटप प्रक्रियेस सोमवारपासून प्रारंभ

राज्यातील विविध किनार्‍यांवर पर्यटन मोसमाच्या प्रारंभीच शॅक्स उभारून व्यवसाय सुरू करता यावा यासाठी विनाविलंब व्यावसायिकांना शॅक्स देण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल स्पष्ट केले. शॅक्सची वाटणी करण्यासाठीची प्रक्रीया दि. ४ सप्टेंबरपर्यंत सुरू करण्यात येणार असून येत्या २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे आजगावकर यानी नमूद केले. २०१७-१८ या पर्यटन मोसमासाठी शॅक्स व्यावसायिकांना निश्‍चित वेळेत शॅक्सचे वितरण होईल याकडे ... Read More »

फा. बिस्मार्क प्रकरण चर्चसाठी महत्वाचे नव्हते काय?

>> गोवा फॉरवर्ड पक्षाचा सवाल राज्यातील भाजप सरकारमधील घटक पक्ष असलेला गोवा फॉरवर्ड पक्ष कुणालाही गोव्यातील जातीय सलोखा बिघडवू देणार नाही, असे पक्षाचे प्रमुख प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी राज्यातील जातीय सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले असल्याचे डिमेलो यावेळी म्हणाले. राज्यातील अल्पसंख्यांकांच्या धार्मिक प्रतिकांवर ... Read More »

निनादल्या मनभावन श्रावणसरी

मठग्राममधील गोवा मराठी अकादमी आयोजित दुपारी ३ ते रात्री ९.३० पर्यंत ‘मनभावन श्रावण’ हा कार्यक्रम कवी पुष्पाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवींच्या काव्यमैफलीने, शालेय विद्यार्थ्यांनी वर्षाऋतुवर आधारित रंगवलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाने, गोवा मराठी अकादमी अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांच्या हस्ते मराठी विषयांत प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाने, वर्षाऋतुवर बेतलेल्या नृत्यरंगाने आणि गीतश्रावण या संगीत मैफलीने साजरा झाला. एकूण कार्यक्रमातील उत्कर्षबिंदू ठरलेल्या स्वरयात्रेची ... Read More »

‘उद्बोधन’ महत्त्वाचे केवळ ‘ज्ञानदान’ नव्हे!!

शालेय किंवा विश्वविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून मूल जेव्हा समाजात आपल्या उपजीविकेसाठी हालचाल करु लागते तेव्हा कोणती जीवनावश्यक मूल्ये जोपासावीत हे प्रबोधन व त्या प्रबोधनातून जीवन जगण्याचा योग्य मार्ग शिक्षक व पालक आपल्या भावी पिढीला देईल तर या कलियुगाचे सुवर्णयुग व्हायला वेळ लागणार नाही हे निश्‍चित! आपल्या राष्ट्रात सर्वत्र ५ सप्टेंबर हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या स्वतंत्र राष्ट्राचे ... Read More »